Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशी क्षेत्रात किंवा सोसायटी परिसरात दारुच्या दुकांनामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात आमदार महेश लांडगे यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. दारु दुकांनदारांच्या मनमानीबाबत नियमांची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि नियमबाह्य काम करणाऱ्या दारु दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे हा मुद्दा महाराष्ट्रभरात चर्चेत आला. त्याला सर्वपक्षीय आमदारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सकारात्मक उत्तर दिले होते. अखेर त्याचा ‘रिझल्ट’ दिसू लागला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दारु दुकानांच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे निर्देश सभागृहात दिले. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी संबंधित विषयाला अनुसरुन भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरातील नियमबाह्यपणे दारु विक्री व्यावसाय करीत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक बांधिलकी जपत आणि जनसंपर्क वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने युवा नेते विशाल वाकडकर (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे आयोजन अजय कांबळे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्याच दिवशी दुपारी २ वाजता वाकड येथे बांधकाम कामगारांसाठी शिधा वाटपाचा उपक्रम राबवला जाणार आहे. विशाल भाऊ वाकडकर यांच्या वाढदिवसाच्या मुख्य दिवशी, ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता वाकड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ई टॅक्सी ला दिलेली मंजुरी महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावी, अन्यथा या निर्णयाला पुणे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रभर तीव्र विरोध करणार असल्याची माहिती, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, व ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले, काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र सरकारने मुंबई येथे टू व्हीलर टॅक्सीला परवानगी दिली आहे, खरं तर मुंबई येथील ऑटो टॅक्सी संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध करणे आवश्यक होते परंतु त्यांनी विरोध केला नाही यामुळे आता सरकारचे धाडस वाढले असून सरकारच्या वतीने महाराष्ट्रभर ई बाईक टॅक्सीला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 20 लाख ऑटो…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत प्रभाग क्र. २१ पिंपरी मधील गावठाण व कॅम्प परिसरातील विविध रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, समाजविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करणे, महापालिका हद्दीतील मौजे पिंपळे गुरव, रहाटणी, ताथवडे येथील रस्त्याने/आरक्षणाने बाधित जागा ताब्यात घेणे, अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वापरात नसलेले अथवा दुरावस्थेत अथवा मोडकळीस अवस्थेत…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -+ “संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. शेतकऱ्यांना अधिक चांगला ऊस दर मिळावा, पारदर्शक कारभार व्हावा, तसेच कारखान्याच्या माध्यमातून शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगती साधावी,” असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.  श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचारार्थ आयोजित महायुती मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. वडगाव मावळ शासकीय विश्रामगृहाच्या आवारात महायुतीच्या वतीने आयोजित या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके, आरपीआय नेते सूर्यकांत वाघमारे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सुशिक्षित बेरोजगार युवकांना ग्रामपंचायत पासून बहुराष्ट्रीय कंपन्यापर्यंत योग्य तिथे इंटर्नशिप करता येईल. यामुळे नवीन रोजगार निर्मिती होईल. या इंटर्नशिप मधून शिष्यवृत्ती मिळेल. युवकांना कामाचा अनुभव मिळेल. या अनुभवामुळे करिअर निवडण्यास व आर्थिक स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. रोजगारांचे नवीन पर्याय निर्माण करणे ही काळाची गरज आहे. “एनइपी” मुळे शहरी भागातील औद्योगिकपट्ट्या सह ग्रामीण भागापर्यंत रोजगार निर्मिती होईल. याच्या प्रशिक्षण कलावधीमुळे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होऊन ते गरजू आस्थापनासाठी उपलब्ध होईल. विविध आस्थापना मधील उत्पादन व सेवांमध्ये वाढ होईल आणि दूरगामी पणे राष्ट्रीय जीडीपीमध्ये देखील वाढ होईल असा विश्वास महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक बांधिलकी जपत आणि जनसंपर्क वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने युवा नेते विशाल भाऊ वाकडकर (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे आयोजन अजय कांबळे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्याच दिवशी दुपारी २ वाजता वाकड येथे बांधकाम कामगारांसाठी शिधा वाटपाचा उपक्रम राबवला जाणार आहे. विशाल भाऊ वाकडकर यांच्या वाढदिवसाच्या मुख्य दिवशी, ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -+ “संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. शेतकऱ्यांना अधिक चांगला ऊस दर मिळावा, पारदर्शक कारभार व्हावा, तसेच कारखान्याच्या माध्यमातून शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगती साधावी,” असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.  श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचारार्थ आयोजित महायुती मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. वडगाव मावळ शासकीय विश्रामगृहाच्या आवारात महायुतीच्या वतीने आयोजित या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला आमदार सुनील शेळके, आरपीआय नेते सूर्यकांत वाघमारे,…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचे औचित्य साधून रावेत येथे रविवारी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे, मोरेश्वर भोंडवे, जयश्री भोंडवे, संगीता भोंडवे, नीलेश तरस, राजेंद्र तरस आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. सामुदायिक आरती आणि आणि रामरक्षेने शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. पारंपरिक वेषभूषा परिधान केलेल्या लहान मुलांनी ‘विठ्ठल – रखुमाई’ असा जयघोष केल्याने रावेतमध्ये अलंकापुरी अवतरल्याचा आभास निर्माण झाला होता. याचबरोबर पाणी बचतीचा प्रभावी संदेश शोभायात्रेतून देण्यात आला; तर लाठी, भाला, दांडपट्टा या मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके, शिवस्तुती, शिवराज्याभिषेक या कार्यक्रमांच्या माध्यमातून जाज्वल्य इतिहासाचे नागरिकांना स्मरण करून देण्यात आले. लेगसि एक्झोटिका सोसायटीचे ढोलताशा पथक,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाडा जनविकास संघाच्या १३ व्या वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त पिंपरी – चिंचवड शहरातील मराठवाड्यातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी एक लाख रुपयांचा धनादेश कार्यकारिणीकडे सुपूर्द केला. दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, उपाध्यक्ष अविनाश थिटे, सचिव सुर्यकांत कुरुलकर, सहसचिव वामन भरगंडे, सदस्य दत्तात्रय धोंगडे, आशिष पवार, बळिराम माळी, अभिमन्यू गाडेकर, अनिस पठाण, अजय सोनवणे, नामदेव पवार, शशिकांत दुधारे, सखाराम वालकोळी, नागेश जाधव, गौरीशंकर किन्नीकर, राजेश गाटे,…

Read More