Author: maharashtrabreakingnews.com

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची, भक्ती व प्रेमाची शंभू-शतकांची परंपरा लाभलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर येथून लंडनकडे प्रस्थान करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विठ्ठल दिंडीतील पवित्र पादुकांचे दर्शन सोहळा वाकड येथे संत तुकाराम मंगल कार्यालयात भाविकांच्या मोठ्या सहभागाने उत्साहात पार पडला. ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आंतरराष्ट्रीय वारी दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी पंढरपूर येथून प्रारंभ झाली असून ती २१ जून २०२५ रोजी लंडन येथे पोहोचणार आहे. जगातील सर्वात मोठ्या अशा भक्तिपर परंपरेचा हा अनोखा उपक्रम २२ देशांतून प्रवास करत एकूण १८,००० किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. वाकड येथील भाविकांचा भरभरून प्रतिसाद या वारीतील पहिल्या टप्प्यात वाकड येथील संत तुकाराम…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आधुनिकतेच्या काळात कुटुंबातील सदस्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अनेक कुटुंबातील लहान बाळांना आजी-आजोबांचा आणि आई-वडिलांचा हवा तेवढा सहवास मिळत नाही. त्यामुळे लहान बाळांच्या संगोपनात अनेक समस्या उद्भवतात. बाळाला पूर्ण वेळ झोप मिळाली तर त्याची शारीरिक व बौद्धिक वाढ व्यवस्थित होते. प्रत्येक पालकांना आपल्या बाळाची उत्तम काळजी घेणे आवश्यक वाटते. परंतु आई-वडील दोघेही नोकरी व्यवसायात व्यस्त असताना किंवा वर्क फ्रॉम होमच्या या जमान्यात बाळाच्या वाढीमध्ये अनेक समस्या उद्भवतात. या समस्या सोडवण्यासाठी क्रेडलवाइज कंपनीने एक अत्याधुनिक, तंत्रज्ञान युक्त, स्वयंचलित आधुनिक पाळणा तयार केला आहे म्हणजेच द. क्रेडलवाइज. या पाळण्यात ठेवलेले बाळ जागे होऊन हालचाल करू…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वात बुधवारी (१६ एप्रिल) ‘संविधान शिल्पकार’ या महानाटकाचे सादरीकरण होणार आहे. नागपूर येथील ‘द बोधिसत्व फाऊंडेशन’ संस्था प्रस्तुत हे महानाटक पिंपरी येथील एच.ए.मैदान येथे सायंकाळी पाच वाजता सुरू होईल. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महानाटकाला उपस्थित राहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व २०२५ चे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ११ एप्रिल ते १६ एप्रिल २०२५ याकाळात आयोजन केले आहे. या पर्वामध्ये ११ एप्रिल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र बुद्धिमत्तेतून साकारलेल्या संविधानात त्यांनी लोकशाही आणि प्रजासत्ताक कारभाराचा पुरस्कार केला. लोकशाहीत प्रत्येकाला समान हक्क तर प्रजासत्ताकमध्ये जनता हीच मालक अशी विचारधारा त्यांनी देशाला दिली. त्यांच्या याच सार्वभौम संविधानामुळे आज माझ्यासारख्या एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार होण्याची संधी मिळाली अशा शब्दांत, आमदार शंकर जगताप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त रहाटणी येथील आनंद बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेला जयंती उत्सवानिमित्त विहाराच्या वतीने साकारण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन आमदार शंकर जगताप हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात कर्करोगावरील उपचार तातडीने सुरू करा, अशी मागणी शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र राज्यप्रमुख डॉ. सतिश दत्तात्रय कांबळे यांनी आयुक्ताकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशिया खंडातील सर्वोत्तम महानगरपालिका म्हणून उल्लेख असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या जवळपास २५ लाख आहे व जवळपास महानगरपालिकेच्या आस्थापनेचे एकूण ७ रुग्णालय असतानादेखील यापैकी एकाही रुग्णालयात कर्करोगासारख्या गंभीर व जीवघेणा आजारावर उपचार करण्याकरिता डॉक्टर उपलब्ध नाहीत. ही पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांकरिता मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार थेरगाव येथे १०० खाटांचे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे, असे समजते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत वेगवेगळ्या विभागाचे करोडोचे टेंडर पास केले जातात.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील गुरु शोभा सामाजिक संस्था, आदियाल स्पोर्ट्स क्लब, बुद्धभूषण सेवा संघ, 125 वी संयुक्त जयंती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भीम जल्लोष’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आज १६ एप्रिल रोजी सायंकाळी ०७.०० वाजता पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक नजिक जय भीम चौक येथे होणार आहे. या कार्यक्रमात पार्श्वगायक मी होणार सुपरस्टार फेम छोटे वस्ताद सार्थक शिंदे, सारेगमप लिटल चॅम्प्स फायनलिस्ट हास्य जत्रेतील कलाकार मोनल कडलक यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन…

