Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून अष्टविनायक गणपतींसह पाच मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने पत्रक जारी करत माहिती दिली आहे. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहितेचा निर्णय घेण्यात आला असल्याचे चिंचवड देवस्थान ट्रस्टने या पत्रकात म्हटले आहे. देवस्थान संस्थानकडून मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, चिंचवडचा मोरया गोसावी संजीवनी मंदिर, खार नारंगी मंदिर या ५ मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. हे पाचही देवस्थान चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारित येतात. त्यामुळे चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून वस्त्रसंहितेचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जीवनात अनेक अडचणी, समस्या येतात. परंतु त्याकडे सकारात्मकपणे पाहिले तर नवीन संधी दिसते. या संधीतून नवनवीन संकल्पना उदयास येत असतात त्यांचे वास्तवात रूपांतर करून त्या आत्मसात करा आणि त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे असे मार्गदर्शन डॉ.‌ राजेंद्रकुमार शर्मा यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे ‘टेक्नोव्हेट २०२५’ या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन डॉ. राजेंद्रकुमार शर्मा आणि संगीता शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये विविध तांत्रिक व सर्जनशील प्रकल्प सादर करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ब्रो कोड, एरर ४०४, ब्रिजिंग माईंड्स, कॅड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व’चा दुसरा दिवस उत्साह, प्रेरणा आणि सांस्कृतिक वैभवाने भरलेला ठरला. क्रांती, समता आणि ज्ञान या तिन्ही मूल्यांचा सुरेल संगम अनुभवताना, प्रेक्षकांना एका जीवंत चळवळीचा भाग झाल्याचे समाधान मिळाले. गझल, भीमगीते, शाहिरी पोवाडे, सुगम संगीत आणि तबला-ढोलकीच्या जुगलबंदीने सभागृह भारावून गेले होते. प्रबोधनपर्वाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात परिवर्तन कला महासंघाच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात स्थानिक कलाकार गुंडूराज कांबळे, प्रशांत मागाडे, आकाश भालेराव, निहाल लगाडे, अर्जुन नेटके, राहुल भिमटे, मनिषा म्हस्के, गौतम कांबळे, नवनाथ म्हस्के, भिवाजी कांबळे आणि रोहिदास भडकवाड यांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला समतेचा, ममतेचा आणि सर्जनशीलतेचा लढा हा केवळ इतिहासातील एक अध्याय नसून, आजच्या समाजासाठी मार्गदर्शक तारा आहे. शिक्षण, स्त्री-पुरुष समता, शेतकरी न्याय, लोककला आणि संवाद या मूल्यांद्वारे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचं जे बीज पेरले, ते आजही प्रेरणादायी आहे. या महामानवांची शिकवण केवळ स्मरणात न ठेवता ती आचरणात आणणे हाच खरा आदर आणि खरी आंतरिक आदरांजली ठरेल, असा सूर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादातून उमटला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ११ ते १६…

Read More

संविधानाच्या प्रभावी अंलबजावणीत बंधुतेचा विचार गरजेचा – ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांचे प्रतिपादन; २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कारांचे वितरण पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “भवतालात अन्याय, अत्याचाराच्या घटना घडताहेत. महिला सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होतोय. जाती-धर्माच्या नावावर समाज विभागला जात आहे. आर्थिक विषमता वाढतेय. अशावेळी मानवी जीवनात समानतेचा धागा विणून प्रत्येक घटकाला सन्मान देणारा बंधुतेचा विचार अधिक व्यापक व्हायला हवा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी केले. स्वांतत्र्य व समता आणण्यासाठी कायद्याचा उपयोग होऊ शकतो; मात्र, बंधुता काळजातून यावी लागते. त्यामुळे संविधान आदर्शवादी आहे. त्याची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव दि. १५ व १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असून, बुधवारी (१६ एप्रिल) कै. सदाशिवराव रामभाऊ फुगे कुस्ती आखाड्यात ‘भैरवनाथ केसरी’ किताबासाठी भारत केसरी वीरेंद्र दहिया आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना होईल. मैदानात हिंद केसरी, भारत केसरीसारखे मल्ल झुंजणार आहेत. भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त राज्य आणि देश पातळीवरील मल्ल यंदा आखाड्यात सहभागी होणार आहेत. हिंद केसरी, भारत केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन, एशियन चॅम्पियनसह महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्याचा आनंद कुस्ती शौकिनांना घेता येणार आहे. विजेत्याला चांदीची गदा आणि १२ लाखापेक्षा अधिक रकमेच्या बक्षिसाने सन्मानित करण्यात येणार आहे. भैरवनाथ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून शहरात प्रथमच पारंपरिक जोर-बैठक स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेला नागरिक आणि तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काळेवाडी येथील आरंभ बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल ३४२ स्पर्धकांनी सहभाग घेत आपली ताकद आणि कौशल्य दाखवले. आर्यन मुळे या खेळाडूने तीन मिनिटांत 125 जोर मारत स्पर्धेतील सर्वात जास्त जोर मारण्याचा विक्रम नोंदवला. ३ मिनिटांच्या निर्धारित वेळेत अधिकाधिक जोर-बैठका मारणाऱ्या स्पर्धकांना क्रमवारीनुसार रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र देण्यात आले. *विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:* *१० ते १५ वयोगट:* – *प्रथम क्रमांक:* स्वराज लांडगे –…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यामध्ये संघटना बांधण्याच्या हेतूने जिल्हास्तरावर ब्लॉक बैठक व मेळावे घेण्यात आले, याचाच भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक १०/४/२०२५ रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे भोसरी, चिंचवड, पिंपरी, या तीन ब्लॉकची आढावा बैठक व पदाधिकारी मेळावा घेण्यात आला. मेळावा संपल्यानंतर निरीक्षकांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा केली. पिंपरी चिंचवड शहराला निरिक्षक म्हणून आलेले श्री. प्रफुल्ल गुडदे पाटील हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा हरियाणा राज्याचे प्रभारी आहेत. ते नागपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत, त्यांनी विधानसभा निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे अधिकृत…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शब्दधन काव्यमंच आयोजित भोसरी येथील’ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा…’ या मराठी साहित्यविश्वातील आगळ्यावेगळ्या कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे पिंपरी – चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते ज्ञानेश्वर कोटगिरे, युवा सामाजिक कार्यकर्ते ओंकार भागवत, अशोकमहाराज गोरे, शब्दधनचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करून आणि उसाच्या चरकाचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून आयोजनामागील भूमिका मांडली; तर तानाजी एकोंडे यांनी संत चोखामेळा यांच्या ‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा…’ या अभंगाचे गायन केले. याप्रसंगी अण्णा जोगदंड म्हणाले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील गडकोट किल्ल्यांचा वारसा जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही फक्त सरकारची जबाबदारी नसून ते आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. याबाबत युवकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने आयोजित केलेला दुर्गवेध हा ऐतिहासिक वारसा जपणारा उपक्रम प्रशंसनीय आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या गडसंवर्धन समितीचे माजी सदस्य व इतिहास अभ्यासक आनंद देशपांडे यांनी केले. पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि समान संधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गवेध २.० हा ऐतिहासिक वारसा जपणारा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गडकोट किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवणे, चित्रकला, पोस्टर मेकिंग, कविता, पोवाडा, भारूड, वक्तृत्व आणि…

Read More