- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक आरोग्य दिन सप्ताह निमित्त लोकांचे आरोग्य सुदृढ राहावे,आजारापासून दूर राहावे,तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी आदी प्रबोधन व्हावे म्हणून वेदस्पर्श क्लिनिक आणि वुई टुगेदर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोयल गरिमा हॉल,केशव नगर चिंचवड येथे आयुर्वेद माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या वेळी वैद्य गीतांजली क्षिरसागर यांनी आयुर्वेद, पंचकर्म, आहार मार्गदर्शन तसेच व्यायामाचे महत्त्व अश्या विविध विषयांवर अत्यन्त महत्त्वपूर्ण व लोकांना समजेल अश्या पद्धतीने माहिती दिली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे हे उपस्थित राहून लोकांना आरोग्याचे महत्व,आहार,व व्यायाम आदी मनोगत व्यक्त केले. उपस्थित नागरिकांमधुन तीन लक्की ड्रॉ काढून विजेत्यांना मान्यवरांच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे शहरासह परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने संयुक्तरित्या अतिक्रमणे काढण्यात येत आहे. या कारवाईचे दोन टप्पे पुर्ण झाले असून तिसऱ्या टप्यातील कारवाईत २६ मार्चपर्यंत सव्वाचार हजार अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली आहे. संयुक्तरित्या सुरु असलेल्या या कारवाईत पीएमआरडीएसह पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस, पीएमसी, पीसीएमसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, एसएसईबी आदी विभागांमार्फत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे यादरम्यान आतापर्यंत अनेक स्थानिकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घेतली आहे. सध्या तिसऱ्या टप्यात पुणे – सातारा रोड (नवले ब्रिज ते सारोळे), हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक व प्रशासन यांच्यातील सुसंवाद वृद्धिगत होण्यासाठी या जनसंवाद सभा उपयुक्त ठरत आहेत,’ असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी (२४ मार्च २०२५) जनसंवाद सभा अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे उप आयुक्त तथा जनसंवाद समन्वयक मनोज लोणकर, ग क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, कार्यकारी अभियंता झहिरा मोमीन यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध…
मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी एचआर यांनी एआय वापरावे – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव
पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एआय सारखे उत्कृष्ट तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे, अनेक क्षेत्रात ते प्रभावीपणे काम करत आहे. या तंत्रज्ञानात मानवी भावनांची कमतरता आहे. त्यामुळे एआय सोबत मानवी संवेदना टिकून राहणं गरजेचं आहे. आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात देखील याचे महत्व वाढत आहे. याचा वापर मनुष्यबळ संसाधन अधिकाऱ्यांनी मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी करून घेतला पाहिजे, तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतः सतत अपडेट राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसयू) मधील एचआर शेपर्स च्या सहकार्याने दिल्ली येथे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘दुर्गा टेकडीचा पुनर्विकास करताना निसर्गाचे संवर्धन करण्यास महत्त्व दिले जाणार आहे. या विकास कामाच्या अनुषंगाने नागरिकांना सूचना देता याव्यात, दुर्गा टेकडीच्या विकासात नागरिकांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा व्हावी, यासाठीच ‘दुर्गा टेकडी उद्यान डिझाईन विचारसरणी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. आता या कार्यशाळेत आलेल्या नागरिकांच्या सूचनांवर दुर्गा टेकडीचा पुनर्विकास करताना नक्की विचार करण्यात येईल,’ असे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभागातील दुर्गा टेकडीचा पुनर्विकास करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन असून या अनुषंगाने नागरिकांशी चर्चा करण्यासाठी रविवारी (२३ मार्च) दुर्गा टेकडी येथे ‘दुर्गा टेकडी उद्यान डिझाईन विचारसरणी कार्यशाळा’ आयोजित…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. २३ व प्रभाग क्र. २४ मौजे थेरगाव येथील तुळजाई कॉलनी आणि बापुजी बुवा नगर येथील एकूण ३ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ५ हजार, २ हजार १४५ आणि ३ हजार ३६० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली एकूण ३ बांधकामे मिळून एकूण सुमारे १० हजार ५०५ चौरस फुट क्षेत्रफळ असलेली बांधकामे निष्कासित करण्यात आली. आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान उपअभियंता सुनिल अहिरे,…
मालमत्ताकर वाढीच्या विविध उपाययोजनांसाठी महानगरपालिकेकडून थेट येणाऱ्या प्रस्तावामधून राज्यस्तरीय निवड समितीकडून निवड पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ता कर संकलनामध्ये वाढ होण्यासाठी राबवलेल्या उपाययोजनांची दखल राज्य सरकारने घेतली आहे. महानगरपालिकेला राज्य सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार व दहा लाखांचे बक्षीस मिळाले आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. पिंपरी चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत आहे. या वाढणाऱ्या शहरामध्ये दरवर्षी मालमत्तांच्या संख्येमध्ये सुध्दा झपाट्याने वाढ होत आहे. नागरिकांना पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेचा मालमत्ताकर हा उत्पन्नाचा स्त्रोत असून करसंकलन करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना केल्या. यामध्ये मालमत्ताकर वाढीसाठी करसंकलन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढती पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता रहाटणी प्रभागात पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या आणि विद्युत खांब उभारण्याच्या कामास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरवात करण्यात आली आहे. तसेच १२ मीटर डीपी रोडवर अनेक महिन्यांपासून रखडलेल्या ड्रेनेज लाईनचे कामही चालू करण्यात आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते देविदास तांबे यांनी यासंदर्भात महापालिकेच्या जनसंवाद सभेत सातत्याने मागणी केली होती. अखेर आमदार शंकर जगताप यांच्या सहकार्याने त्यांच्या या मागणीला यश आले आहे. रहाटणी प्रभागातील गणेश कॉलनी, शिवधाम कॉलनी, कारगिल कॉलनी, शिवलीला कॉलनी आदी भागांमध्ये अद्यापही पाण्याची पाईपलाईन, तसेच विजेचे विद्युत खांब आदी मूलभूत सुविधा महापालिकेच्या वतीने पुरविण्यात आल्या नव्हत्या.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचा प्रस्ताव आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले. अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्षपदी विराजमान झाल्याचा मला मनापासून आनंद आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. ”भारताचे संविधान किती मोठे आहे. चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान झाले. ऑटो रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री झालेत. आता तर टपरीवर ज्यांनी काम केले ते उपाध्यक्ष झालेत. याबद्दल विरोधकांचेदेखील स्वागत करतो. कारण त्यांनी ही निवडणूक बिनविरोध केली.” असे फडणवीस विधानसभेत म्हणाले. विधानसभा उपाध्यक्षपदी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्व.अण्णासाहेब पाटील त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच आज महाराष्ट्र मजदुर संघटना कार्यरत आहे. स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त कामगार मित्र शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त केसबी चौकातील अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य माथाडी कामगार उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर ६०-७० च्या कालखंडात कामगार मोठ्या प्रमाणात असंघटित होते. तेव्हा कायदे नव्हते त्यामुळे त्यांचे शोषण व्हायचे. आरोग्याच्याही समस्या होत्या. अशा परिस्थितीत स्व. अण्णासाहेब पाटील यांनी कामगारांचे संघटन केले आणि त्यांच्या व त्यांच्या बरोबरील सहकार्याच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात सर्वात प्रथम असंघटित कामगारांसाठी कायदा तयार करण्यात आला. त्यामुळेच अण्णासाहेब…
