Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खाजगी वैद्यकीय संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या किंवा घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह महापालिकेच्या इतर रुग्णालयात निरीक्षक म्हणून कामकाज करण्यासाठी संधी देण्याच्या विषयासह विविध आवश्यक विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आज झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. खाजगी व शासकीय संस्थेतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, दंत,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पवना, मुळा, इंद्रायणी वृक्षतोड थांबलीच पाहिजे’ असे फलक झळकवून आमदार अमित गोरखे यांनी विधानभवनात प्रवेश केला. पवना, मुळा, इंद्रायणी नदी पात्रातील वृक्षतोड थांबलीच पाहिजे, नदी विकास प्रकल्पाला विरोध दर्शविला. पिंपरी-चिंचवड ,मावळ हद्दीतील नदी विकास प्रकल्पाला पर्यावरणवादी संस्थांचा विरोध होत आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज विधानभवनामध्ये प्रवेश करताना आमदार अमित गोरखे यांनी ‘वृक्षतोड थांबलीच पाहिजे’ असे फलक हाती घेतले होते. ‘वृक्षतोड थांबलीच पाहिजे’, ‘आधी नद्या स्वच्छ करा’ आणि ‘नद्या वाचवू, निसर्ग टिकवू, अशा घोषणा देत आमदार अमित गोरखे म्हणाले, पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पाचशेहून अधिक सामाजिक संस्था या एकत्र येऊन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येत असलेल्या संरक्षण विभागाच्या झेंडे, काळोखे, हगवणे मळा परिसरातील नागरिक रस्त्यांच्या समस्येने त्रस्त आहेत. या भागात रस्ते करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने निविदा प्रसिध्द केली आहे. मात्र, संरक्षण विभागाची कामास हरकत आहे. त्यामुळे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन या रस्त्याबाबत साकडे घातले आहे. यावर संपूर्ण माहिती घेऊन सदन कमांडच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची ग्वाही सिंह यांनी दिली. खासदार बारणे म्हणाले, संरक्षण विभागामुळे स्थानिक नागरिकांचे मोठे क्षेत्रफळ बाधित झाले आहे. संरक्षण विभागाची हद्द असल्याने नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील झेंडे, काळोखे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथे काव्यात्मा साहित्य परीषदच्यावतीने विविध क्षेत्रातील राज्यभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल,श्रीफळ,पुस्तक,सन्मान चिन्ह ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. परिवर्तनाच्या चळवळीचा धागा पकडून ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण जीवनाचा मुलमंत्र देताना म्हणाले कि,”ज्यांना कुणीच नाहीत ,मुले बाळे ही नाहीत,त्यांनी त्यांच्या वंशासाठी झाडे लावावीत  म्हणजे आयुष्यात निराशा पदरी पडणार नाही असा मनोदय ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांनी पुरस्कार वितरणाच्या वेळी व्यक्त केला. वृक्ष स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात यातून माणसांनी  बोध घेणे गरजेचे आहे.परोपकाराचीभुमिका नेहमी घेतात स्वतः उन्हात राहून इतरांना सावली देतात तसे चांगल्या विचारांची माणसंच जिवनात प्रकाश निर्माण करतात  यातून समाजाला  दिशा मिळते असे…

