- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक व पदाधिकारी मेळावा पार पडला. या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तर्फे निरीक्षक ,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत मध्ये भरघोस मते घेणारे माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक व पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. दिवसभर चिंचवड , पिंपरी व भोसरी अशा ब्लॉक स्तरीय बैठक घेण्यात आल्या. यामध्ये ब्लॉक अध्यक्षांनी आपल्या कार्याचा अहवाल सादर करून माहिती दिली. तसेच ब्लॉक मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते व सूचना यादरम्यान निरीक्षकांसमोर मांडल्या. या प्रसंगी पिंपरी चिंचवड…
गहुंजे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील गहुंजे गावातील वामनभाऊ हाउसिंग सोसायटी परिसरात असलेल्या नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरात आज, शनिवारी (१२ एप्रिल) हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात व थाटामाटात साजरा होणार आहे. या विशेष प्रसंगी मावळचे आमदार सुनील (अण्णा) शेळके यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या हस्ते महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गहुंजे येथील हे हनुमान मंदिर स्थानिकांसह आसपासच्या गावांमध्ये “नवसाला पावणारा हनुमान” म्हणून विशेष श्रद्धेचे स्थान मिळवून आहे. एका भाविकाने सांगितलेल्या अनुभवानुसार, त्याला काही महत्त्वाच्या कामांमध्ये सतत अडथळे व विलंब होत होते. त्याने या मंदिरात नवस केला आणि अवघ्या एका महिन्यात त्याच्या सर्व अडचणी दूर झाल्या. हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज ११ एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासात विशेष महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाते. ते केवळ एक सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर एक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि विचारवंत देखील होते. १९ व्या शतकात, जेव्हा समाज जात आणि लिंग भेदभावाशी झुंजत होता, तेव्हा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी निर्णायक चळवळ सुरू केली. आजही ज्योतिबा फुले यांचे जीवन आणि त्यांचे विचार समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी काम करणाऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त, आपण त्यांचे योगदान लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यांचे आदर्श स्वीकारण्याची प्रेरणा घेण्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे अहिंसा पुरस्कार जे शाकाहारी व्यक्तींना आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या महानुभावांना दिले जातात. यावर्षी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांना अध्यात्मिक क्षेत्रातील, ज्येष्ठ साहित्यिक आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना साहित्य क्षेत्रातील तसेच रघुनाथ ढोले यांना पर्यावरण क्षेत्रातील अहिंसा पुरस्कार आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री गोविंददेव गिरी महाराज हे मोशी वेदश्री तपोवन येथील आश्रमाचे प्रमुख असून अनेक अध्यात्मिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे ते विश्वस्त आहेत राम मंदिर प्रतिष्ठापना समारंभामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. तसेच डॉ श्रीपाल सबनीस…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाज परिवर्तनासाठी रचनात्मक कार्य आणि रचनात्मक कार्यासाठी समाज परिवर्तन ज्यांनी अपरिहार्य मानले ते ज्योतिबा महाराष्ट्र समाजाला वर्गीय जाणीव आणि वर्गीय दृष्टी देण्याचे काम करत आपल्या साहित्यातून जातिभेद अनिष्ट प्रथा तसेच विशिष्ट वर्गाची मक्तेदारी याविरुद्ध बंड करत समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. महात्मा फुले हे खरे समाजशिक्षक होते असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज थरमॅक्स चौक चिंचवड येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, संघटक अनिल बारवकर,अशोक जाधव, मनपा सदस्य सलीम डांगे,किशोर सरवदे,रोहन मुरगुंड,संजय भोसले, सचिन मुरगुंड, अविनाश…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून महात्मा फुले यांनी सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली मराठी शाळा सुरू केली. त्याची जबाबदारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. त्यानंतर काळातही ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. भारताच्या इतिहासात महात्मा फुले यांचे कार्य अजरामर राहणार आहे, अशा भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे निवासस्थान ‘‘महात्मा फुले वाडा’’ येथे आमदार महेश लांडगे यांनी भेट दिली आणि अभिवादन केले. ‘‘महात्मा फुले वाडा’’ हा समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले हे भारताच्या सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. त्यांनी स्त्रीशिक्षण, शेतकऱ्यांचे हक्कासाठी तसेच सामाजिक विषमतेविरूध्द संघर्ष करत समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले. याशिवाय त्यांची समता, शिक्षण आणि न्याय ही मूल्ये एक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी कायम मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व क्रांतीज्योती महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या…
आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वारकरी संप्रदायातील महान संत ज्ञानेश्वर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आळंदीच्या भूमीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराला भारतासह जगभरातून हजारो साधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची, पुणे आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या दोन दिवसांमध्ये १५ ते २० हजार साधकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आध्यात्मिक अनुभूती घेतली. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन सोहळा आमदार अशोक पवार, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, ओडिशा पोलिस दलातील आयपीएस, महासंचालक अधिकारी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार आणि भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड शहरात यंदा श्री हनुमान जयंती विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. या विशेष कार्यक्रमांतर्गत शनिवारी, १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता काळेवाडी येथील आरंभ बँक्वेट हॉल येथे १,१११ भक्तांच्या उपस्थितीत श्री हनुमान चालीसाचे सामूहिक पठण होणार आहे. या भक्तिमय कार्यक्रमासोबतच शहरात प्रथमच पारंपरिक भारतीय जोर-बैठक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीचे जतन आणि प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. *स्पर्धेचे वयोगट आणि पारितोषिके पुढीलप्रमाणे:* *वयोगट १० ते १५ वर्षे:* – प्रथम पारितोषिक – ₹५००१ आणि प्रशस्तीपत्रक – द्वितीय –…
जनकल्याणासाठी केला विशेष संकल्प उज्जैन,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या प्राचीन मंदिरात पहाटे तीन वाजता त्यांनी पवित्र भस्मारतीचा अनुभव घेतला आणि महादेवाची भक्तिभावाने विशेष पूजा केली. या प्रसंगी श्री महाकालेश्वर मंदिर प्रबंध समितीच्या उपप्रशासक सुश्री सिम्मी यादव यांनी डॉ. गोऱ्हे यांचे औपचारिक स्वागत आणि सत्कार केला. यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी ‘महाकाल लोक’ कॉरिडॉरची विशेष पाहणी केली. त्यांनी कॉरिडॉरमधील भव्य शिल्पकला, मंदिर परिसरातील श्री हनुमानजी व श्री दत्तात्रेय यांच्या भव्य मूर्ती, तसेच विविध उपमंदिरांचे सौंदर्य आणि भक्तांसाठी पुरवलेल्या…
