- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सेक्टर नं.22, ओटास्किम, निगडी येथील 1563 बैठी घरे अनधिकृत दुबार पुनर्वसनास विरोधा संदर्भात महत्त्वाच्या मागणी करिता आणि SRA मार्फत अनधिकृत दुबार पुनर्वसन रद्दबातल ठरवावे या मागणीकरिता महानगपालिकेवर 1563 घरे धारक नागरिकांचा धडक मोर्चा काढण्यात आला. प्रकल्पाच्या विरोधात आज हजारोंच्या संख्येने संतप्त नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. आमची झोपडपट्टी नाही, आमचं पुनर्वसन आधीच झालंय” असा स्पष्ट संदेश उपस्थित नागरिकांनी दिला व महापालिका आणि SRA प्राधिकरणाच्या संयुक्त कारस्थानाचा तीव्र निषेध केला. सेकयर क्र. 22 ओटास्किम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील संजयनगर, मिलिंदनगर, बौद्धनगर, विलासनगर, राजनगर, इंदिरानगर, येथून हजारो महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिक महापुरुषांच्या प्रतिमा,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचालित आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था ) मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यावेतन लागू करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ५०० रुपये इतके विद्यावेतन देण्यात यावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्याअनशुंगाने महानगरपालिका प्रशासनाने कार्यवाही केली आहे दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या धर्तीवर मनपा आयटीआयच्या विद्यार्थ्यांनाही ५०० रुपये इतके विद्यावेतन द्यावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवला होता. मात्र, सदर प्रशिक्षण केवळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील मुठा, मुळा, इंद्रायणी, पवना आणि उल्हास या नद्यांचे सुधार प्रकल्प, लोकल सह रेल्वेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरले आहे. यासह बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार आणि नेपाळमधून मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोरी होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते. त्यासंदर्भातही अधिवेशनात आवाज उठविल्याची माहिती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले. या अधिवेशनात खासदार बारणे यांनी मतदारसंघासह देशाच्या सुरक्षिततेसंदर्भात विविध प्रश्नांवर आवाज उठविला. याबाबतची माहिती खासदार बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार योजनांना त्वरित मंजुरी द्यावी. इंद्रायणी नदीचा उगम मावळमधून होतो. नदी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थ्यांच्या नजरेतील विविध प्रकारचे चष्मे, भूमितीमधील वर्तूळ, चौकोन, त्रिकोण कल्पकतेने रेखाटत त्याद्वारे काढलेली विविध चित्रे, मुलांच्या कल्पनेतील उष्ण आणि शांत रंगाचे शहर, चित्रातून दाखवण्यात आलेले दयाळूपणाचे क्षण… यासह विविध विषयांवरील शाळकरी विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे पाहण्याची संधी मंगळवारी (८ एप्रिल २०२५) नागरिकांना मिळाली. निमित्त होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे भरवण्यात आलेले ‘द आर्ट बॉक्स’ हे प्रदर्शन. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे ‘द आर्ट बॉक्स’ हे चित्रकला प्रदर्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा थेरगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे. या कक्षाअंतर्गत उद्योजक आणि महापालिका यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून औद्योगिक अडचणींचे निराकरण, संवाद आणि सुविधा सुलभ करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. महापालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या उद्योग सुविधा कक्षाबद्दल माहिती देण्यासाठी उद्योजकांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये करण्यात आले, यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तसेच उद्योग व सुविधा कक्ष व CSR प्रमुख…
चिंचवडः, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघ, क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेड व वर्धमान जैन श्रावक संघ चिॅचवड स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दोन दिवसीय मोफत कर्करोग तपासणी शिबीराचे उद् घाटन आज क्रस्ना डायग्नोस्टिक लि. चे चेअरमन श्री राजेंन्द्र जी मुथा यांचे शुभ हस्ते महासंघाच्या व विविध जैन श्रावक संघाच्या अध्यक्ष व पदाधिकार्यांच्या उपस्थित पार पडला. प्रा. अशोकजी पगारिया, सुभाषजी ललवाणी , नितीनजी बेदमुंथा , सुभाषजी सुराणा, श्रेयांसजी पगारिया. विलासजी पगारिया,प्रा प्रकाशजी कटारिया, अशोकजी लुंकड, सतिशजी मेहेर, आनंद जी मुथा,डॉ. अशोकजी बोरा, उमेश जी पाटील,विरेश छाजेड, संदीप फुलफगर राजेंन्द्र बोरा, किरण रांका,नेनसुखजी मांडोत,श्रेणिक मंडलेचा, राहुल लुंकड,हर्षद लुंकड, शितल खिंवसरा,बागमार,क्रस्ना डायग्नोस्टिक…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. ९) हॉटेल रागा पॅलेस, मदर तेरेसा उड्डाणपूल, काळेवाडी, पिंपरी, पुणे १८ येथे सायंकाळी पाच वाजता या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी मंगळवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, आरपीआय (आठवले गट) चे सर्व प्रमुख पदाधिकारी, युती सरकारमधील सर्व मित्र…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘‘विकसित भारत अभियान’’ चा नारा देत देशभरात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस विविध उपक्रम आणि विधायक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा वज्रमूठ दाखवली आणि शहरभरात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. संपूर्ण शहरात पक्षाचे फ्लेक्स लावण्यात आले असून, शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजपासह तमाम हिंदू बांधवांचे आराध्य प्रभू श्रीराम जन्मोत्सव अर्थात राम नवमी आणि भाजपा स्थापना दिवस एकत्र येण्याचा योग आला. त्यामुळे एका बाजुला श्रीराम यांचा जयघोष आणि दुसऱ्या बाजुला ‘‘अजेय भारत… अजेय भाजपा..’’ असा संकल्प शहरातील भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा दिसला आहे. भाजपाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे स्थापना दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहन करण्यात आले.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शंभर दिवसाच्या कृती आराखड्यातंर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी कार्यालयात जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (दि.७) आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पीएमआरडीएमधील अधिकारी, कर्मचारी आणि कार्यालयात येणाऱ्या अभ्यागत यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात संपूर्ण आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, ब्रेस्ट तपासणी, ओरल कॅन्सर, स्क्रीनिंग, ब्लड, शुगर आदी आरोग्यविषयी तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. यात ३४ अधिकारी, कर्मचारी यांनी रक्तदान केले तर १८० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासह तज्ञ डॉक्टरांमार्फत अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते करण्यात आले.…
गुरुवार दिनी प्रस्थान ला होणार उशीर आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढ पायी वारी पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून गुरुवार १९ जून २०२५ ला गुरुवार श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर रात्री उशिरा हरिनाम गजरात होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून आषाढी वारी २०२५ साठी श्रींचे पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात पंढरपूरकडे १९ जून रोजी प्रस्थान होणार आहे. सोहळ्यातील मुख्य आषाढी एकादशी ६ जुलै रोजी पंढरपूर येथे राज्यातून आलेल्या लाखो वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत हरिनाम गजरात साजरी होत आहे. आषाढ पायी वारी २०२५ पालखी सोहळ्याचे नियोजन पूर्व आढावा बैठक पंढरपूर येथे झाली. या बैठकीत पालखी सोहळा…
