- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीट, ग्रीन सिटी अशा गोंडस नावाखाली पथारी,हातगाडी, स्टॉल धारकावर अन्यायकारक, अमानुष कारवाई करण्यात येत होती त्यांचे साहित्य जप्त करत हटवले जात होते या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यात सुनावणी होऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने कारवाई स्थगिती देत दिली आहे शहरातील १९७९२ विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे स्वागत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आज शहरातील पथारी,हातगाडी, टपरीधारकांनी हलगीच्या गजरामध्ये गुलाल उधळत निर्णयाचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, स्वराज…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दर्द से हमदर्द तक ट्रस्ट संस्थेच्या स्वयंसेवकांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी संस्थेचे विश्वस्त ॲड प्रकाश साळसिंगिकर यांनी संस्थेच्या वतीने सन्मानीय राज्यपाल यांना पुष्पगुच्छ,ॲड सुनीता खंडाळे यांनी स्मृतिचिन्ह व ॲड सतिश गोरडे यांनी शाल देऊन सत्कार केला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज गरीब आणि गरजू लोकांना तसेच कैद्यांना मोफत कायदेशीर सल्ला देण्यासाठी सुरु केलेल्या ‘लीगल एड ऑन व्हील्स’ (‘वकील आपल्या दारी’) या उपक्रमाचा राजभवन, मुंबई येथे शुभारंभ केला. ‘दर्द से हमदर्द ट्रस्ट’च्या वतीने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी राज्यपालांनी ‘वकील आपल्या दारी’ या उपक्रमासाठी सुरु केलेल्या विशेष वाहनाची पाहणी केली व सेवाभावाने…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने ‘व्हिजन@५० शहर धोरण’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सर्वच क्षेत्रांतील व्यक्तींशी संवाद साधून पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले. ‘व्हिजन@५० शहर धोरण’ उपक्रम अंतर्गत शनिवारी (२२ मार्च) ग.दि. माडगूळकर नाट्यगृह येथे बाह्य स्टेकहोल्डर ( External Stakeholder) कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना जांभळे पाटील बोलत होते. या कार्यशाळेस शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय…
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत केली. सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व आदिवासी विभागाच्या मागण्यांवर बोलताना त्यांनी राज्य सरकारकडून केवळ ६६% निधीच वापरण्यात आल्याचे सांगत वैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी अधिक निधी खर्च करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. औंध रुग्णालयावर वाढता ताण पुणे जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे औंध सांगवी परिसरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी वैद्यकीय यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाच्या आजवरच्या दुर्लक्षामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट होऊ शकलेली नाही, त्यामुळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील त्रिवेणीनगरमार्गे नाशिक महामार्ग तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचे काम पुर्णत्वावर आले असून तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडील विशेष भूसंपादन विभागाने १५ फेब्रुवारी रोजी संबंधित जागेचा ताबा हस्तांतरित केल्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले. सध्या या प्रकल्पाचे ८० टक्के काम पुर्ण झाले असून एकूण ४५० मीटर लांबीचा रस्ता विकसित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन अशा एकूण सहा लेनचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय, उर्वरित अनुषंगिक कामे जलद गतीने सुरू असून लवकरच पूर्ण क्षमतेने रस्ता सुरू करण्यात येणार आहे. प्रकल्पाची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) पुणे ते लोणावळा दरम्यानची तिसरी आणि चौथी मार्गिका करण्यासंदर्भात लवकरच राज्य सरकार सोबत बैठक घेतली जाईल. लोणावळावरून पुण्याला जाणारी दुपारी दीड वाजताची लोकल पुन्हा सुरू करण्याबाबत जनरल मॅनेजरला निर्देश दिले जातील. अमृत भारत योजनेत कर्जत रेल्वे स्थानकाचा समावेश केला जाईल. मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आठ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांना गती मिळेल असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे विभागाच्या चर्चेत खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न मांडले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार बारणे यांना दालनात…
– माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मोठे मोठे गृहप्रकल्प उभे राहत आहे. शहरातील औद्योगिक, रहिवाशी आणि व्यावसायिक वीज ग्राहकांची संख्या 30 लाखांहून अधिक झाली आहे. शहरातील नागरिकांना वारंवार उद्धभवणार्या वीजेसंदर्भातील समस्या तातडीने सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी महावितरण कंपनीचे स्वतंत्र मंडल कार्यालय स्थापन करण्यास यावे, अशी मागणी माजी उपमहापौर तुषार हिंंगे यांनी केली आहे. यासंदर्भात यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. तुषार हिंगे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापन होऊन 42 वर्षे झाली आहेत. शहरातील सुखसोई लक्षात घेऊन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पाच गावांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड नगर पालिकेची स्थापना करण्यात आली. गाव खेड्यांचे शहर, शहराचे महानगर, औद्योगिक नगरी, कामगार नगरी आणि आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेट्रो शहर असा नावलौकिक या शहराला प्राप्त झाला आहे. पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व वाढत असताना शहराच्या भौगोलिक कक्षा देखील वाढत गेल्या. यात पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या अनेक वैभव स्थळांचा समावेश आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने या विविध वैभव स्थळांचे वर्णन करणाऱ्या काव्यरचना एकत्र करून त्याचा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये शहरातील सर्वसामान्य नागरिकांपासून लेखक, कवी, रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. महानगरपालिका प्रशासनाने आता थकबाकीदारांच्या पाच लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ही जप्ती मोहिमेमध्ये महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होत आहेत. गुरुवार (20 मार्च) रोजी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी थेट महानगरपालिका कार्यक्षेत्रात चिखली, तळवडे, आकुर्डी, वाकड झोनमधील मिश्र, बिगनिवासी, व्यावसायिक थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त केल्या असून निवासी मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडणीची कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व आकारणी विभागामार्फत मालमत्ता कर आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात आहे. वारंवार आवाहन करून…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-पिंपरी चिंचवड शहरातील देशसेवेत सहभागी होणा-या युवकांमुळे शहराच्या लौकिकात भर पडली असून अशा युवकांचा अभिमान वाटत असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केले. देशसेवेसाठी लहानपणापासून भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झालेल्या पिंपळे गुरव येथील चिंतामण विष्णू बुरसे यांचा महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, चिंतामण बुरसे यांचे वडील विष्णू बुरसे,आई स्वाती बुरसे, विद्युत विभागातील प्रशांत जोशी हे उपस्थित होते. चिंतामणला आठवीत असल्यापासून भारतीय सैन्याचे पोस्टर्स पाहून भारतीय…
