- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘छत्रपती संभाजीराजे यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही; तर त्यापासून अनेक योद्धे अन् वीर यांनी प्रेरणा घेऊन स्वराज्याचे रक्षण केले!’ असे प्रतिपादन ह. भ. प. मानसी बडवे यांनी बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवात ‘स्वराज्यरक्षकाची गाथा’ या विषयावरील संगीत व्याख्यानाच्या माध्यमातून मानसी बडवे यांनी तृतीय पुष्प गुंफले. मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, हेमा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक पातळीवरील विकासाचा रेटा पाहता भारताला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासावर भर द्यावा लागेल; तरच भारत मोठी प्रगती करू शकेल. आर्थिक उदारीकरणामुळे जागतिक पातळीवरील मोठमोठ्या संस्था आपले बस्तान बसवत आहे. आपण स्वतःभोवती सुरक्षा कवच तयार करून भारतातील कृषी, उद्योग व्यवसाय यासाठी सुरक्षित व्यापार करू शकणार नाही. आपल्याला जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. भारत सरकार या दृष्टीने वाटचाल करताना दिसत आहे. शेती विषयक शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच कृषी उद्योजकांनी जागतिक स्पर्धेचा विचार करून पुढील वाटचाल ठरवली पाहिजे. कृषी क्षेत्राचा मोठा वाटा भारताच्या विकासामध्ये यापुढील काळात राहील, असे स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डेअरी फार्म येथे उड्डाणपूल बांधण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून आतापर्यंत या प्रकल्पाचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर पिंपरी व परिसरातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होणार आहे. पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाला मार्च २०२३ मध्ये कार्यादेश देण्यात आला होता. मात्र, या पुलाच्या बांधणीसाठी काही वृक्ष अडथळा ठरत असल्याने कामास विलंब झाला. महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे एप्रिल २०२३ मध्ये वृक्ष तोड व पुनर्रोपणासाठी सादर केलेल्या प्रस्तावास ऑगस्ट २०२३ मध्ये मंजुरी मिळाली. पुलाच्या जागेत अडथळा ठरणारे १४२…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशामध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ही स्पर्धा सुरू असून यामध्ये पिंपरी चिंचवड शहर सहभागी झाले आहे. या स्पर्धेत नागरिकांच्या अभिप्राय महत्त्वाचे असून त्यास अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या पिंपरी चिंचवड शहराला अव्वल आणण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपला स्वच्छतेविषयक अभिप्राय द्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ला सामोरे जाताना जोरदार तयारी केली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेविषयक विविध कृतीशील उपक्रम देखील राबवले आहेत. तसेच ओला, सुका कचरा विलगीकरण, होम कम्पोस्टिंग, कापडी…
३१ मार्च पूर्वीच कराचा भरणा करून जप्तीची कटू कारवाई टाळावी करसंकलन विभागाचे थकबाकीदारांना आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन दिवस बाकी असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ताधारकांना तात्काळ कर भरण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबतच थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाईस वेग आला असून ज्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला नाही अशा मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्यात येत आहे. वारंवार आवाहन करूनही थकबाकीदारांनी मालमत्ताकर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने ऐन सणासुदीच्या काळामध्ये करसंकलन विभागाला कटू कारवाई करण्याची वेळ आली आहे. आत्तापर्यंत तब्बल १०६९ हून अधिक मालमत्तांवर मालमत्ता जप्तीची कारवाई व जवळपास १०२० मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्यात आले आहे. त्याबरोबरच ४३४ मालमत्ता लिलावाच्या उंबरठ्यावर…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, एमआयटी-एडीटी विद्यापीठ, पुणे येथील नाट्य विभाग आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर , संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राज कपूर नाट्यगृह, पुणे येथे झालेल्या ‘रंग रूपक’ या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात भारतीय नाट्य शास्त्रावर अतिशय मौलिक मंथन पार पडले. ‘रंग रूपक’ हा परिसंवाद नाट्य रसिकांसाठी पर्वणीच ठरला. भारतीय ज्ञान परंपरेतील नाट्य संस्कृतीचा प्रसार व्हावा या हेतूने “भारतीय ज्ञान परंपरेतील नाट्यशास्त्राची भूमिका” ही विषयवस्तू घेवून आयोजित या परिसवांदात राष्ट्रीय स्तरावरील नामांकित नाट्यदिग्दर्शक/नाट्यकर्मी यांनी तीन दिवस विद्यार्थी व सहभागींना मार्गदर्शन केले. या परिसंवादाचे उद्घाटन, राष्ट्रीय नाट्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी निवासस्थानी तसेच जनसंपर्क कार्यालयासमोर गुढी उभारत पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासाचा संकल्प सोडला. आगामी काळात हिंदू धर्माचा जाज्वल्य अभिमान बाळगत शहर विकासासाठी भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून चांगल्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचे काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आमदार महेश लांडगे यांनी रविवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. तसेच सकाळी निवासस्थानी तसेच भोसरी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयासमोर गुढी उभारत त्यांनी नागरिकांच्या शुभेच्छा देखील स्वीकारल्या. कुटुंबीय, सहकारी तसेच नागरिकांच्या उपस्थितीमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहर विकासाच्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा निर्धार यावेळी त्यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भगवा ध्वज अखंड हिंदुस्थान, शौर्य, त्याग, बलिदान आणि स्वामिनाचे प्रतिक आहे. प्रभू श्रीरामांची, वैष्णव बांधवांची विद्वत्ता, महानता सांगणारे हिंदू धर्माचे निशाण आणि वारकरी सांप्रदायाची पताका आहे, असा भगवा ध्वज पिंपरी-चिंचवड शहरात दिमाखात व अभिमानाने फडकला पाहिजे, अशी समस्त वैष्णव बांधव, हिंदुत्ववादी संघटना, शिवशंभु प्रेमींची इच्छा होती. अखेर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून, चऱ्होलीतील थोरल्या पादुका मंदिराजवळ २०० फूट उंच भगवा ध्वज प्रत्येकाला हिंदू संस्कृतीचा, हिंदुत्ववादी जाज्वल्य अभिमानाचा संदेश देत राहील, अशा भावना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत. चऱ्होलीतील थोरल्या पादुका मंदिराजवळ २०० फुटी उंच भगवा…
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर गुढी पाडव्या निमित्त प्रथा परंपरांचे पालन करीत संस्थान तर्फे चंदन उटीतून श्री गिरिजात्मक ( श्रीक्षेत्र लेण्याद्री ) श्री’चे गणेशावतारातील वैभवी रूप साकारण्यात आले. श्री नरसिव्ह सरस्वती स्वामीमहाराज मठात श्रींचे पुजारी सुधीर गांधी परिवार तर्फे परंपरेने श्रीचे वैभवी गणेश अवतार रूप परिश्रम पूर्वक साकारण्यात आले. श्रींचे गणेशावर वैभवी रूप पाहण्यासह दर्शनास भाविक नागरिकांनी आळंदीत मंदिरांत गुढी पाडव्या निमित्त गर्दी केली होती. माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढी पाडव्या पासून श्रीचे संजीवन समाधीवर चंदन उटी लेप लावण्यास प्रारंभ होत असतो .चैत्र महिन्यातील पहिली चंदन उटी गुढी पाडव्यास श्रीचे…
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गुढीपूजन पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची आकर्षक आरास, बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नीक गणरायाला अभिषेक केला. तसेच आरती करून गुढीपूजन करीत त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील…
