- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वूई टुगेदर फाउंडेशन नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निस्वार्थी उपक्रम घेत असते.खर तर अनेक वेळा समाजात काही लोकांचे कर्तृत्व असूनही त्यांचा गौरव होत नाही किंवा पाहिजे तसे सहकार्य मिळत नाही.ते नेहमी कौतुक व फायद्यापासून वंचित राहतात. वडगाव मावळ,नवलाख उंबरे मधील 3 मुली 2 मुले असे पाच कबड्डी खेळाडू नुकतेच हिमाचल प्रदेश मध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी गेले होते त्यांनी मोठे यश प्राप्त केले खर तर ही खूप मोठी स्पर्धा होती यासाठी या मुलांनी अभ्यासा सोबत कबड्डी सराव सुरु ठेवला होता ही तारेवरची कसरत करून त्यांनी विजय प्राप्त करून आणला.त्यांचे प्रशिक्षक यांनी अत्यन्त स्वतःला त्या मुलांसाठी झोकून देऊन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशातील औद्योगिक, सार्वजनिक,सहकारी, खासगी क्षेत्रातील 67 लाख सेवानिवृत्त ‘ईपीएस’ कर्मचारी पेन्शनधारक आहेत. त्यांना अंत्यत तुटपुंजे केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळते. मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही अपुरे आहे. त्यामुळे सर्व ‘ईपीएस’ 95 निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधांची तरतूद तसेच या योजनेत समाविष्ट नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्यांसह त्यांना नऊ हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. लोकसभेत बोलताना खासदार बारणे यम्हणाले की, ‘ईपीएस’धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ व्हावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. सभागृहात शून्य तासांतर्गत हा मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु आजपर्यंत या समस्येचे निराकरण झाले नाही. 16 नोव्हेंबर 1995 पासून लागू…
सेवाभाव, बंधूता, मानवता ईस्लामची शिकवण प्रत्येकांने अंगीकारावी – मुफ्ती मौलाना मिनाज शेख यांचे आवाहन
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. भोसरी, घरकुल, निगडी, चिंचवड, आकुर्डी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, पिंपरी, काळेवाडी, नेहरूनगर, कासारवाडी, दापोडी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, रावेत परिसरात ईदची नमाज सकाळी 8 ते 10 दरम्यान विविध मशिदीत, मदरसा ,ईदगाह मैदानात धर्मगुरू मुफ्ती, मौलाना, हाफीज साहब यांनी मुस्लिम बांधवांना नमाज पढविला. चिंचवड परिसरात चिंचवडगाव-आलमगीर शाही मशीद, ( इदगाह मैदान ) येथे मौल्लाना मिनाज शेख , मौल्लाना इनामुल हक, यानी नमाज पढविला . चिंचवड स्टेशन-मजीद ए अम्मार- येथे हाफीज मौन्नूद्दीन, मोहननगर-मजीद ए हिदायतूल मुस्लमीन-हाफिज वसीम साहब, विद्यानगर-मजीद ए अक्सा-मौल्लाना इम्रान मोन्नुद्दीन साहब, आकुर्डी-मजीद ए मदिना, आकुर्डी-मजीद ए…
– पाच हजार रिक्षा चालक, एक लाख नागरिक जोडण्याचा निर्धार “आमचा ऑटो, ऐप मेट्रोसी जोडणार पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ओला-उबेर रिक्षा चालकांनी आता “आमचा ऑटोचा,पर्याय निर्माण केला आहे. प्रायोगिक तत्वावर याची सुरूवात केली आहे. भविष्यकाळात पाच हजार रिक्षा चालक आणि एक लाख नागरिक जोडण्याचा निर्धार महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी व्यक्त केला. पिंपरी येथे गुढीपाडव्यानिमित्त नुकतीच रिक्षा चालकांची बैठक पार पडली. या वेळी बाबा कांबळे यांनी ही माहिती दिली. प्रवाशांना योग्य, तत्पर सुविधा मिळावी म्हणून “आमचा ऑटो. ही सुविधा निर्माण करण्यात आल्याचे या वेळी बाबा कांबळे म्हणाले. या वेळी. मेट्रोचे अधिकारी डॅनियल सर , महाराष्ट्र रिक्षा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खान्देश मराठा पाटील समाज संघ चा 6वा वर्धापनदिन समारंभ नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहर्तावर आकुर्डी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ग. दि.माडगूळकर नाट्यगृह आकुर्डी येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे ग्रामीणचे युवा आमदार राघवेंद्र भदाणे हे होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे, चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक राहुल कलाटे,पाटील उद्योग समूहाचे चेअरमन उद्योजक दिपक काशिनाथ पाटील, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, माजी नगरसेवक देविदास पाटील, रवींद्र सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी अनिल पवार, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ उपस्थित होते.