Read More

उदय सामंत यांचे विधानसभेत आश्वासन मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (मंगळवारी) चिंचवड मतदारसंघातील पूररेषेतील अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला अतिरिक्त टीडीआर (TDR) देण्यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरादाखल नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या यांच्या आदेशाने विधिमंडळात नगर विकास विभागाची जबाबदारी असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संयुक्त समिती नेमण्याचे आश्वासन दिले. विधानसभेत चर्चा करताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, जलसंपदा विभाग, महानगरपालिका, नगर रचना संचालनालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), पर्यावरण विभाग आणि अन्य तज्ज्ञ सदस्यांची एक संयुक्त समिती स्थापन केली जाईल. ही समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पूररेषेतील अधिकृत बांधकामांच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या अनेक जिल्ह्यातील कंत्राटी कांमगारांच्या विविध प्रलंबित समस्यां सोडवण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण यांना भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने पत्र देऊन बैठकीची मागणी केली होती त्या नुसार 3 एप्रिल रोजी 11 वाजता ही बैठक प्रकाश गंगा मुंबई मुख्यालयात होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी कळवले आहे . तत्कालीन ऊर्जामंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 9 सप्टेंबर 24 रोजी बैठक घेऊन जे इतिवृत्तांत दिले होते त्यातील महापारेषण कंपनीतील विविध पदांच्या नियमित भरती प्रक्रिये मध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना जादा 10 मार्क द्यावे व त्यांना वयाच्या 43 वर्ष वयापर्यंत नोकरीसाठी फॉर्म भरण्यास…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ज्ञानदेव संगीत क्लासेस आयोजित शांतीब्रह्मा श्री एकनाथ महाराज षष्ठी निमित्त त्रिदिनी किर्तन महोत्सव संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजक संगीत विशारद श्री ह.भ.प. भागवत महाराज भाग्यवंत अध्यात्मभूषण महिला कीर्तनकार भाग्यश्रीताई भाग्यवंत यांच्या संकल्पनेतून प्रथम दिवसाचे कीर्तनरुपी सेवा ह.भ.प. चंद्रकांत महाराज यादव त्याचबरोबर द्वितीय दिवसाची कीर्तनसेवा ह.भ.प. संतोष महाराज कौठाळे आणि काल्याचे किर्तनरुपी सेवा ह.भ.प.श्री.प्रेमानंद महाराज शास्त्री यांचे झाली. याप्रसंगी आळंदीतील समस्त वारकरी दिगज कलाकार मित्रपरिवार उपस्थित होते. त्याचबरोबर ज्ञानदेव संगीत क्लासेस मधील सर्व साधक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित राहून भजन सेवा आणि हरीपाठ संपन्न झाला. आळंदी पंचक्रोशी व इतर परिसरातील माननीय दिग्गज वरिष्ठ मंडळी यांनी सहकार्य करुन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भक्ती उत्सवात अभंग, भारुड, भजनांचे श्रवण करताना साक्षात ईश्वरच समोर आल्याची अनुभूती मिळाली. परंपरा जपण्यासाठी, सामाजिक स्थैर्य, सुसंस्कृत समाजासाठी लोकोत्सवासारखे कार्यक्रम झाले पाहिजेत‌. ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन संत तुकाराम महाराजांचे अकरावी वंशज हभप प्रशांत महाराज मोरे यांनी केले. महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत – लोकोत्सव हा महाराष्ट्र व ओडिसा दोन्ही राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारा तीन दिवसीय उत्सव साजरा होत आहे. लोकोत्सवाचे संयोजन पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनने केले असून तीन दिवसीय लोकोत्सवाचे उद्घाटन प्रा. रामकृष्ण…

Read More

चिंचवड येथे गुरुवार, २७ मार्चपासून पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव यांनी गुरुवार, दिनांक २७ मार्च २०२५ पासून पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचे आयोजन केले आहे. बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथील स्वामी समर्थ मठाच्या प्रांगणात गुरुवार, दिनांक २७ मार्च २०२५ रोजी पहाटे ४:३० वाजता ‘श्रीं’चा पंचामृत अभिषेक व पूजा आणि ६:०० वाजता उत्सव कलश स्थापनेने उत्सवाचा प्रारंभ होईल. सायंकाळी ६:०० वाजता अवधूत गांधी यांचा अफलातून गाण्यांचा कार्यक्रम होईल. शुक्रवार, दिनांक २८ मार्च रोजी सायंकाळी ६:०० वाजता भक्तिगंधर्व मुकुंद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव, शिवजयंती महोत्सव चे औचित्य साधून हिंदू स्वाभिमान दिवसानिमित्त जेष्ठ वक्ते पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांना “हिंदू कुलभूषण” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. गुरुवारी (दि. २७ मार्च) सायंकाळी ५:३० वाजता निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी “सनातन राष्ट्रवाद आणि आजचा युवा” या विषयावर पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे व्याख्यान देणार आहेत, तसेच राष्ट्रप्रहरी या रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल हे भूषविणार आहेत,…

Read More