- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस मालमत्ता कर संकलन वाढीसाठी राबविलेले नवोपक्रम, ऑनलाईन सुविधा, मालमत्ता जप्ती लिलाव, जिओ सिक्वेन्सिंग, यू. पी. आय. सी. आयडी आदी प्रस्तावांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराअंतर्गत १० लाख रुपयांचे पारितोषिक महापालिकेस मिळाले असून आज मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या नागरी सेवा दिन २०२५ आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२३-२४ व २०२४-२५ पारितोषिक प्रदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्त शेखर सिंह यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी राज्याच्या कौशल्य विकास विभागाचे मंत्री…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेचा प्रारंभ बुधवार, दिनांक २३ एप्रिलपासून होत असून चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे दररोज सायंकाळी ठीक ७:०० वाजता व्याख्यानाची सुरुवात होईल. चौतिसाव्या वर्षात पदार्पण करणार्या जिजाऊ व्याख्यानमालेमध्ये बुधवार, दिनांक २३ एप्रिल रोजी ॲड. अनिशा फणसळकर ‘कुटुंब व्यवस्थेच्या र्हासाची कारणे आणि उपाय, पण याला जबाबदार कोण?’ या विषयावर प्रथम पुष्पाद्वारे विचार मांडतील. गुरुवार, दिनांक २४ एप्रिल रोजी महेश झगडे, डॉ. सतीश देसाई, उज्ज्वल केसकर ‘स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय राज’ या विषयावर ऊहापोह करतील. शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल रोजी डॉ. वर्षा तोडमल ‘अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड…
वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या जनता दरबार या उपक्रमाला गेल्या साडेपाच वर्षांपासून सातत्याने प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दर सोमवारी वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात आयोजित होणाऱ्या या दरबारात मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी येतात. आज आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी विविध प्रकारच्या समस्या आमदारांसमोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधांशी संबंधित तक्रारींचा समावेश होता. खराब रस्ते, गटारांची अकार्यक्षमता, पाणीपुरवठ्यातील अडचणी तसेच बंद असलेल्या स्ट्रीटलाईट्सबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. घरकुल योजनांत अपात्र ठरणे, परवानग्यांमध्ये होणारा विलंब, तसेच बेकायदेशीर बांधकामांबाबत कारवाईची मागणीही करण्यात आली. आरोग्य सेवा सुधारण्याची गरज, औषधांचा तुटवडा, तसेच आरोग्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातील मराठी माणसाच्या घराघरात, मनामनात अढळ स्थान मिळवलेल्या `महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेच्या टीमसोबत दिलखुलास संवाद साधण्याचा कार्यक्रम दिशा सोशल फाऊंडेशनने २८ एप्रिलला चिंचवड येथे आयोजित केला आहे. निमित्त आहे, आगामी ‘गुलकंद’ या सिनेमाचे. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये बहुचर्चित ठरलेला ‘गुलकंद’ हा सिनेमा १ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. याचे औचित्य साधून या सिनेमातील दिग्गजांशी संवाद साधत खुमारदार किस्से आणि गप्पांचा रंगतदार कार्यक्रम दिशा सोशल फाऊंडेशनने आयोजित केला आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सोमवारी, २८ एप्रिल, सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अभिनेते समीर चौघुले, सई ताम्हणकर,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रविवारी पहाटे पुणे शहरात एक आगळीवेगळी सामाजिक चळवळ अनुभवायला मिळाली, जेव्हा उन्नती सोशल फाऊंडेशन , इस्कॉन बीसीईसी, विशाल नगर यांच्या संयुक्त विद्यमाने रन टू फीड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. इस्कॉनच्या फूड फॉर लाईफ उपक्रमाअंतर्गत ही मॅरेथॉन भुकेच्या समस्येबाबत जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचे सार एका वाक्यात व्यक्त होते – “एक मैल, एक जेवण.” या मॅरेथॉनमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी, शाळांचे विद्यार्थी, वैयक्तिक धावपटू आणि स्वयंसेवक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. २१ किमी, १० किमी आणि ५ किमी अशा विविध अंतरांच्या स्पर्धात्मक धावसंख्या पुरुष आणि महिलांसाठी चार