- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड महापालिकेस अशुद्ध जलउपसा केंद्र, ॲप्रोच चॅनेल पंप हाउस, ॲप्रोच ब्रीज व सबस्टेशन इ. बांधणेकामी पुणे पाठबंधारे विभागाची जागा मिळावी, त्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या व त्या अनुशंगाने शहरासाठी वाढलेली पाण्याची मागणी याचा विचार करता भविष्यातील 2031 पर्यंतची शहराची लोकसंख्या गृहित धरुन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासनाने आंद्रा धरणातून 36.870 द.ल.घ.मी पाणी कोटा आरक्षित केला आहे. त्यास अनुसरुन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने पुणे पाटबंधारे विभागाच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरात चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे गावाखेडयाचे रूपांतर शहरात होऊ लागले आहे, शेत जमीन नामशेष होऊन सिमेंटचे रस्ते, सिमेंटचे जंगल निर्माण होऊ लागले आहेत. पक्षांचा शहरातील अधिवास कमी होत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक बांधिलकीतून पक्षाची काळजी घेण्याचे आवाहन मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा संगिता जोगदंड यांनी केले आहे. शहरीकरणामुळे आणि प्रदूषणामुळे चिमण्या बरोबरच इतरही पक्षाचा ही आदिवास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कालांतराने पुढील पिढीसाठी हे धोकादायक आहे .लहानपणी संध्याकाळी चिऊताईचा किलबिलाट ऐकायला मिळायचा अशावेळी मला ग. दि. माडगूळकर यांचा ” या चिमण्यांनो परत या ” हे गाणे आठवते यामुळेच दरवर्षी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग क्षेत्रीय कार्यालयाकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरू असून गोरगरीब विक्रेत्यावर अन्याय कारवाई करण्यात येत आहे ग क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे यांचेवर मनपा आयुक्तांनी कारवाई करावी गोरगरिबांना छळू नका अन्यथा यापुढेही बेरोजगारीने अराजकता येईल असा इशारा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केला दिला. नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयासमोर थेरगाव येथे मुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. आजचा दुसरा दिवस असताना क्षत्रिय अधिकारी किशोर ननावरे हे आंदोलकांना न भेटता ते केवळ श्रीमंतासाठी काम करत असून गोरगरिबांना चिरडण्याचे काम करत आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक अवैध…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रथमेश शिंदे नावाच्या शिवप्रेमी कलाकाराणे केशवनगर चिंचवड येथील गोयल कॉर्नर बिल्डिंगच्या उंच व अवघड जागी भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी पेंटिंग अतिशय खडतर परस्थितीत काढली आहे. परिसरातून महाराजांची पेंटिंग पहाण्यासाठी मोठ्या प्रमानात नागरिक येत आहेत व खूप कौतुक करतात. प्रथमेश याला आणखी ऊर्जा मिळावी म्हणून निस्वार्थी संस्था, वूई टुगेदर फाउंडेशन च्या वतीने त्याचा खूप आदरपूर्वक शाल श्रीफळ व बक्षीस असा सन्मान करण्यात आला व खूप कौतुक करण्यात आले. या वेळी वूई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे,सलीम सय्यद,जयंत कुलकर्णी,दिलीप चक्रे,रवींद्र सागडे,मांडके काका,निवृत्त पोलीस शंकराव कुलकर्णी भाजपा प्रदेश सदस्य अजित कुलथे, अर्चना बच्चे,आदींनी माझा सत्कार केला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी नेहरूनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिलांसाठी ई फायलिंग व संगणकीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम रविवारी (दि. १६) घेण्यात आला. ई-फायलिंगसाठी वकिलांची नोंदणी, दावा/तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, जुन्या प्रकरणात वकीलपत्र दाखल करणे, न्यायालयीन कामकाज आदींबाबत माहिती देण्यात आली. त्याला वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय (पुणे) आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय (नेहरूनगर) तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ई-फायलिंग व संगणकीय प्रशिक्षक ॲड. अतिश लांडगे, ॲड. लालचंद ओसवाल यांच्या हस्ते झाले. ई-फायलींग…
हिंजवडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्स जळून खाक झाला आहे. या दुर्घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे, हे चौघे ही कंपनीचे कर्मचारी होते. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण १२ कर्मचारी या टेम्पोत होते. हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र मागचे दार न उघडल्याने चौघांचा होरपळून मृत्यू झाला. काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी ८ च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स कर्मचारी घेऊन निघाली होती. त्यावेळी टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये अचानक आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे काहींना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाचे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या ५ कोटी ९ लाख रुपये शिल्लक रकमेसह आर्थिक वर्ष २०२५-२६ चे ५७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक आज स्थायी समिती व महापालिका सभेमध्ये सादर करण्यात आले. या अंदाजपत्रकास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाकडे वृक्षकर, वृक्षतोड लाकूड विक्री, अनुदान, देणगी, झाडतोड खर्च वसुली, रोपे विक्री, विनापरवाना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साचलेल्या विचारांच्या पाण्याला वाट करुन देणारी संस्था म्हणजे काव्यात्मा साहित्य परिषद पुणे यांचा दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त काव्यात्मा सन्मान सोहळा व काव्य जागर संमेलन मराठवाडा जनविकास संघाच्या सभागृहात शानदारपणे पार पडले. यावेळी विचारपीठावर ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण, पुरुषोत्तम सदाफुले, श्नीकांत चौगुले, महेंद्र भारती, वृक्षमित्र अरुण पवार, सविता इंगळे, प्रसिद्ध कवी अनिल दिक्षित, सुरेश वाकचौरे, महेमूदा शेख होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. परिवर्तनाच्या चळवळीचा धागा पकडून ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण जीवनाचा मुलमंत्र देताना म्हणाले, “छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण जिंदगी चे दार जोरदार ठोठवा…” आयुष्याचा मतितार्थ सांगत पुढे म्हणाले ,”ज्यांना कुणीच नाहीत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे ते लोणावळा दरम्यानची तिसरी आणि चौथी मार्गिका जमीन अधिग्रहण न झाल्याने रखडली आहे. पनवेलमध्ये देशातील सर्वात मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे कर्जत ते लोणावळा आणि लोणावळा ते पुण्यापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम करावे. त्यामुळे पनवेल पासून थेट पुण्यापर्यंत जलद रेल्वे धावू शकतात. दुपारी दीड वाजता लोणावळावरून पुण्याला जाणारी लोकल पुन्हा सुरू करावी. अमृत भारत योजनेत कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकाचा समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली. केंद्र सरकारच्या २०२५-२६ या अर्थसंकल्पावरील चर्चेत खासदार श्रीरंग बारणे सहभाग घेतला. शिवसेनेच्या वतीने अर्थसंकल्पावर चर्चा केली. अर्थसंकल्पाचे स्वागत करतानाच मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळवडे, ज्योतीबानगर, सोनवणेवस्ती, शेलारवस्ती या औद्योगिक परिसरात महावितरणच्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठयामुळे लघुउद्योजक झाले त्रस्त झाले आहेत.महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याने ताबडतोब वरील औद्योगिक परिसरातील वीज समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी लघुउद्योजकांनी केली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,तळवडे, ज्योतीबानगर, सोनवणेवस्ती, शेलारवस्ती या औद्योगिक परिसरात गेल्या आठ दिवसापासून महावितरण मार्फत करण्यात येत असलेला वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे उद्योजकांचे अतोनात नुकसान होत आहे. सध्या मार्च महिन्याची वर्क ऑर्डर पूर्ण करण्याची धावपळ चालू असताना दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे उद्योजक अक्षरक्ष: वैतागले आहेत. एखाद्या महिन्याचे वीज बिल भरण्यास उशीर झाल्यास…
