- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून २६ जानेवारी २०१८ साली तत्कालीन आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे केलेल्या धरणे आंदोलनात पिंपरी – चिंचवड येथून महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या सक्रीय सहभागाबद्दल माधवराव पटवर्धन सभागृहात मंगळवार, दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या समारंभात त्यांचा सत्कार करण्यात आला. दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात पिंपरी – चिंचवड येथून राजन लाखे तर सातारा येथून शाहूपुरी शाखेचे तत्कालीन अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, डॉ. राजेंद्र माने, वजीर नदाफ, नंदकुमार सावंत आदींचाही…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारत आणि कोरिया यांच्यामध्ये शिक्षण, संस्कृती आणि जागतिक स्तरावरील रोजगार, उद्योग, व्यापाराच्या अनेक संधी नव्याने निर्माण होत आहेत. यासाठी या दोन्ही राष्ट्रांमध्ये शैक्षणिक, पर्यटन संवाद (एज्युकेशनल टुरिझम टॉक) होणे आवश्यक आहे. यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठाने सुरू केलेले काम भारत कोरिया यांच्यातील दुवा ठरेल. हा करार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी एक यशस्वी माध्यम ठरणार आहे असा विश्वास केटीओ इंडिया क्षेत्रीय संचालक मायॉंग किल युन यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशन (केटीओ) च्या सहकार्याने पुण्यात आयोजित कोरियन एज्यू टूर रोड शो…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हास्यजत्रेने गेली सात वर्षे महाराष्ट्राला आनंद दिला, उत्तम आरोग्य दिले. संपूर्ण जगाची उलथापालथ झाली आणि प्रत्येकजण जेव्हा दु:खाच्या खाईत लोटले गेले होते. अशावेळी हास्यजत्रेने प्रत्येकाला आधार दिला. स्वच्छ व शुध्द विनोद हे हास्यजत्रेचे वैशिष्ट्य आहे. अगदी त्याचपध्दतीने ते गुलकंदच्या बाबतीत आहे, असे अभिनेते प्रसाद ओक यांनी चिंचवड येथे बोलताना सांगितले. दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने “निमित्त गुलकंदचे, दिलखुलास गप्पा हास्यजत्रा टीमसोबत” या कार्यक्रमाचे प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन गोस्वामी, अभिनेते प्रसाद ओक, समीर चौघुले, सई ताम्हणकर, ईशा डे, शार्विल आगटे, गायिका सावनी रवींद्र हे व्यासपीठावर उपस्थित होते. लेखक सचिन…
तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था व आर.एम.के. स्पेसेसच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव, चाकण, कान्हे, उर्से, टाकवे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी दिली. हा नोकरी महोत्सव येत्या ०२ मे रोजी सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ या वेळेत तळेगाव दाभाडे येथील यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, इंद्रायणी महाविद्यालय येथे होणार आहे. यामध्ये दहावी, बारावी, डिप्लोमा, आयटीआय, इंजीनियरिंग, बी.एस.सी., एम.एस.सी., बी.ए., बी.कॉम, बी.बी.ए., बी.सी.ए. उत्तीर्ण असलेल्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. याचा जास्तीत जास्त युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात…
पीएमआरडीएचे अधिकारी सोमवार, गुरुवारी नागर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नागरिकांना आपल्या अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात, या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सर्व विभागप्रमुख आठवड्यातील दोन दिवस नागरिकांच्या भेटीसाठी पूर्ण वेळ कार्यालयात उपलब्ध असणार आहे. या निर्णयाची गेल्या काही दिवसांपासून पीएमआरडीएमध्ये अंमलबजावणी करण्यात येत असून त्या अनुषंगाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आदेश काढले आहेत. शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कार्यालयीन स्तरावर काही निर्णय घेण्यात आले असून नागरिकांच्या सोयीसाठी त्यातील हा एक महत्वपुर्ण निर्णय आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात आपल्या कामानिमित्त अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित निर्णय घेण्यात आला आहे.…
