Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार, अजैन आणि शाकाहारी व्यक्तींना अहिंसा पुरस्कार दिला जातो. भगवान महावीर जयंतीच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण केले जाते ,या वर्षीही महावीर जयंतीच्या दिवशी दिनांक 10 एप्रिल रोजी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. यावर्षीचे अहिंसा पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत. अयोध्या येथील श्री राम मंदिराची प्रतिष्ठा करण्यात ज्यांचा प्रमुख सहभाग होता त्या श्री गोविंददेव गिरी महाराज यांना अध्यात्मिक क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष , महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस यांना साहित्य क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार, गेली ५० वर्षेपेक्षा जास्त काळ पत्रकारिता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जैन समाजाची जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी नामांकित संस्था आहे. या संस्थेच्या वतीने बुधवारी ९ एप्रिल रोजी भारतासह इतर १०८ देशांमध्ये “विश्व नवकार महामंत्र दिवस” साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी आठ वाजता या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांना पाहता यावे व या कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी चिंचवड गावातील श्री फत्तेचंद विद्यालय येथे जीतो चिंचवड पिंपरी चॅप्टर फाउंडेशनच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती झोन चेअरमन राजेंद्र जैन यांनी प्रसिद्धीस दिली आहे. बुधवारी सकाळी सात वाजता…

Read More

लोकशाही दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे प्रतिपादन पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख, गतिमान प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याबाबत विविध सूचनाही केल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता किरण अंदुरे, दयमंती पवार,जनता संपर्क अधिकारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शत्रुघ्न (बापु) काटे स्पोर्ट अकॅडमी यांच्या सौजन्याने चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती क्रीडांगण याठिकाणी “ओपन रोलर स्केटिंग स्पर्धा-२०२५” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार श्री शंकरशेठ जगताप यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वयोगट ५ वर्षे ते १४ वर्ष वयोगटातील ५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत ड्रीम क्लब, शिशा स्केटिंग क्लब, LJ स्केटिंग क्लब, साई स्केटिंग क्लब आणि वर्ल्ड पीस स्कुल आळंदी यांनी अनुक्रमे पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा क्रमांक पटकविल्या बद्दल चषक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आपले शरीर लवचिक राहण्यासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील दोन महिन्यापासून पिंपळे निलख, विशाल नगर, वाकड भागात कमी दाबाने व अवेळी पाणीपुरवठा होत आहे. या परिसरात जवळपास ४० हजार लोकवस्ती, हजारो दुकाने व व्यवसायिक आस्थापना आहेत. मोठ्या प्रमाणात सोसायटी परिसर आहे. मागील सहा वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिवसाआड पाणीपुरवठा देण्याचे धोरण शहरभर सुरू केले होते. तेव्हापासून या परिसरात अनेकदा पाणीपुरवठा कमी दाबाने व अवेळी करण्यात येतो. या परिसरातील नागरिक नियमितपणे महानगरपालिकेचा मिळकत कर व पाणीपट्टी कर भरतात. येथील पाणीपुरवठ्याबाबत अधिकारी व कर्मचारी उदासीन आहेत. मागील दोन महिन्यांपासून या परिसरातील सोसायटी धारकांनी लाखो रुपये खर्च करून टॅंकरने पाणी घेतले आहे. या प्रदूषित…

Read More

आम्हाला ८ पैकी ६ जागा निवडून देऊन फेरीवाल्यानी त्यांची जागा दाखवून दिली पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या माध्यमातून शहरातील अनेक विक्रेत्यांच्या न्याय देऊन हॉकर झोन, फेरीवाला प्रमाणपत्र वाटप, इत्यादी बाबी करण्यात यश आलेले असून महानगरपालिका अन्यायकारक कारवाई करत आहे म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही गेलो असता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली हे सर्व जगाला माहित आहे परंतु अज्ञानी लोकांना अजून काय स्थगिती असते ? काय निर्णय असतो हेच माहीत नाही या उलट ते समजून न घेता सर्वसामान्य गोरगरीब फेरीवाल्यांना मिळालेला न्याय त्यांच्या पचनी पडलेला नाही म्हणून विजयी गुलाल उधळणाऱ्या फेरीवाल्यांचा आनंद पाहून त्यांची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘‘एकही नारा…एकही नाम… जय श्रीराम…’’ असा जयघोष करीत पिंपरी-चिंचवडमध्ये राम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी शोभायात्रा भोसरी आणि परिसरातून काढण्यात आली. यामध्ये विविध मंडळांनी एकजुट दाखवत जन्मोत्सव दणक्यात साजरा केला. इंद्रायणीनगर येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा संघटनांनी भव्य शोभायात्रा काढली. भोसरीतील कृपासाई फाउंडेशनचे संस्थापक प्रदीप पवार यांच्या पुढाकाराने रामरथ सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये महबली हनुमान मूर्ती शोभायात्रेचे आकर्षण ठरले. तसेच, सुमीत लांडगे युथ फाउंडेशन, जय भवानी युवा मंच, श्री. दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, मोशी येथील शिवयोद्धा ग्रुप, एसवाय ग्रुप सोशल फाउंडेशन, राम नवमी उत्सव समिती, निगडी यांच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतातील क्रीडा व आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या इंडो ॲथलेटिक सोसायटी तर्फे आज दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता इंडो अथलेटिक सोसायटीच्या ऑफिसमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या सहकार मी फाउंडेशनच्या मस्ती की पाठशाला या शाळेतील बांधकाम व वीट भट्टी कामगारांच्या मुलांसाठी सायकल डोनेशन प्रोग्राम घेण्यात आला. संस्थेतर्फे दर सहा महिन्याला असा प्रोग्राम घेतला जातो असे इंडो ॲथलेटिक सोसायटीतर्फे सांगण्यात आले. रनिंग ट्रेकिंग स्विमिंग व सायकलिंगची आवड जपत अनेक सामाजिक उपक्रम करणाऱ्या आज मस्ती की पाठशाळेच्या पाच मुलांना या उपक्रमात सायकल भेट देण्यात आल्या. सगळ्या सायकलींना छान फुलांचे हार घालण्यात आले होते. मुलांना इंडो ॲथलेटिक सोसायटीचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. गरोदर महिलेला रक्तस्त्राव होत असल्याने उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. परंतु आधी २० लाख भरा तरच अँडमीट करू असे सांगितले. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी ९ ते दु.२ पर्यंत मदतीसाठी वाट बघून शेवटी वाट पाहून दिनानाथ हाँस्पीटल मधून तिला ससून येथे नेण्यात आले. तिथे भिषण परिस्थिती बघून शेवटी वाकड सुर्या हाँस्पीटल येथे प्रसुतीसाठी नेण्यात आले तिथं महिलेची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत समितीही नेमली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी भिसे यांच्या कुटुंबीयांची बालेवाडी येथे भेट घेतली. यावेळी आमदार अमित गोरखे, गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते. याप्रसंगी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कालचा प्रकार हा असंवेदनशील होता. जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल, असे म्हणत फडणवीस यांनी…

Read More