वेगवेगळ्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रात ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला, १ लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू होणार आहे. मात्र आधीच मोडकळीस आलेला रिक्षा चालकांचा व्यवसाय त्यांची असलेली कर्जे, आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षाचालकाना हक्क न देता ई बाईक टॅक्सीला परवानगी देणे म्हणजे रिक्षा चालकांचे नुकसान करणारा असल्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा अन्यथा ठिकठिकाणी आंदोलनाचा इशारा आज मोशी येथे झालेल्या रिक्षा चालकांच्या बैठकीत घेण्यात आला. कष्टकरी संघर्ष रिक्षा महासंघ महाराष्ट्र, श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघतर्फे आज मोशी येथे आयोजित केलेल्या बैठकीत सरकारच्या निर्णयास विरोध करण्यात आला. यावेळी कामगार नेते काशिनाथ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील वडापाव ,चहा नाश्ता, ज्यूस, फळे विक्री, आईस्क्रीम, भेळ पाणीपुरी सह खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची एक दिवशीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले यामध्ये ५२५ विक्रेत्यानी सहभाग घेतला त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात अन्न पर्यवेक्षक प्रमाणपत्राचे वाटप सह आयुक्त सुरेश अन्नपुरे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश अन्नपुरे सह आयुक्त पुणे, एस.एस.क्षीरसागर सहा.आयुक्त ए.आर.देशमुख सहा.आयुक्त,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते,आर.आर.काकडे, ना.रा.सरकटे,इरफान चौधरी,वृषाली पाटणे, नंदा तेलगोटे,जरिता वाठोरे, रुक्मिणी माशाळकर, फरीद शेख, सहदेव होनमने, कालिदास गायकवाड, श्रीहरी खत्री, मुमताज शेख, अंबालाल सुखवाल, रज्जाक शेख,विनोद इंगळे, सुरेश देडे आदी उपस्थित होते. यावेळी अन्नपुरे म्हणाले की खाद्यपदार्थ तयार करत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशभरात वकिलांवर होणारे हल्ले, हत्या, धमक्या व वकिलांच्या अपहरणाचे प्रकार वाढले असून यावर उपाययोजना म्हणून वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रविवार, दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी पुणे येथे केंद्रीय विधी व न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेतली. सदर भेटीदरम्यान केंद्रीय विधी व न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांच्यासोबत सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पुणे बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर, महाराष्ट्र नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अतिष लांडगे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संघटनेच्या नवीन पर्वात १४ मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील भाजप संघटनेला नवी ऊर्जा मिळाली असून, शहरात पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील १४ मंडलांसाठी नवीन अध्यक्षांची निवड रविवारी जाहीर करण्यात आली आहे. आमदार शंकर जगताप यांनी विधानसभा निहाय आयोजित कार्यक्रमांमध्ये नवनियुक्त मंडल अध्यक्षांची नावे जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले. प्राथमिक सदस्य, सक्रिय सदस्य, बूथ कमिटी यानंतर संघटन पर्वाच्या तिसऱ्या टप्प्यात मंडल अध्यक्ष यांची निवड करण्यात आली…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘अभिजात भारतीय संगीत परमेश्वराकडे नेते! भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सव काळात सिद्धी कापशीकर यांनी संवादिनी (हार्मोनियम)वर ७५ रागांचे वादन करून विश्वविक्रम केला असला तरी ही फक्त सुरुवात आहे!’ असे गौरवोद्गार आयुक्त शेखर सिंह यांनी निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. काही दिवसांपूर्वीच सिद्धी कापशीकर या युवतीने इंग्लंडमध्ये सलग दहा तास तेवीस मिनिटे आणि बावीस सेकंद संवादिनी (हार्मोनियम) वादनाचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. आपल्या विद्यालयाच्या माजी कार्यकर्तीच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतल्याप्रीत्यर्थ ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी आणि कापशीकर कुटुंबीयांच्या वतीने ‘यश हे अमृत झाले!’ या कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विधानपरिषद आमदार उमा खापरे,…