महाराष्ट्रातील पाच कर्तबगार भगिनींचा आणि माजी मुख्यमंत्र्यांचा करणार सन्मान मुबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संगम कलेचा… सन्मान संस्कृतीचा… या भूमिकेतून संयुक्त महाराष्ट्राची ६५ वर्षाची गौरवशाली परंपरा… संस्कृतीचा जागर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे १ ते ४ मे दरम्यान ‘गौरवशाली महाराष्ट्र’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्राची ६५ वर्षाची गौरवशाली परंपरा… संस्कृतीचा जागर होणार असून ज्या – ज्या महापुरुषांनी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये मोलाचे योगदान दिले अशा त्यांच्या महानुभवांच्या कार्याचा सन्मान या महोत्सवात असणार आहे. १ मे १९६० रोजी मुंबईसह मराठी भाषिकांच्या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर संपूर्ण…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने कामगारदिनानिमित्त येत्या गुरूवारी (दि.१) सर्व कष्टकरी, कामगार व कर्मचारी संघटनांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र प्रदेश इंटकचे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. गुरुवारी दि. ०१ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता दापोडीतील शहिद भगतसिंग यांच्या पुतळ्यापासून, मुंबई पुणे महामार्गाने सरळ, निगडी येथील भक्तिशक्ती पुतळ्यासमोरील चौकात या रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे. या वेळी महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष कैलास कदम, मुकेश तिगोटे, बाबासाहेब चव्हाण, मनोहर गडेकर, अनिल आवटी, विष्णूपंत नेवाळे, राजेंद्र खराडे, सुनिल देसाई, शशिकांत थुमाळ, किशोर घडियार, यशवंत…
पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थांच्या वतीने एक मे कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला उपेक्षित कष्टकरी कामगारांचा त्यांच्या कामाच्या जागी जाऊन यथोचित सन्मान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या घंटागाडीवर काम करणाऱ्या जयश्री म्हस्के, ऊन, पाऊस, थंडीत देखील रोज वृत्तपत्र विक्री करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राऊबाई बिराजदार, पोटासाठी हातगाडीवर केळी विकणाऱ्या अनिता जयस्वाल, पिंपळे गुरव स्मशानभूमीत काम करणारे कामगार विठ्ठल देवकर या कामगारांना त्यांच्या कामाच्या जागी जाऊन ” मानवी दिलासा पुरस्कार” शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, साडीचोळी, पोशाख तसेच संस्थेच्या वतीने रोख अर्थसहाय्य देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीर पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता आकुर्डीतील पांडुरंग काळभोर सभागृह येथे ‘वारकरी भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी समस्त वारकऱ्यांच्या वतीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव जयंत आप्पा बागल, हभप अनिकेत मोरे इनामदार, हभप जगन्नाथ नाटक पाटील, मा. नगरसेवक सुरेश भोईर, हभप दत्तात्रय साकोरे, हभप कैलास कातळे, किशोर पाटील, हभप जयवंतराव शिंदे, हभप खंडू मोरे, अरुण गोंटे, किशोर पवार, संदीप भालके, किरण दळवी, हभप विनायक महाराज जगताप, राम साखरे, अभिजित वाघेरे, नरेश गुलानी, इंद्रजित पाटोळे, संदेश गोलांडे आदी उपस्थित होते.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगारदिनी संयुक्त महाराष्ट्रास ६५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’, या कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित, ‘महाराष्ट्र गौरव रथयात्रा’ चे उद्या, बुधवार, दि. ३० एप्रिल २०२५ रोजी आगमन होत असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या – चळवळीमध्ये १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. त्यात्तील प्रातिनिधीक स्वरूपात काही हुतात्म्यांची रथयात्रेच्या माध्यमातुन हुबेहूब वेशभूषा प्रधान करणार आहे व त्यांच्या प्रति…
