- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए)च्या प्रस्तावित कामांसाठी भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक घेतली. शहराच्या अनुषंगाने पीएमआरडीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि विविध विकास प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच, प्रलंबित विकास कामांना तातडीने गती द्यावी, निधीसाठी पुरवठा करावा, अशा सूचनाही दिल्या आहेत. पुण्यातील ‘पीएमआरडीए’ प्रशासकीय इमारतीत गुरुवारी (दि 24) बैठक पार पडली. पिंपरी-चिंचवड शहराच्या अनुषंगाने राबवण्यात येणाऱ्या ‘पीएमआरडीए’च्या प्रस्तावित योजना व विविध विकास प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता…
रहाटणी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांच्या अडचणी, समस्या आणि स्थानिक प्रश्न थेट जाणून घेण्यासाठी आमदार शंकर जगताप यांच्यावतीने ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध समस्या मांडल्या. यामध्ये रस्त्यांची दुर्दशा, अपुरा पाणीपुरवठा, वीजपुरवठ्याची समस्या, स्वच्छतेचा अभाव, ड्रेनेजची अडचण अशा महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता. उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांचे म्हणणे गांभीर्याने ऐकले आणि आमदार शंकर जगताप यांनी तातडीने आवश्यक सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभही देण्यात आला. विशेषतः श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना यांतून पात्र लाभार्थ्यांना पेन्शन…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ठाकरे मैदान, यमुनानगर येथे शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी एच एस आर पी (हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) जोडणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिअल मेझॉन यांच्या सहकार्यातून संघाच्या सुमारे शंभर सभासदांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेटची जोडणी माफक दरात करून देण्यात आली. याबाबत रिअल मेझॉनचे विभागीय व्यवस्थापक राज पवार यांनी, केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निर्देशानुसार एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांच्या नंबरप्लेट बदलून एच एस आर पी या विशेष प्रकारच्या नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे. मात्र बरेच ज्येष्ठ नागरिक हे तंत्रस्नेही नसल्याने आधार ज्येष्ठ…
जिजाऊ व्याख्यानमाला – द्वितीय पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नि:स्पृह हवेत; तसेच नागरिक जागरूक असले तरच शहराचा योग्य विकास होतो!’ असा निष्कर्ष चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे गुरुवार, दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत माजी सनदी अधिकारी महेश झगडे, पुणे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, त्रिदल – पुणे संस्थेचे संस्थापक डाॅ. सतीश देसाई यांनी ‘स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय राज’ या विषयावर ऊहापोह करताना द्वितीय पुष्पाची गुंफण केली. सनदी अधिकारी राजेंद्र निंबाळकर अध्यक्षस्थानी होते; तसेच प्रशांत बधे, रवी चौधरी, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ…
जिजाऊ व्याख्यानमाला – प्रथम पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘वेगवेगळ्या प्रकारचे विसंवाद हे कौटुंबिक र्हासाचे कारण आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ ॲड. अनिशा फणसळकर यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे बुधवार, दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘कुटुंबव्यवस्थेच्या र्हासाची कारणे आणि उपाय, पण याला जबाबदार कोण?’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना ॲड. अनिशा फणसळकर बोलत होत्या. पिंपरी – चिंचवड महापालिका सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, माजी नगरसेवक सुरेश भोईर, साहित्यिक श्रीकांत चौगुले, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, उपाध्यक्ष ॲड. विपुल नेवाळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी येथील वर्धमान हाइट्स सोसायटीमधील एकाच कुटुंबातील १४ जण श्रीनगर येथे अडकले होते. स्थानिक परिस्थिती व तिकीट उपलब्धतेच्या अडचणींमुळे ते अत्यंत चिंतेत होते. या संकटात त्यांना आधार मिळाला तो म्हणजे पिंपरी-चिंचवडचे आमदार शंकर भाऊ जगताप. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या सर्वांना श्रीनगर ते पुणे या प्रवासासाठी हवाई तिकीट मिळवून दिले गेले. या प्रवाशांमध्ये गिरीश नायकवडी, विनय आगरखेड, सचिन पवार, प्रमोद पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. हे सर्व जण सहलीसाठी श्रीनगरमध्ये गेले होते. मात्र परतीच्या प्रवासासाठी आवश्यक तिकिटे मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले होते. या वेळी त्यांनी आमदार शंकर जगताप यांच्याशी संपर्क साधला. शंकर भाऊंनी…
तळेगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत १२८ लाभार्थ्यांना मंजुरी पत्रकांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम आमदार सुनील अण्णा जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने राबवण्यात आला. कार्यक्रमावेळी नबीलाल अत्तार, गणेश तळपे, रूपेश सोनूने, ऋषिकेश गायकवाड व केदार बावरे उपस्थित होते. या उपक्रमामुळे गरजू व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळणार असून, यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. या प्रसंगी लाभार्थ्यांनी प्रशासनाचे व आमदार कार्यालयाचे आभार मानले.
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडगाव येथील वस्ताद स्वर्गीय बाळसाहेब विठोबा गावडे जलतरण तलाव गेल्या पंधरा दिवसापासून बंद आहे.तो लवकर सुरु करावा अशी मागणी वूई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी क्रीडा सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांच्याकडे केली आहे.. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक लोकांचे त्यामुळे हाल होत आहेत आधीच पास काढलेले लोक अडकले तर नवीन लोकांना समजेना नक्की कुठे पास काढावा.करदात्यांच्या पैशातून हे सर्व व्यवस्थित होणे अपेक्षित आहे परंतु प्रशासनाकडून यात फक्त चाल ढकल व निष्काळजी पणा करताना दिसत आहे.या तलावात फक्त पोहणे एवढेच नसते तर व्यायाम व अनेकांना सराव महत्वाचा आहे पण प्रशासन आजिबात गांभीर्याने घेताना दिसत…
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, आळंदी या विश्वस्त संस्थेच्या विश्वस्त मंडळातील ६ पैकी उर्वरित ३ विश्वस्त पदांचे निवडीसाठी ठराविक अर्जदारांच्या मुलाखती नंतर दोन आळंदीतील तर एक पुण्यातील असे तीन विश्वस्तांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकार चैतन्य महाराज कबीर बुवा लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर आणि पुण्यातून ॲड. रोहीणी पवार या एकमेव पहिल्या महिला विश्वस्त यांचा समावेश आहे. आळंदीतील कबीर मठाचे प्रमुख म्हणून कार्यरत चैतन्य महाराज कबीरबुवा लोंढे, अमृतनाथ स्वामी महाराज धमर्शाळेचे प्रमुख महंत पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर तसेच महीला विश्वस्त म्हणून पुण्यातील विधीतज्ञ रोहीणी पवार यांची निवड जाहीर करण्यात…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आज निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ‘शाळा व्यवस्थापन समिती संवाद’ आयोजित करण्यात आल आला होता. यावेळी मार्गदर्शन करतांना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शिक्षण क्षेत्र हे अविरत चालणारे काम आहे, येणाऱ्या १० वर्षात आपण सगळे मिळून या क्षेत्रात मोठा बदल करू शकतो, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात आणि प्रशासन अधिकारी संगिता बांगर, प्राथमिक शाळांमधील सर्व मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन विकास समिती सदस्य उपस्थित होते. आयुक्त सिंह यांनी…
