Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री नवकार महामंत्रामध्ये एक आध्यात्मिक शक्ती आहे. या शक्तीचा मी अनुभव घेतला आहे. देश, विदेशात एकाच वेळी कोट्यावधी नागरिकांनी आज पठन केलेला नवकार महामंत्र सर्वांना ऊर्जा स्रोत निर्माण करणारा आहे. जेव्हा आपण हा मंत्र उच्चारतो, नमन करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. आठ कर्मांचा क्षय होऊन मोक्ष प्राप्ती होते. १०८ दिव्य गुणांनी युक्त हा मंत्र आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) या संस्थेच्या वतीने बुधवारी (दि. ९ एप्रिल) विश्व नवकार महामंत्र दिवस” भारतासह जगातील १०८ देशांमध्ये, ६००० पेक्षा जास्त ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक आव्हाने येतात. आव्हानांना सकारात्मक दृष्टीने सामोरे जात यशाचा मागोवा घेत वाटचाल करावी. आयुष्यामध्ये न खचता, न थांबता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वप्नांना गवसणी घालावी, असे मत मिसेस इंडिया २४ या फॅशन शो मधील प्रथम रनरअप सई खलाटे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे ‘झिंग २०२५’ या सांस्कृतिक व व्यावसायिक वैविध्यपूर्ण स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये शिक्षणाबरोबरच अनुभव आणि प्रात्यक्षिक यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना व्यावसायिक, उद्योजक आणि सामाजिक जबाबदारीचे भान रुजवणे, त्यांना व्यवस्थापन आणि संशोधन करण्यासाठी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आता ग्लोबल कोव्हेनंट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट अँड एनर्जी (GCoM) या आंतरराष्ट्रीय करारात सहभागी झाली आहे. हवामान बदलांशी लढण्यासाठी जगभरातील शहरांनी एकत्र येऊन हा करार केला असून त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील सहभाग घेतला आहे. यामध्ये १४४ देशांतील १३,७०० हून अधिक शहरे सहभागी आहेत. या करारात सहभागी होऊन महानगरपालिकेने शहरातील हरितगृह वायू (Greenhouse Gases) कमी करणे, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचे प्रमाण वाढविणे, हवामान बदलामुळे येणाऱ्या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी आराखडा तयार करणे आणि याद्वारे पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक पाऊले उचलणे ही उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरविले आहे. GCoM करारात सहभागी झाल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देश-विदेशातील इतर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रादेशिक क्षेत्राचा शाश्वत दळणवळण आराखडा ठरविण्यासाठी बुधवारी झालेल्या चर्चासत्रामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी, माजी पदाधिकारी, माजी नगरसदस्य, नगरसदस्या यांनी सहभागी होत विविध विषयांवर आज सविस्तर चर्चा केली. पिंपरी चिंचवड शहराचा विकास झपाट्याने होत असून या अनुषंगाने दळणवळण आराखडा तयार करण्यात यावा, दळणवळण आराखडा तयार करताना पुढील ३० ते ४० वर्षांचा विचार केला जावा, असे मतही लोकप्रतिनिधींनी मांडले. महामेट्रोच्या महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वतीने आयोजित चर्चा सत्र ऑटो क्लस्टर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक संदीप…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे मनपाच्या नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडल्यास उंच भागात पाणी कमी दाबाने पोहोचत आहे आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महानगरपलिका नियमावलीतील नियम क्र. १५ नुसार, मनपाच्या अधिकृत नळजोडीवर थेट विद्युत मोटर/पंप जोडण्यास मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा कठोर कारवाई करीत आहे. या विशेष मोहिमेंतर्गत पिंपळे गुरव परिसरातून आतापर्यंत २५ विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच नळजोडणीला अनधिकृत पद्धतीने मोटार जोडून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील (भीमसृष्टी) मैदानात महानगरपालिकेच्या वतीने दि. ११ ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. या प्रबोधन पर्वात महानाट्य, लाईव्ह कॉन्सर्ट, गीतगायन, पोवाडे, कव्वाली, एकपात्री नाट्यप्रयोग, चर्चासत्रे, परिसंवाद, शाहिरी जलसा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधन पर्वात सहभागी होऊन कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. याशिवाय, या प्रबोधन पर्वास सहकार नागरी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील विविध भागातून विस्कळीत पाण्याच्या तक्रारी येत आहेत. धरणातून पाणी मुबलक मिळत आहे. परंतु, महापालिकेला पाणी वितरणाचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत आहे. टँकर माफियाला पाठीशी घालण्यासाठी पाण्याच्या तुटवडा दाखविणाऱ्या, टँकर माफियांना पोसण्यासाठी कृत्रिम पाणी टंचाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. शहरातील पाणी, वैद्यकीय सुविधा, वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण, अतिक्रमण अशा विविध कामाचा आढावा घेतला. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, तृप्ती सांडभोर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडीतील त्रिवेणीनगर, दुर्गानगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील जड वाहतूक, वारंवार होणारी वाहतूक कोंडी, तसेच या भागातील शाळांची मोठी संख्या त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन या महत्त्वाच्या चौकांमध्ये दोन्ही बाजूंना ‘हाईट बॅरीगेट्स’ बसविण्यात येणार आहेत. याबाबत महापालिका स्थापत्य विभाग, निगडी वाहतूक विभागाला भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी सूचना केली होती. त्यानुसार सदर कार्यवाही करण्यात आली. निगडी येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये असणाऱ्या दुर्गानगर चौकातून यमुनानगर मध्ये जाणाऱ्या रस्त्याला जड वाहनास बंदी आहे. तरी सुद्धा अनेकदा या रस्त्यावर भरधावपणे जड वाहने वाहतूक करतात. यापूर्वीच या भागातील जड वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी केली…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत महापालिकेच्या विविध विभागातील युपीएससाठी बॅटऱ्या खरेदी करणे, विविध विभागांसाठी झेरॉक्स मशीन खरेदी करणे, महापालिका शाळांसाठी सक्षम मराठी पुस्तके (भाग १,२,३) छपाई करून देणे, एम्पायर इस्टेटच्या पुलापासून डी मार्टमार्गे दापोडी-निगडी रस्ता विकसित करणे व इंडोलिंक युरोसिटी येथील रस्ता विकसित करणे या प्रकल्पाच्या निविदापश्चात कामाकरिता सल्लागार…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक आरोग्य दिनानिमित्त सोमवारी (७ एप्रिल) मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे झालेल्या “महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५” या राज्यस्तरीय कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचा दोन पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. ऋतुजा लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत…

Read More