Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने कामगारदिनानिमित्त येत्या गुरूवारी (दि.१) सर्व कष्टकरी, कामगार व कर्मचारी संघटनांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र प्रदेश इंटकचे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. गुरुवारी दि. ०१ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता दापोडीतील शहिद भगतसिंग यांच्या पुतळ्यापासून, मुंबई पुणे महामार्गाने सरळ, निगडी येथील भक्तिशक्ती पुतळ्यासमोरील चौकात या रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे. या वेळी महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष कैलास कदम, मुकेश तिगोटे, बाबासाहेब चव्हाण, मनोहर गडेकर, अनिल आवटी, विष्णूपंत नेवाळे, राजेंद्र खराडे, सुनिल देसाई, शशिकांत थुमाळ, किशोर घडियार, यशवंत…

Read More

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थांच्या वतीने एक मे कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला  उपेक्षित  कष्टकरी कामगारांचा त्यांच्या कामाच्या जागी जाऊन यथोचित सन्मान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या घंटागाडीवर काम करणाऱ्या जयश्री म्हस्के, ऊन, पाऊस, थंडीत देखील रोज वृत्तपत्र विक्री करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राऊबाई बिराजदार, पोटासाठी हातगाडीवर केळी विकणाऱ्या अनिता जयस्वाल,  पिंपळे गुरव स्मशानभूमीत काम करणारे कामगार विठ्ठल देवकर या कामगारांना त्यांच्या कामाच्या जागी जाऊन ” मानवी दिलासा पुरस्कार” शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, साडीचोळी, पोशाख  तसेच संस्थेच्या वतीने रोख अर्थसहाय्य देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीर पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता आकुर्डीतील पांडुरंग काळभोर सभागृह येथे ‘वारकरी भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी समस्त वारकऱ्यांच्या वतीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव जयंत आप्पा बागल, हभप अनिकेत मोरे इनामदार, हभप जगन्नाथ नाटक पाटील, मा. नगरसेवक सुरेश भोईर, हभप दत्तात्रय साकोरे, हभप कैलास कातळे, किशोर पाटील, हभप जयवंतराव शिंदे, हभप खंडू मोरे, अरुण गोंटे, किशोर पवार, संदीप भालके, किरण दळवी, हभप विनायक महाराज जगताप, राम साखरे, अभिजित वाघेरे, नरेश गुलानी, इंद्रजित पाटोळे, संदेश गोलांडे आदी उपस्थित होते.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगारदिनी संयुक्त महाराष्ट्रास ६५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’, या कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित, ‘महाराष्ट्र गौरव रथयात्रा’ चे उद्या, बुधवार, दि. ३० एप्रिल २०२५ रोजी आगमन होत असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या – चळवळीमध्ये १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. त्यात्तील प्रातिनिधीक स्वरूपात काही हुतात्म्यांची रथयात्रेच्या माध्यमातुन हुबेहूब वेशभूषा प्रधान करणार आहे व त्यांच्या प्रति…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी गावातील कुदळे कॉलनी क्रमांक 3 मध्ये  ड्रेनेजचे मैला मिश्रित पाणी  रस्त्यावर  येत आहे. त्याच्या वासाने  रोगराई पसरण्याची जास्त भीती नागरिकांना वाटत आहे.रोगराई पसरू नये यासाठी महापालिकेने उपाय योजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी  महापलिका प्रशासनाकडे केली आहे. गेल्या वर्षभरापूर्वी ड्रेनेजची नवीन लाईन टाकून सुद्धा महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना ड्रेनेजची समस्या सोडवण्यास अपयश आले. मैला मिश्रित पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी व उग्र वास यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.सुहास कुदळे सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी याबाबत वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले. तरी याठिकाणी रोगराई पसरू नये यासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हैदराबाद येथे दि. २५ आणि २६ एप्रिल  पार पडलेल्या पहिल्या भारत शिखर परिषदेस चिंचवड चरखा संघाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तेलंगणा राज्य सरकारच्या वतीने ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये १०० देशातून ४५० प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित होते. यामध्ये चिंचवड चरखा संघाचे मयूर जयस्वाल यांना तेलंगणा मुख्यमंत्री रेवता रेड्डी यांच्या वतीने विशेष आमंत्रित करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या परिषदेमध्ये जागतिक स्तरावरील न्याय या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये जगातील अनेक देशांचे मंत्री, खासदार, सामाजिक संस्थेत काम करणारे अनेक दिग्गज पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. युवक व राजकारण, लैंगिक समानता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  वाघेश्वर विद्यालय येथे  20 एप्रिलला इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला.या कार्यक्रम मध्ये प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मा. मानद सचिव के. के. निकम विद्यालयाचे प्राचार्य धावडे सर तसेच इतर सहकारी शिक्षक व 99 – 2000 बॅच चे 32 शिक्षक व त्याच बॅच चे 192 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी शाळेसाठी 80 लिटर पाणी गार करण्याची क्षमता असलेला वॉटर कूलर शाळेस भेट दिला. सकाळी सात वाजता श्री वाघेश्वर मंदिर येथे अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी नऊ ते दहा या वेळेत शाळेमध्ये उपस्थित झाले, सर्वांचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  लोणावळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ज्येष्ठ माजी नगरसेविका कल्पनाताई आखाडे, नगरसेविका सिंधूताई परदेशी यांच्यासह उपशहरप्रमुख, विविध पदाधिका-यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्वांचे शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल अशी ग्वाही दिली. यावेळी शिवसेना महिला उपनेत्या सुलभा उबाळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख  शरदराव हुलावळे , युवा सेना उपजिल्हाप्रमुख  दत्ताभाऊ केदारी, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख  राजाभाऊ खांडभोर, युवासेना पुणे जिल्हा समन्वय सागर पाचरणे, शिवसेना उप तालुका प्रमुख  राम सावंत, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, शिवसेना महिला लोणावळा शहर संघटिका मनीषाताई…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील १० लोकप्रिय उद्यान आणि इतर सुविधांमध्ये एकूण १३ पॉइंट-ऑफ-सेल म्हणजेच पीओएस मशिन्सची व्यवस्था केली आहे. पीसीएमसीच्या उद्यानांमध्ये पहिल्यांदाच पीओएस मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. यापूर्वी प्रवेश शुल्कासाठी फक्त रोख व्यवहार स्वीकारले जात होते. आता या नव्या प्रणालीमुळे नागरिक पीओएस मशिनद्वारे प्रवेश शुल्क भरणार असून, प्रत्येक व्यवहारासाठी एक प्रत्येक व्यवहारासाठी एक नवीन डायनॅमिक क्यूआर कोड तयार होईल. त्यामुळे प्रत्येक पेमेंटची नोंद राहील आणि व्यवहार पारदर्शक होतील. या उपक्रमाविषयी बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “उद्यानांमध्ये पीओएस मशिन्सचा वापर सुरू केल्यामुळे आम्ही अधिक पारदर्शक आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६७ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे २१, ४, ६, ६, १०, ३…

Read More