Read More

तळेगाव दाभाडे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक वास्तू लवकरच राष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या रूपात उभी राहणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली. डॉ. आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार शेळके म्हणाले, “या ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी राज्य शासनाने वेळोवेळी निधी दिला आहे. आता ही वास्तू राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावी यासाठी लागणारा निधी मी स्वतः पाठपुरावा करून उपलब्ध करून देईन. निधी कमी पडू दिला जाणार नाही.” तळेगाव दाभाडे येथील ‘संविधान भूमी’ म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याशी संबंधित असून, ती सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी…

Read More

जलसंपदा विभाग, महापालिका यांना सूचना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नदीसुधारच्या नावाखाली मुळा नदीपात्र अरुंद केले जात आहे. त्यास पिंपरी- चिंचवड शहरातील पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. या संदर्भात शहरातील संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नदीचे पात्र अरुंद होत आहे, पुराची परिस्थिती निर्माण होईल, याविषयी माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आणि जलसंपदा विभागाला तातडीने बैठक घेण्याची सूचना केली आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या सीमेवर असणाऱ्या मुळा नदीचे सुशोभीकरण सुरु आहे. सिमेंटीकरण सुरु आहे. त्यास पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. नदीकाठचे काँक्रीटीकरण थांबवून पूर थांबवण्यासाठी आणि नद्या स्वच्छ करण्यासाठी नदी बचाव शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रूपगंधा हा काव्यसंग्रह प्रकाशित होऊन ज्यांनी कमी वयामध्ये साहित्यात प्रगती केली आणि महाराष्ट्रात नावाजले जाऊ लागले त्यानंतर एल्गार, रंग माझा वेगळा, झंजावात इत्यादी संग्रह प्रकाशित झाल्यानंतर प्रसिद्ध कवी, गीतकार, गझलकार सुरेश भट हे नाव आजारावर झाले . उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली..! हे मशाली पेटवून सामान्य नागरिक वंचित आणि कामगारांमध्ये सामर्थ्य निर्माण करण्याचे काम सुरेश भट यांनी केले असे मत कामगार नेते काशिनाथ यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे गझलकार सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते,प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, सलीम डांगे,सुनील भोसले,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार  महाराष्ट्राचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे- रविराज इळवे  यांनी उपस्थित कामगार तसेच पालक यांना संबोधित करतांना म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या हक्कांचे रक्षण केले आहे.१९४६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत नवीन विधेयक सुचवले होते जे कामगारांना त्यांच्या कामाच्या जागेत, कामाच्या तासांच्या संदर्भात द्यावयाच्या किमान वेतनाशी संबंधित होते.हे विधेयक १९४८चा कायदा बनला आहे आणि त्याला सध्या किमान वेतन कायदा, १९४८ असे संबोधले जाते.     कल्याण आयुक्त रविराज इळवे म्हणाले की जर तुमच्याकडे दोन रुपये…

Read More