Author: maharashtrabreakingnews.com

औंध,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “मोठी स्वप्ने पाहा, नव्या संधी शोधा, आणि संपूर्ण जगाला दाखवून द्या की, ग्रॅज्युएशनचा सर्टिफिकेट फक्त कागदाचा तुकडा नाही, तर यशाची सुरुवात आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे माजी मुख्य अभियंता प्रल्हाद साळुंखे यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. सदर कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ औंधचे प्रेसिडेंट राजेंद्र शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, उपप्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा.डॉ. तानाजी हातेकर, प्रा. सुशील कुमार गुजर, डॉ. रेश्मा दिवेकर, माजी उपप्राचार्य रमेश रणदिवे, प्रा. सौरभ कदम, प्रा. सविता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवातील प्रथम पुष्प गायक, संगीतकार अवधूत गांधी आणि सहकारी यांनी भक्ती – शक्तीगीतांच्या अफलातून मैफलीच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड)चिंचवडगाव येथे गुंफले. याप्रसंगी माजी नगरसेवक मधू जोशी, श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, खजिनदार गणपती फुलारी, सहसचिव मीनल देशपांडे, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, माधव कुलकर्णी आणि हेमा दिवाकर यांची प्रमुख उपस्थिती होती. “अलंकापुरी ज्ञानभूमी पवित्र…” या भक्तिरचनेने…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘देशी खेळ कुस्ती मातीत पूर्वापार खेळत होते. आता गादीवरची कुस्ती आली आहे. त्याचा अभ्यास आणखी वेगळा असतो. त्यामुळे जागतिक क्रीडा स्पर्धेत टिकायचे असेल तर आपल्या मानसिकतेमध्ये तसेच तंत्रात आमूलाग्र बदल करणे काळाची गरज आहे!’ असे प्रतिपादन बजाज ऑटो लिमिटेड, आकुर्डी कारखान्याचे माजी क्रीडा अधिकारी वसंत ठोंबरे यांनी पिंपळे गुरव येथे अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानच्या वतीने पिंपळे गुरव येथे ‘जागतिक क्रीडा स्पर्धा आणि आजचा भारत’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. याप्रसंगी क्रीडा समालोचक पंकज पाटील, जानकीदेवी ग्रामविकास संस्थेचे माजी सचिव विश्वास सोहनी, एलसीसीआयए पीसीएमसी चाप्टरचे क्रीडा संयोजक महेश बोरोले, मराठवाडा जनविकास संस्थेचे अध्यक्ष…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माता ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. राजमाता जिजाऊ यांच्यामुळे शिवाजी हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. या मातेचे पूजन ही आपली संस्कृती आहे. मग ती भूमाता, राजमाता, किंवा सामान्य जणांची माता असो ती सदा सर्वकाळ वंदनीय आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले. निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे हिंदू प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू स्वाभिमान दिवसानिमित्त व शिवजयंतीचे औचित्य साधून पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांना “हिंदू कुलभूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच राष्ट्रप्रहरी या रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, , शिवजयंती उत्सवाचे समन्वयक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तुम्ही जसे निसर्गाला द्याल तसे फळ तुम्हाला निसर्ग देतो. सध्या पर्यावरणाशी संबंधित अनेक बदल होत असल्याचे दिसून येते. स्वच्छ, सुंदर पर्यावरणासाठी झाडे लावून ती जगवली पाहिजेत; तरच आपण जीवन चांगले जगू शकतो. आपली भावी पिढी सुदृढ, निरोगी राहू शकेल. त्यामुळे पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्ती रक्षणाचे कार्य करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे मत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रमुख ले. कर्नल विनीत नारायण यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयु) केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या वतीने पीसीयु वसुंधरा वृक्षारोपण मोहीम आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेमध्ये सदस्य म्हणून पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. परभणी येथे चिमुकलीवर झालेले अत्याचाराला वाचा फोडून आरोपीवर पोस्को कायद्या अंतर्गत कारवाई करावी राज्य परिवहन महामंडळ बसचे विद्युतीकरण करावे अशा राज्यस्तरीय मुद्द्यांबरोबरच पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक प्रश्न देखील या अधिवेशनात मांडण्याची संधी मला मिळाली. यामध्ये पवना नदी प्रदूषण तसेच रिव्हर फ्रंट काँक्रिटीकरण, पिंपरी चिंचवड महापालिकेतील अंतर्गत रस्त्याची झालेली दुर्दशा व निकृष्ट दर्जा, पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आयटी विभागात झालेला मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार, एमआयडीसी संभाजीनगर व शाहूनगर भागात युडीपीसीआर धोरण लागू…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज सेवानिवृत्त होणा-या अधिकारी,कर्मचा-यांनी अनेक वर्षांपासून महापालिकेने सोपविलेली कामे व जबाबदा-या प्रामाणिकपणे पार पाडत उत्तम कामकाज केले आहे. यासारख्या अधिकारी,कर्मचा-यांमुळे महापालिकेस ई गव्हर्नन्स, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता स्पर्धा अशा विविध क्षेत्रात प्रथम क्रमांकांचे पुरस्कार मिळत आहेत असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आणि सेवानिवृत्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे माहे मार्च २०२५ अखेर नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या २१ आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या ६ अशा एकुण २७ कर्मचा-यांचा आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन देताना ते बोलत…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना काय काळजी घ्यावी, करिअरची निवड कशी करावी, अपयश आल्यानंतर खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करीत यशाला गवसणी कशी घालावी, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी विद्यार्थ्यांना करतानाच एकप्रकारे जीवनात यशस्वी कसे व्हावे, याचा कानमंत्रच शाळकरी विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होते महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी मधील उद्यमनगर येथील क्रीडा प्रबोधिनी शाळेत आयोजित केलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे. यावेळी जांभळे पाटील यांनी व्यासपीठावर न बसता थेट विद्यार्थ्यांसोबत बसून त्यांच्याशी खेळ, अभ्यास, छंद आणि भविष्यातील संधी आदी विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. शाळकरी विद्यार्थ्यांचा परीक्षा जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना…

Read More

नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी विभागीय करसंकलन कार्यालयेसुध्दा राहणार सुरु पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना मालमत्ताकर भरण्याचे आवाहन विविध माध्यमातून वारंवार करण्यात येत आहे. अद्यापही निवासी मालमत्ताधारकांकडून जवळपास २७४ कोटी तर व्यावसायिक मालमत्तांधारकांकडून १२४ कोटींचा असा एकूण जवळपास ३९८ कोटींचा मालमत्ताकर येणे बाकी आहे. आर्थिक वर्ष संपायला केवळ ३ दिवस शिल्लक असताना करदात्यांना आपला कर भरण्यास सोयीचे व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाची पुढील १८ विभागीय कार्यालये व कॅश काऊंटर्स २९ मार्च रोजी सकाळी ९.४५ ते रात्री ०९ वाजेपर्यंत तसेच रविवार ३० मार्च, गुढीपाडव्याच्या दिवशी व ३१ मार्च, रमजान ईदच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत (शेवटचा व्यक्ती…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साऊ ज्योति सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांचे वतीने कु. नवले लता अण्णा यांना प्रिया थोरात ( असिस्टंट कमिशनर पोलिस क्राइम ब्रांच मुंबई ) यांचे हस्ते राज्यस्तरीय शिक्षक रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवले मॅडम या सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी पुणे 35. या शाळेत शिक्षिका म्हणून गेली 17 वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासाठी त्यांना संस्थेचे संस्थापक सचिव गोविंदराव दाभाडे व मुख्याध्यापक श्री. माळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Read More