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- ‘देश की रक्षा कौन करेगा..’, जय श्रीराम.. जय शिवराय… अशा गगनभेदी घोषणा देत ‘‘हिंदू माता-भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या प्रवृत्ती या पुढील काळात मान खाली घालून गेल्या पाहिजेत. असा हिंदूत्त्वाचा आवाज करारा पाहिजे, असा हुँकार प्रखर हिंदत्त्वाचा पुरस्कार करणारे भाजपाचे आमदार महेश लांडगे दिली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी शोभायात्रा म्हणून ‘सोशल मीडिया’वर हिंदूत्त्ववादी तरुणांनी धुरळा उडवून दिला आहे. हिंदू नववर्ष गुढीपाडवा या निमित्ताने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्रखड व सर्व सलग्न संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या हिंदू नववर्ष शोभा यात्रेचे आयोजन मंचर तालुका आंबेगाव येथे करण्यात आले होते. या शोभा यात्रेस सुमारे 30…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराज की जय !, जय श्रीराम !, प्रभू श्रीराम चंद्र की जय !, भारत माता की जय ! अशा घोषणा.. भगवे झेंडे, डोक्यात परिधान केलेल्या भगव्या टोप्या आणि नागरिकांचा शिगेला पोहोचलेला उत्साह अशा भारलेल्या वातावरणात मोशी येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा पार पडली. त्यात विशेष आकर्षण ठरले महिलांचे झांज पथक, ढोल ताशा पथक. शोभा यात्रेच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभाग घेतला. मोटारसायकलसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. भाजपाचे प्रखर हिंदूत्वववादी नेते आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने गुढीपाडव्यानिमित्त ही शोभायात्रा पार पडली. रविवारी (दि.३०) मोशी येथील वूड्स…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नियोजित स्मारकाच्या कामात दिरंगाई बद्दल “निषेध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विशाल जाधव ओबीसी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे प्रसिद्धी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त शेखर सिंह यांना वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा क्रांतीसुर्य जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक संदर्भात कुठल्याही प्रकारचा जबाबदारी घेत नसल्याचे आढळून आल्यामुळे एक एप्रिल 2025 रोजी सकाळी ठीक दहा वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेट समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय पिंपरी, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकालगत च्या जागेत क्रांतीसुर्य महात्मा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम, २०२४’ हे विधेयक प्रस्तावित करून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. या विधेयकास विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या तीव्र विरोध असल्याचे सध्या तरी चित्र असले तरी ips लॉबीच्या जोरावर पोलिस राज निर्माण करू पहात असलेल्या बहुमताच्या जोरावर सरकार हे बिल पारित करू श्यकते, असे भाकीत मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर व शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी व्यक्त केली आहे . महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक हे आता सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३ या नावाने आले असून, हे विधेयक जन सुरक्षा नसून लोकशाहीस धोका आहे. विधेयकाबाबतच्या सूचना व हरकती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चिंचवड मतदारसंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली असून, या भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या अधिवेशनात त्यांनी मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत, सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिवजी खाडे, पिंपरी-चिंचवड भाजपचे कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके तसेच जिल्हा उपाध्यक्ष राजू दुर्गे, मा.उपमहापौर सचिन चिंचवडे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, बाबासाहेब त्रिभुवन, विनायक गायकवाड, अभिषेक बारणे, अश्विनी चिंचवडे,…
