Author: maharashtrabreakingnews.com

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागा ची औद्योगिक क्षेत्रभेट कोहिनूर हळद कंपनी व मॅप्रो गार्डन येथे नुकतीच संपन्न झाली. तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांना ज्यादा उपक्रमाच्या अंतर्गत ही क्षेत्रभेट घडवून आणण्यात आली. महाविद्यालयातील तृतीय वर्षातील जवळपास ९० विद्यार्थी व शिक्षकांसह सर्वजण सकाळी सातच्या सुमारास रवाना झाले. पहिली क्षेत्रभेट वाई येथील कोहिनूर हळद कारखाना येथे झाली. शेतकऱ्यांकडून कच्चा स्वरूपातील हळद खरेदी करून त्यावर प्रक्रियांद्वारे चार वेगवेगळ्या प्रतीच्या हळद पावडर येथे तयार करण्यात येतात अशी माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. जगातील एकूण हळदीचा 72% हळद एकट्या भारतामध्ये उत्पादित होते. त्यापैकी 52% हळदीचे उत्पादन महाराष्ट्र हे राज्य…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन या संस्थांच्या वतीने २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘विश्वबंधुता दर्पण पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे आणि विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या सदस्या डॉ. तेजश्री पारंगे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तिरंगा महावस्त्र, भारताचे संविधान आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी सामाजिक सहाय्य योजना २०२२-२३ अंतर्गत राज्य शासनाच्या मालकीची १५ वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असणारी वाहने टप्प्याटप्प्याने निकामी करण्याच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीच्या ९७ वाहनांचा लिलाव करण्यात आला. या लिलावाद्वारे महापालिकेस ५९ लाख २५ हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्या एमएसटीसी (धातू भंगार व्यापार महामंडळ), मुंबई या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने हा लिलाव पार पडला. या लिलावामध्ये कार, टाटा सुमो तसेच इतर अवजड वाहनांचा समावेश होता. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांनी ९७ वाहनांची तपासणी करून त्यांची लघुत्तम किंमत ४९ लाख ४५ हजार रुपये निश्चित केली…

Read More

जास्तीत महिलांनी उपक्रमाचा लाभ घेण्याचे महापालिकेच्या वतीने आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने भोसरी येथील शिलाई केंद्रामध्ये महिलांसाठी १७ मार्चपासून मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे एका बॅचमध्ये सरासरी ३० ते ३५ महिला प्रशिक्षण घेत आहेत. तसेच नुकत्याच दहावी व बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनींसह विविध वयोगटातील महिलांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना हाय स्पीड मशीन, पिकोफॉल मशीन, ओव्हर लॉक मशीन, एम्ब्रोईडरी मशीन, स्टीम आयर्न, इलेक्ट्रिक कटिंग मशीन इत्यादी आधुनिक यंत्रसामग्री वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच डिझायनर ड्रेस, ब्लाऊज, स्कर्ट, फ्रॉक, वन पीस, घागरा, आरी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे सबवे उभारण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. सद्यस्थितीत महत्त्वाच्या संरचनात्मक टप्प्यांपैकी काही टप्पे पुर्णत्वास आले आहेत. याशिवाय आरसीसी बॉक्सच्या पायाच्या खोदाई चे काम अंतिम टप्प्यात असून, दोन्ही बाजूंच्या रॅम्पच्या बांधकामास वेग देण्यात आला आहे. सबवे प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर नागरिकांना सुलभ आणि अडथळाविरहीत प्रवासाचा लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत सबवेच्या आरई पॅनलचे ८० टक्के कास्टिंगचे काम पुर्ण झाले असून पायाभूत सुविधा, जलनि: सारण व्यवस्था आणि मार्ग संकेतक बसवण्याचे काम सुरू आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी आवश्यक तात्पुरत्या पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण प्रकल्प निर्धारित वेळेत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त दिनांक 4 एप्रिल पासून दिनांक 10 एप्रिल पर्यंत अहिंसा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .आणि 10 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती च्या दिवशी, अहिंसा रॅली चा शुभारंभ आठवडे बाजार रावेत या ठिकाणाहून दुपारी साडेतीन वाजता होणार आहे आणि रॅलीचा समारोप आर एम डी स्कूल जैन विद्या प्रसारक मंडळ या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणाहून अहिंसा पदयात्रा सायंकाळी पाच वाजता निघून प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह मध्ये सायं 6 वाजता सदर पदयात्रेचा समारोप केला जाणार आहे , मोरे सभागृहामध्ये जैन संगीतरत्न मोहित भाई…

Read More

उद्या पुणे पिंपरी चिंचवड आरटीओ ला देणार निवेदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र सरकारने टू व्हीलर टॅक्सीला महाराष्ट्रामध्ये परवानगी दिली आहे. यापूर्वी पुणे शहरामध्ये टू व्हीलर बाइक टॅक्सी रॅपिडो या कंपनीने सुरू केली होती. त्यास पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक – मालकांनी प्राणपणाने तीव्र लढा दिला. ही रॅपिडो टू व्हीलर टॅक्सी पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये व महाराष्ट्रामध्ये बंद केले आहे. एकजुटीने टू व्हीलर टॅक्सी बाईक धोरण हाणून पाडू असे प्रतिपादन ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले. रिक्षा टॅक्सी चालक मालकांनी एकत्र येण्याचे आवाहनी बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले. बाबा कांबळे म्हणाले की,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकसित भारत या संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान क्षेत्राचा अतिशय मोलाचा वाटा आहे. “उत्कर्ष २के२५” सारख्या प्रकल्प स्पर्धा विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामध्ये प्रत्येक प्रकल्प ही एक नवीन सुरुवात असते, ती उत्साहाने आणि दृढतेने पुढे घेउन जाणे गरजेचे असते, असे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे वरिष्ठ संशोधक डॉ. राहुल भांबुरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे “उत्कर्ष २के२५” या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी , ई अँड टीसी…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने औद्योगिक सुरक्षा सप्ताह 2025 स्पर्धा क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथे संपन्न झाली. त्यात कंपन्यानी उस्फुर्त सहभाग नोंदविला. यात 65 कंपन्यामधील 516 स्पर्धक सहभागी झाले. एकूण 268 नामांकनं प्राप्त झाली, त्यामध्ये 74 केस स्टडीज, 22 नाट्य सादरीकरणे, 108 पोस्टर्स आणि 64 घोषवाक्ये यांचा समावेश होता. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्य अतिथी शिवराज पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, मिंडा कॉर्पोरेशन लि. – डाय कास्टिंग विभाग) यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. रजनी इंदुलकर, तसेच पुणे चॅप्टरचे कौन्सिल सदस्य माधव बोरवणकर, अनंत क्षीरसागर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यामध्ये प्रदूषण कमी करण्यासह रोजगार उपलब्ध करण्याचे कारण पुढे करून महाराष्ट्रात ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला, १ लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू होणार आहे. मात्र आधीच मोडकळीस आलेला रिक्षा चालकांचा व्यवसाय त्यांची असलेली कर्जे, आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षाचालकाना हक्क न देता ई बाईक टॅक्सीला परवानगी देणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायकारक आहे आणि भांडवलदारांचे कल्याण करणारा असल्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा महाराष्ट्रात यापुढेही तीव्र आंदोलन होईल असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, कष्टकरी रिक्षा महासंघ, सारथी चालक-मालक महासंघ…

Read More