- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – व्याख्यानमाला म्हणजे विचारांचे आदान – प्रदानाचे हक्काचे व्यासपीठ, जीवनाला समृद्ध वाटेने घेऊन जावे या उदात्त हेतूने उत्तमोत्तम अशा व्याख्यानांचा नजराणा स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळांने गेल्या चार दशकांपासून रसिकांपुढे खुला केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ,निगडी प्राधिकरण आयोजित छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेचा प्रारंभ महाराष्ट्र दिनी, गुरुवार, ०१ मे पासून होत असून स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, पेठ क्रमांक २५, प्राधिकरण, निगडी येथे दररोज सायंकाळी ठीक ७:०० वाजता व्याख्यानाची सुरुवात होईल. ४१व्या वर्षात पदार्पण करणार्या छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेमध्ये गुरुवार दिनांक ०१ मे रोजी राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी ‘वक्फ कायदा समजून घेताना’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतील. शुक्रवार, दिनांक ०२…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘मराठी मायबोलीच्या साहित्य परंपरेत स्त्री साहित्याची कामगिरी मोठी आहे. पारंपरिक लोकसाहित्यातही स्त्री साहित्य अग्रेसर आहे. संस्कारक्षम साहित्य निर्माण करून महाराष्ट्राची तरुणपिढी सुसंस्कारित, धाडशी आणि कर्तृत्ववान करण्यात स्त्रियांनीच मोलाची कामगिरी केली आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी स्त्रीशक्तीने सातत्याने प्रयत्न करायला हवेत. तोच प्रयत्न सीमा संतोष जाधव करीत आहेत!’ असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी मोशी येथे बोलताना काढले. सीमा संतोष जाधव यांच्या ‘काव्यसीमा’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून तुकाराम पाटील बोलत होते. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गझलकार राज अहेरराव, ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे, लोकसाहित्याचे अभ्यासक सोपान…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘समाजाची सत्य स्वीकारण्याची मानसिकता नाही!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘सत्य, असत्य आणि समाजशांती’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना डॉ. संजय उपाध्ये बोलत होते. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, गांधीपेठ तालीम मित्रमंडळ अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, ‘सत्य, असत्य हे दोन शब्द महाभारतापासून चर्चेत आहेत; आणि आजतागायत ही परंपरा चालू आहे. वास्तविक सत्य, असत्य याचा पडताळा करणे ही व्यक्तिगत बाब आहे. पहलगाम याबाबत जो…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – घर चलो,बस्ती चलो अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना भेटून लाभार्थ्यांना योजने बाबत काही अडचण आहे का हे जाणून घेतल्या. मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. कारसेवक सतीश शर्मा यांचा सत्कार केला.तसेच भा.ज.प च्या ज्येष्ठ नेत्या डॉ.प्रतिभा लोखंडे यांची भेट घेतली .माज़ी सैनिक देवकाते यांचा सत्कार करण्यात आला.भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातुन गणेश लंगोटे यांनी प्रभागात उपक्रम राबविला. यामध्ये संयोजक गणेश लंगोटे (उपाध्यक्ष भा.ज.पा )संजय मंगोडेकर(प्रवासी नेता) धर्म वाघमारे(मंडल अध्यक्ष )व सर्व शक्ति केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख उपस्थित होते.शुभम् पिंपळे ,अमोल सोंटकके,सुनील दौंडकर,अविनाश गावड़े,जनार्दन तलारे,संदीप कोकरे,वरद अंबिके,विकास नामदे,दशरथ कपाल,विट्ठल कराळे,चिराग सतपाल व जिजाबराव जाधव…
आरपीआयच्या पिंपरी चिंचवड मध्यवर्ती कार्यालयाचे वाकड येथे आठवले यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी, पुणे (दि. २७ एप्रिल २०२५) काश्मीर मध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर केलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने भारताची छेड काढण्याचा प्रकार आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. भारतातील मुस्लिम नेत्यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. आतंकवाद्यांचा नायनाट करण्याचा निर्धार मोदी यांनी केला आहे. पाक व्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. पाकिस्तान सोबत शांतता प्रस्थापित करण्याची भारत सरकारची इच्छा होती, परंतु आतंकवादी हे होऊ देत नाहीत. पाकिस्तान आतंकवाद्यांना सहारा देते हे वारंवार सिद्ध झाले आहे. आता आरपारच्या लढाई शिवाय पर्याय नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शनिवार दिनांक २६ एप्रिल रोजी निगडी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात वार्षिक स्नेह उत्सव, गुणगौरव आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग विजयकुमार थोरात, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर, तसेच प्राथमिक शाळांमधील सर्व मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू देऊन प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांचा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील नद्यांवर नदी सुधार प्रकल्प राबवला जात आहे. त्याची सुरुवात मुळा नदीतून पिंपळे निलख येथून करण्यात आली आहे. मात्र यासाठी शहरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी व सामाजिक संस्थांनी विरोध दर्शवला असून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. रविवारी (२७ एप्रिल) पुन्हा नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मुळा नदीकाठी आंदोलकांची भेट घेतली. नदी सुधारच्या नावाखाली तसेच शहरात होत असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत पर्यावरण प्रेमींनी बनसोडे यांना माहिती दिली. त्यावर अण्णा बनसोडे यांनी नदी सुधार प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याच्या सूचना पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांना दिले आहेत. पिंपळे निलख येथील शहीद…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगरपालिका आणि एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे (एमआयटी एडीटी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हेरिटेज यात्रा-२०२५” या तीन दिवसीय सांस्कृतीक वारसा उत्सवाला दुसऱ्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सिंहगड रस्त्यावरील पु.ल.देशपांडे उद्यानात सकाळपासूनच पुण्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी कलाग्रामला भेट देण्यास सुरुवात केली. लोणी काळभोर येथील विश्वशांती गुरुकुल स्कूल, सिंहगड स्प्रिंग डे, आणि बिबवेवाडी येथील विश्वकर्मा ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सकाळीच हजेरी लावली आणि दिवसभर विद्यार्थ्यांची संख्या वाढतच राहिली. गुरुवारी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पृथ्वीराज बी.पी., एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश तु. कराड यांच्या हस्ते या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ‘एमआयटी…
लोंढे कबीर महाराज, पाटील महाराज, ॲड. रोहिणी पवार यांचा सत्कार ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट तर्फेही सत्कार आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी, आळंदी या विश्वस्त संस्थेच्या विश्वस्त मंडळावर नवीन नियुक्त झालेल्या विश्वस्तांचा सत्कार आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी शिक्षण संस्था, आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचेसह आळंदीकर ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विविध सेवाभावी संस्था, मंडळे, वारकरी शिक्षण संस्था आदींचे वतीने नूतन पदाधिकारी यांना आळंदीकर ग्रामस्थांचे वतीने सन्मानित करण्यात आले. या सत्कारात संप्रदायातील कीर्तनकार चैतन्य महाराज कबीर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवारी (दि. २७ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जैतवन बुद्ध विहार शेजारी, वेणु नगर, वाकड, पुणे ५७ येथे अध्ययावत पक्ष कार्यालय उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक व आरपीआय (आठवले गट) शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब राजाभाऊ सरोदे, आरपीआय महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, संघटक सचिव सूर्यकांत वाघमारे, एम्प्लॉईज फेडरेशनचे…
