- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- लोकमतच्या वतीने दिला जाणाऱ्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या पुरस्काराच्या ‘प्रॉमिसिंग आयएएस’ या श्रेणीतील पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रशासनात कोणतेही काम एकट्याने होत नाही.हा पुरस्कार म्हणजे रामटेक, गडचिरोली, सिंधुदुर्ग, सातारा आणि आता पीसीएमसी येथे मला मिळालेल्या कामाच्या संधी सोबतच या संपूर्ण कार्यकाळात नागरिक व सहकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तम सहकार्याचा आणि संघभावनेचा सन्मान आहे. माझ्या पहिल्या नियुक्तीपासून आजपर्यंत मिळालेल्या जनतेच्या,…
दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्राध्यापक डॉ. चैत्रा संतोषकुमार मस्तुद यांना इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे आयोजित ग्लोबल कॉनक्लेव ऑन ओरल हेल्थ इनोव्हेशन अँड रिसर्च या आंतरराष्ट्रीय परिषदेतील ‘बेस्ट फीमेल एंटरप्रेनर (वुमेन इन इनोवेशन)’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे संपन्न झाली. पुरस्कार वितरण समारंभात इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शुभ्रा नंदी, सचिव डॉ. अशोक ढोबळे, कॉन्क्लेव चेअरमन डॉ. राजीव चुग, ऑर्गनायझेशन सेक्रेटरी डॉ. शरद कपूर, डॉ. ओ. पी. खरबंदा,श्री.मनिष पाटील तसेच एफडीआय सेक्रेटरी डॉ. एन्जो (अमेरिका) यांच्या उपस्थितीत डॉ. चैत्रा यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ.चैत्रा मस्तुद यांनी दंतव्यंगोपचार तज्ञ…
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भूमी अभिलेख कार्यालय ता. हवेली जि. पुणे अंतर्गत येणारी मनपा हद्दीतील काही गावे नगर भूमापन कार्यालय पिंपरी-चिंचवड यांचेशी संलग्न करणेबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जमाबंदी आयुक्तांना दिले आहेत. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी नगर भूममापन कार्यालयाच्या कामकाजात सूसुत्रता आणण्याबाबत मागणी केली. महसूल मंत्री बावनकुळे यांना दिलेल्या निवेदानामध्ये म्हटले आहे की, तहसील हवेली कार्यालयातील काही गावे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील काही गावे यापूर्वी हवेली तहसील…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तंत्रज्ञानाने सध्या भारतासह जगाला भुरळ घातली आहे. सध्या जगात प्रत्येक महिन्यात नवीन बदल घडतो आहे. बदलाचा हा वेग प्रचंड असून त्याच्याशी जुळवून घेताना लोकांची दमछाक होताना दिसत आहे. एआय सारख्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे सातत्याने माहितीचा भडीमार मानवी मेंदूवर होत आहे. त्यामुळे, त्यातून काय घ्यावं? आणि काय सोडावं? आणि समोर येणाऱ्या मजकूराची विश्वासार्हता आणि सत्यता याबाबत साशंकता असल्याने परिणामी मानसिक तणावात वाढ होत आहे, असे मत बंगळुरू येथील नार्से मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे माजी संचालक प्रा. डाॅ.सुरेश मोनी यांनी मांडले. ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर महाराज विश्व शांती डोम येथे ‘इनोव्हेटिव्ह ग्लोबल…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘स्वत: कफल्लक राहून संतांनी फकिरी वृत्तीने समाजप्रबोधन केले. ‘फकीर गुरू’ तोच कित्ता गिरवत आहे!’ असे विचार ह. भ. प. किसनमहाराज चौधरी यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले. प्रणाली प्रकाशन आणि दिलासा साहित्य सेवा संघ आयोजित तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पी. एस. आगरवाल लिखित ‘फकीर गुरू’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात किसनमहाराज चौधरी बोलत होते. वृक्षमित्र अरुण पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच साहित्यिक सुभाष चव्हाण, गुणवंत कामगार संदीप पोलकम, डॉ. पी. एस. आगरवाल,प्रकाशिका शामला पंडित, दिलासाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांची व्यासपीठावर आणि ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे, शोभा जोशी, अशोकमहाराज गोरे, कैलास भैरट, जयश्री श्रीखंडे, जयश्री गुमास्ते,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या बहूउद्देशीय संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यगृहात चित्रपट संकल्पने अंतर्गत मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. २४ मार्च ते २५ मार्च २०२५ याकाळात पिंपरी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे पोस्टर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते आज बुधवारी (१९ मार्च) प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील, उप आयुक्त आण्णा बोदडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संयुक्त शिवसेनेचे दिवंगत माजी खासदार गजानन बाबर याचं अफाट कार्य पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना परिचितच आहे. गजानन बाबर यांना एक अभ्यासू , लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जायचे. त्याचं शहराच्या जडणघडणीत मोठ योगदान आहे. स्व. गजानन बाबर यांचा काळभोरनगर अथवा संभाजीनगर परिसरात अर्धाकृती पुतळा उभारण्यात यावा, अथवा त्यासाठी जागा उपलब्ध करावी, अशी मागणी शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहरात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. एमआयडीसीत काम करण्यासाठी राज्यातून मोठा कामगार वर्ग इथे लोटला होता. काबाडकष्ट…
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील पवना आणि इंद्रायणी नद्या या येथील जनतेसाठी जीवनदायीनी ठरलेल्या आहेत. परंतु या नद्यांमध्ये अनेक नाल्यांचे पाणी तसेच कारखान्यांतून निघणारे केमिकलयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने या नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत. त्यामुळे नद्यांमध्ये फेस दिसू लागला असून जलपर्णीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठवला. इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी शासनाने ५७७.१६ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. राज्य शासनाने त्यास मान्यता दिली असून तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ६० टक्के आणि राज्य शासनाकडून ४० टक्के अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत विविध गावांमध्ये…
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान घणाघाती भाषण करत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी पाणीपुरवठा, सार्वजनिक सुरक्षाव्यवस्था आणि अमली पदार्थांचा वाढता प्रभाव यासंदर्भात जोरदार मागण्या केल्या. अर्धवट योजना आणि ठेकेदारांवर कारवाईची मागणी जल जीवन मिशनअंतर्गत मावळमध्ये १२३९ योजना मंजूर असून, २०९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, इतर योजनांसाठी ४००० कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र, या योजनांपैकी ३५ ते ४० टक्के योजना अर्धवट स्थितीत आहेत. त्यांनी या अपूर्ण राहिलेल्या योजनांची चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. ग्रामीण भागात सीसीटीव्ही बसविण्याची गरज आमदार शेळके यांनी सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय व राज्यमार्गावर अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकामांमुळे वाहनधारकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी याची दखल घेत इतर शासकीय यंत्रणांच्या मदतीने गत काही दिवसात तीन टप्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत साडेतीन हजार अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पीएमआरडीएसह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमसी, पीसीएमसी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी संयुक्तरित्या विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात पहिल्या टप्यात नगर वाघोली रोडवर २९ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान राबवलेल्या ८२२ कारवाई ८२ हजार २०० चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामांचे…
