Author: maharashtrabreakingnews.com

भविष्यातील अडचणी आणि आर्थिक गरजा ओळखून गुंतवणूक करा – नंदकुमार काकिर्डे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बचतीबरोबरच सर्वांनी शेअर मार्केट मधील गुंतवणूक व व्यावहारिक कौशल्य समजून घ्यावे. यातूनच आर्थिक साक्षरता येते. शेअर बाजारात धोका आहे, परंतु देशात शंभर वर्षांपासून जास्त काळ झाला शेअर मार्केटमध्ये व्यवहार सुरू आहेत. वाढत्या महागाईशी आपल्या बचतीचे सूत्र जुळले पाहिजे. यासाठी भविष्यातील आपल्या अडचणी आणि आर्थिक गरजा ओळखून गुंतवणूक करावी असा सल्ला जेष्ठ अर्थ सल्लागार नंदकुमार काकिर्डे यांनी दिला. इन्फनाइट मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या खराडी, पुणे येथील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी काकिर्डे बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन नवनाथ आवताडे, आत्मनिर्भर भारतचे दूत मनीष जाधव, येस बँकेचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवडमधील गोर-गरीब रुग्णांसाठी ‘महापौर निधी’ पुन्हा सुरु करावा, अशी मागणी शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र राज्यप्रमुख डॉ. सतिश दत्तात्रय कांबळे यांनी आयुक्ताकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी पूर्वी महापौर निधी दिला जात होता. या निधीतून हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, डायालिसिस, कर्करोग इत्यादी गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजूंना मदत केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महापौर निधी पूर्णतः बंद आहे. २०१९ पासून महापौर नसल्यामुळे आपल्यामार्फतच महापालिकेचे सर्व प्रशासकीय निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत महापौर निधीचा लाभ थांबवण्यात आला असून, याचा थेट परिणाम गोरगरीब रुग्णांवर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संशोधन व तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विकास, विविध उद्योगांवरील त्याचा परिणाम, शासन व उद्योजकांचे त्याबाबत धोरण हे सर्व आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पनांना व्यवहारिक जोड देऊन आपल्या कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी करावा असे मार्गदर्शन अस्मिता एम. यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) येथे “टेक्निऑन २०२५” या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी अस्मिता एम. बोलत होते. या टेक्निऑन मध्ये ९६६ विद्यार्थ्यांनी विविध अभियांत्रिकी शाखांतून सहभागी होऊन १८८ प्रोजेक्ट्स, पोस्टर्स आणि मॉडेल्स चे सादरीकरण केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, सस्टेनेबिलिटी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. यावेळी पीसीयूच्या कुलगुरू…

Read More

– स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी घेतला पुढकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वन विभागाच्या हद्दीतील रस्त्याला सीमाभिंत घालण्याचे काम सुरू केल्यामुळे चऱ्होली येथील खंडोबा माळ परिसरातील नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. अखेर सीमाभिंती तयार करता रस्ता ठेवण्याबाबत वन विभागाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. चऱ्होली बु, खंडोबा माळ, सर्वे नंबर 98/4, सनसिटी व सेव्हनहिल या लोहगाव हद्दीतील वनविभागाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी वन विभागाकडून सीमा भिंतीचे काम चालू करण्यात आले होते. त्यामुळे खंडोबा माळ परिसरातील रहिवाशांना लोहगावकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता बंद होणार होता. ही…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक बांधिलकी आणि लोकसंपर्क वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने युवा नेते विशालभाऊ वाकडकर (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य) यांच्या ३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटप करण्यात आले. अजय कांबळे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्याच दिवशी दुपारी २ वाजता वाकड येथे बांधकाम कामगारांना शिधा वाटप करण्यात आले. ३ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता वाकड येथील वाकडकर वस्ती येथे नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताला एक मजबूत, समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून जागतिक स्तरावर स्थापित करण्यासाठी कटिबद्ध असणारा भारतीय जनता पार्टी (भाजपा) राजकीय पक्ष आहे. स्थापनेपासूनच, भाजपाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि लोकहिताच्या विषयांवर आवाज उठवून भारतीय लोकशाहीत प्रभावी भूमिका बजावली आणि भारतीय राजकारणाला नवीन आयाम दिले, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशने सदस्य नोंदणीचा दीड कोटींचा टप्पा नुकताच पार केला. भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचं हे यश असून याच पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या ४५ व्या स्थापना दिवसानिमित्त ‘मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन’ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले. यानिमीत्त चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्रात भाजपा सरचिटणीस नामदेव…

Read More

आमदार जगताप यांची पुस्तक तुला, वाचनालयांना होणार मोफत वाटप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छांऐवजी पुस्तक देण्याच्या अभिनव उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत, एकूण ६,८४२ पुस्तके जमा झाली. दिवसभरात जमा झालेल्या या पुस्तकांची संध्याकाळी ‘बालजत्रा’ कार्यक्रमात तुला करण्यात आली. ही सर्व पुस्तके चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाचनालयांना मोफत देण्यात येणारआहेत. या विशेष दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी ७ वाजता पिंपळे गुरव येथील महादेव मंदिरात अभिषेक, तर ८ वाजता संपूर्ण चिंचवड मतदारसंघात स्वच्छता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड-रावेत परिसरात नवीन एस.टी. बस आगार उभारण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडे त्यांनी यासंदर्भात पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. आमदार जगताप यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि कोकण भागातील मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि आय.टी. अभियंते हिंजवडी, वाकड, रावेत, पिंपळे सौदागर, पुनावळे आदी भागांत वास्तव्यास आहेत. या नागरिकांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी पुणे किंवा वल्लभनगर एस.टी. स्थानकावर जावे लागते, त्यामुळे त्यांचा वेळ आणि…

Read More

पथरी,हातगाडी, स्टॉल धारकांकडून सन्मान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातून पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले पूर्वाश्रमीचे पानटपरी धारक आण्णा बनसोडे यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील पानस्टॉल धारक, तसेच हातगाडी स्टॉल धारकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अण्णा बनसोडे यांचा टपरीधारक ते विधानसभा उपाध्यक्ष असा प्रेरक प्रवास आहे असे गौरवोद्गार आज महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी काढले. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज त्यांचा सन्मान हातगाडी, स्टॉल धारकाकडून विविध प्रकारची फळे देऊन करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार मनपा समिती सदस्य किरण…

Read More

– विकास आराखड्यातील 24 मीटर रस्ता होणार – आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ते ताब्यात घेवून त्याचा विकास करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मोशी येथील लक्ष्मी चौक ते स्वराज रेसिडेन्सी रस्त्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाचे अधिकारी आणि सहकाऱ्यांसोबत मोशी येथे विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निखील बोऱ्हाडे, निलेश बोराटे आणि ग्रामस्थ व सोसायटीधारक उपस्थित होते. मोशी येथे लक्ष्मी चौक ते स्वराज रेसिडेन्सी येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले. महानगरपालिका विकास आराखड्यातील या…

Read More