Author: maharashtrabreakingnews.com

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापराचे प्रशिक्षण पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाविषयी सध्या समाजमाध्यमांवर अनेक सकारात्मक आणि नकारात्मक मतप्रवाह दिसत आहेत. मात्र, आता हे तंत्रज्ञान केवळ भविष्यातील कल्पना न राहता, प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा एक आवश्यक भाग बनत आहे. AI म्हणजे संकट नव्हे, तर तो आपला स्मार्ट सहकारी आहे जो कार्यालयीन कामकाज अधिक जलद, सुलभ आणि अचूक बनवतो. त्यामुळे प्रत्येकाने तंत्रज्ञानस्नेही होणे ही काळाची गरज आहे. AI चा योग्य वापर करून आपण आपल्या कामाची गुणवत्ता आणि परिणामकारकता निश्चितच वाढवू शकतो. तंत्रज्ञानाबद्दलचे गैरसमज दूर करून, त्याची अचूक समज घेतल्यास ते आपल्याला अधिक सक्षम बनवू शकते, असे मत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या मलनिःसारण यंत्रणेला आधुनिक रीसायकल वाहने प्राप्त झाल्यामुळे शहरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक जलद, प्रभावी आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. ही यंत्रणा आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुस्थितीत व सातत्याने कार्यरत रहावी यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. शिवाय यामुळे स्वच्छता, आरोग्य आणि नागरी जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद संचालनालयामार्फत पिंपरी चिंचवड महापालिकेस ८ टन व १८ टन क्षमतेची एक संच स्वरूपात दोन अत्याधुनिक रीसायकल वाहने मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील मलनिःसारण व्यवस्थेची कार्यक्षमता आणि…

