- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे भूषवणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे शुकवारी (१८ एप्रिल ) रोजी सकाळी ९.४५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात गुरुवारी एआय (AI) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचा (AI) प्रशासकीय कामकाजात अधिक प्रभावी वापर करून सुलभता कशी आणता येईल, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात एआयच्या मूलभूत संकल्पना, मशिन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स, एआयचे विविध टूल्स आदी विषयांवर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मीडिया अँड कम्युनिकेशन विभागातील सहाय्यक प्रा. डॉ. अजित गागरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशासकीय कामकाजात सुलभता आणण्यासाठी एआयचा वापर करून पीएमआरडीएमधील कामकाजात सुलभता कशी आणता येईल, याबाबत डॉ. घागरे यांनी संबंधित कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या दरम्यान त्यांनी…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या ५० लाख फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांनी सजलेल्या गाभा-यातील गणरायाचे रुप अधिकच मनोहारी दिसत होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने दुचाकी हातगाडीवर ठेवून आंदोलन करण्यात आले. “वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल” “नही चाहिये अच्छे दिन वापस लाव पुराने दिन” “पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे” अशा घोषणा युवकांचे वतीने देण्यात आल्या. यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “2014 पूर्वी कच्चा तेल 140 डॉलर प्रति बॅरल असताना भारतामध्ये 60 रुपये दराने पेट्रोल डिझेल मिळत होते. त्यावेळी दहा पैशांनी पेट्रोल वाढले असता रस्त्यावर उतरणारे भाजप नेते आज मुग गिळून…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिका या संस्थेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त संत तुकारामनगर, पिंपरी येथे अभिवादन करण्यात आले. संत तुकाराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम, प्रशासकीय अधिकारी हर्षद कावरे, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, सचिव प्रदीप बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या अभ्यासिकेतून अभ्यास करून प्रशासकीय सेवेत लँड सर्वेअर म्हणून निवडले गेलेले हर्षद कावरे यांनी, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ समाजसुधारक नव्हते; तर त्यांनी आर्थिक विषमतेवरही भाष्य…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लेवा पाटीदार मित्रमंडळ, सांगवी आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘जीवनगाथा बहिणाबाईंची’ हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. मनोरंजनातून संस्कृतीकडे नेणारा हा कार्यक्रम शनिवार, दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ४.४५ वाजता निळू फुले प्रेक्षागृह, सांगवी येथे होणार आहे. स्वर्गीय प्राध्यापिका कमल पाटील यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होत आहे. बहिणाबाईंच्या जीवनावर उद्योगनगरीत दहा वर्षांनी प्रयोग होत आहे, असे प्रसिद्धी प्रमुख पंकज पाटील यांनी कळवले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन चिंचवड विधानसभा आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे आहेत. पिंपरी – चिंचवड महापालिका माजी सभागृह नेता नामदेव…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोल्हापूरच्या नामांकित आनंदगंगा फाउंडेशन च्या वतीने २०२५ चा पुरस्कार वितरण सोहळा आदर्श गुरुकुल अँकॅडमी कोल्हापूर येथे संपन्न झाला. आनंदगंगा फाउंडेशन कोल्हापूर यांचे वतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. यावर्षी चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचालित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. अस्मिता बिनय यादव यांच्या शैक्षणिक , सांस्कृतिक, संशोधनकार्य ,सामाजिक क्षेत्रातील मोलाची केलेली अतूलनीय कामगिरी व कार्य पाहून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभपूर्वक यथोचित सन्मान प्रदान करण्यात आला . महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व गोवा याच्या राज्यातून सुमारे 250 प्रस्ताव आनंदगंगा फाउंडेशन पुरस्कार निवड…
तळेगाव दाभाडे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची तळेगाव शाखा आपला २० वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. यनिमित्त येत्या २४ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यंदाचा कलागौरव पुरस्कार हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रसाद खांडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे, सचिव संजय वाडेकर, संचालक सुरेश दाभाडे, राजेश बारणे, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. वर्धापन दिन समारंभ २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता सेवाधाम ग्रंथालया शेजारी…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकतेच काही दिवसांपूर्वी दिवंगत झालेले ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोजकुमार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शब्दधन काव्यमंचाच्या वतीने ‘मैं ना भूलूंगा…’ या विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. हरि ओम निवास, भालेकरनगर, पिंपळे गुरव येथे संपन्न झालेल्या या मैफलीत मनोजकुमार यांची चित्रपटसृष्टीतील वाटचाल, त्यांनी केलेला संघर्ष अन् लाभलेले देदीप्यमान यश; तसेच त्यांच्या वाट्याला आलेले मानसन्मान याविषयीचे रंजक किस्से कथन करण्यात आले. या उत्कंठावर्धक किस्से आणि हकिकतींसोबत मनोजकुमार यांच्यावर विविध चित्रपटांमध्ये चित्रीत झालेल्या एकल अन् युगुलस्वरातील सुरेल गीतांच्या सादरीकरणातून त्यांना सांगीतिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मैफलीत संजय गमे यांनी, ‘प्रीत जहाँ की रीत सदा…’ (पूरब और पश्चिम),…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका करआकारणी व करसंकलन विभागाकडून सन २०२५-२६ या वर्षाची मालमत्ता कराची बिले वितरण करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत प्रशासकीय नियंत्रणाखाली महिला बचत गटातील महिलांना मालमत्ता कराची बिले वितरण करण्यापूर्वीचे प्रशिक्षण मंगळवारी (दि. १५) यशस्वीरीत्या देण्यात आले. हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी उपयुक्त ठरत आहे. या प्रशिक्षणात बोलतांना महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाचे प्रमुख श्री. अविनाश शिंदे यांनी महिलांना मालमत्ता कर प्रणालीविषयी प्राथमिक माहिती दिली. तसेच करआकारणीची प्रक्रिया, बिलाचे स्वरूप, बिल वाटप, अँप्लिकेशनबाबतची माहिती, त्यामधील विविध तपशील, तसेच बिले वितरण करताना घ्यावयाची दक्षता, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बिलांचे वितरण करताना नागरिकांशी संवाद कसा…