Read More

वाहतूकदार आणि कामगार हे दोन्हीही घटक उद्योगाची सक्षम चाके सौदार्हपूर्वक खेळीमेळीच्या वातावरणात करार संपूष्टात आल्याने दिसून आले कामगार व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे ऐक्य- डॉ. दिलीप देशमुख करारामुळे नक्कीच माथाडी कामगारांचे जिवनमान सक्षम होणार – इरफानभाई सय्यद पिंपरी प्रतिनिधी (दि. 04 ) :- ट्रान्सपोर्ट आणि माथाडी कामगार देशाचा कणा आहे. त्यांच्यामुळेच दळणवळण व्यवस्था सक्षम आहे. त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटना नेहमीच अग्रेसर असते. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात नुकताच माथाडी कामगारांच्या पगारवाढीचा ‘लेव्ही’सह 23 टक्के करार संपन्न झाला. हा करार जानेवारी 2025 पासून लागू झाला असून, कराराची मुदत तीन वर्ष आहे. या करारामुळे नक्कीच माथाडी कामगारांचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील पार्श्वनाथ सोसायटी मधील प्यारीबाई पगारिया सभागृहामध्ये पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अहिंसा सप्ताहामधील शुभारंभाचा कार्यक्रम ” धार्मिक प्रार्थना आणि अनुष्ठान “भक्तामर पठण” अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरुषांनी श्वेत पोशाख आणि महिलांनी लाल रंगाची साडी परिधान केली होती. त्यामुळे कार्यक्रम अतिशय सुंदर ,धार्मिक आणि मंगलमय वातावरणामध्ये पार पडला .यावेळी प्रामुख्याने विविध संघाचे अध्यक्ष ,पदाधिकारी तसेच भाविक उपस्थित होते .या सर्वांनी भक्तामर पठनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे आयोजन कासारवाडी जैन श्रावक संघ आणि पार्श्वनाथ युवक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बँकॉक, थायलंड येथे २८ ते ३० मार्च दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धेत पिंपळे सौदागर, पुणे येथील श्राव्या श्रीकांत काटे हिने उत्तम कामगिरी करीत चार पदके पटकावली. या स्पर्धेत तिने ३ सुवर्णपदक आणि १ कांस्यपदकाची कमाई करीत घवघवीत यश संपादन केले. या प्रतिष्ठित स्पर्धेत एकूण १० देशांमधील ४३ क्लबांचे ८५० खेळाडू सहभागी झाले होते. श्राव्या हिने ८ ते १२ वयोगटातील आंतरराष्ट्रीय क्लब (लेवल ३) गटात सहभागी होत फ्लोअर, वॉल्टीग टेबल, अनइव्हण बार आणि बॅलसिंग बार या प्रकारात आपले कौशल्य सिद्ध केले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला ३ सुवर्ण आणि १ कांस्यपदक मिळाले. श्राव्याच्या अथक परिश्रम आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काही ठिकाणी मराठी भाषेला जाणूनबुजून ठरवून नाकारण्याचे काम काही नाठाळ करताना आढळून येत आहेत. असे प्रकार या पुढे खपवून घेतले जाणार नाही, याची नोंद घेत अभिजात मराठी भाषेच्या वापरा संदर्भात योग्य त्या सूचना सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गाला द्याव्यात. अन्यथा मनसे स्टाईल भेट दिली जाईल असा इशारा पिंपरी चिंचवड शहरातील बँकांना देण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रमुख बँकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. पिंपरी चिंचवड मधील आय.सी.आय.सी.आय. बँक (पिंपरी शाखा), बँक ऑफ इंडिया, (पिंपरी शाखा), डी.बी.एस.बँक (चिंचवड शाखा), आय.डी.एफ.सी.फर्स्ट बँक (पिंपरी शाखा), आर.बी.एल.बँक (पिंपरी शाखा), बँक ऑफ बडोदा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “सिद्ध योगी गुरुवर्य सद्गुरु माऊली महाराज वाळुंजकर उर्फ जय बाबा यांनी आपले आयुष्य लोक कल्याणासाठी अर्पण केले.” असे गौरवोद्गार पंढरपूर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. सिध्दयोगी गुरुवर्य सद्गुरुनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर यांचा १०० वा अभिष्टचिंतन सोहळा नव महाराष्ट्र विद्यालय, मैदान, पिंपरी गाव येथे त्यांचे सर्व भक्त आणि शिष्य परिवार यांनी दि.१ एप्रिल २०२५ रोजी साजरा केला. या कार्यक्रमासाठी पंढरपूर रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. यावेळी “चंदनाचे हात,पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग” हा संत तुकाराम महाराज यांच्या अभंग…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांस्कृतिक राजधानी आणि सामाजिक जाणीवा असलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय नोंदणी असलेल्या रुग्णालयातच रुग्णसेवेला तडा गेला असून गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करतेवेळी अगोदर 10 लाख रुपये भरावे, त्यानंतरच दाखल केले जाईल अशा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे, संबंधित महिलेला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी, प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आता सर्वत्र संताप व्यक्त होत असून आमदार अमित गोरखे यांनीही याप्रकरणी पोलिसात धाव घेतली आहे. तर,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील मौजे डुडूळगाव येथे प्रस्तावित ‘‘इको टुरिझम पार्क’’साठी आवश्यक त्याची निधीची उपलब्धता करुन देण्यात येईल. तसेच, महानगरपालिका आणि वन विभाग यांच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राला चालना देणारा हा प्रकल्प विकसित करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे. वन विभागाशी संबंधित विविध मुद्यांवर बैठक नियोजित करावी, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यानुसार, मंत्रालय येथे वनमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी वडगावशेरीचे आमदार बापुसाहेब पठारे, संबंधित विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पिंपरी-चिंचवड टिंबर मर्चट्स अँड मॅन्युफैक्चरर्स असोसिएशनच्या राज्यस्तरीय बैठकीत दि.21 ऑगस्ट 2023 रोजी…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आळंदी नगरपरिषदेस भामा आसखेड प्रकल्प कुरुळी टँपिंग येथून पाणी पुरवठा पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा यंत्रणेतील तांत्रिक देखभाल दुरुस्ती साठी बंद रहाणार आहे. यामुळे कुरुळी टँपिंग येथून आळंदीस होणार पाणी पुरवठा गुरूवारी ( दि. ३ ) बंद राहणार आहे. अशी माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. आळंदीस पाणी पुरवठा होणार नसल्याने आळंदीत झोन निहाय होणारा पाणी पुरवठा देखील बंद रहाणार आहे. यामुळे नगरपरिषद हद्दीतील पाणी पुरवठा नळजोड धारकांना पाणी पुरवठा होणार नाही. यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात आळंदी नगरपरिषदेस कार्यकारी अभियंता भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्प पुणे…

Read More