Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘महात्मा बसवेश्वर हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिल्या लोकशाहीचे उद्गाते होते!’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी  महात्मा बसवेश्वर पुतळा उद्यान, भक्ती – शक्ती चौक, निगडी येथे व्यक्त केले. वीरशैव लिंगायत समाज आणि पिंपरी – चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शब्दवैभव काव्यसंमेलनात डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील अध्यक्षस्थानी होते; तसेच नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, पिंपरी – चिंचवड साहित्य मंचाचे अध्यक्ष राजेंद्र घावटे, सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित, बसवेश्वर पुतळा समिती अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ. श्रीपाल सबनीस…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  घाट भागात रेल्वेचे इंजिन घासते, वेळही जातो. त्यामुळे कर्जत ते लोणावळा दरम्यान टनेल निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठीचा 2100 कोटी रुपयांचा विकास आराखडा (डीपीआर) तयार आहे. हा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.  हा टनेल करण्यासाठी आवश्यक ती मदत मदत करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली असल्याचेही बारणे यांनी सांगितले. मुंबई रेल्वे विभागाची बैठक खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत पार पडली. खासदार नरेश म्हस्के, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार श्री. चंद्रकांत हंडोरे, खासदार  धैर्यशील मोहिते, मुंबईचे रेल्वे महाप्रबंधक धर्म…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपच्या विद्यमान शहराध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नवीन शहराध्यक्ष निवडीच्या चर्चेला वेग आला आहे. विलास मडीगिरी, शत्रुघ्न काटे, अनुप मोरे, शैला मोळक यांना शहराध्यक्षपदी मिळणार का संधी अशी चर्चा सुरु आहे. नव्यांना संधी देतात का जुन्या निष्ठावान कार्यकर्त्याला बढती देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शहराध्यक्षपदासाठी आतापर्यंत 8 इच्छुकांची नावे समोर आली आहेत. या इच्छुक उमेदवारांमध्ये जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांत स्पर्धा आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, नामदेव ढाके, विलास मडिगिरी, अनुप मोरे, भीमा बोबडे, शैला मोळक यांच्या नावांची चर्चा आहे. तर नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये विद्यमान शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, विजय फुगे इच्छुक आहेत. भारतीय…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोया फिटनेस फेडरेशन संस्थेचा दशकपूर्ती सोहळा रविवारी (दि.27) पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे साजरा करण्यात आला. कोया ही पिंपरी चिंचवड शहरातील पहिली व एकमेव सायंटिफिक रिदमिक जिम्नॅस्टिक्स खेळाचे प्रशिक्षण देणारी संस्था असून, तेथे केवळ मुलींना प्रशिक्षण देण्यात येते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज देवळेकर तसेच, सिम्बायोसिस स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायन्सच्या संचालिका डॉ. नयना निमकर, पिंपरी-चिंचवड जिम्नॅस्टिक्स संघटनेचे संजय मंगोडेकर, चेतन भुजबळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात गणेशवंदना ही योगासनाच्या प्रात्यक्षिकांनी झाली. संस्थेच्या 70 मुलींनी योगासन व रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या कौशल्यांचे सादरीकरण करून…

Read More

– भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक उपक्रम पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘‘दादा तू आला आणि कुणाला आपल्या आईची आठवण आली… तर कुणाला दूर परदेशात असलेल्या मुलांची…कुणाच्या चेहऱ्यावर हसू उमटले… किमान आजचा एक दिवसतरी..! तुझ्याकडून अशीच लोकांची, वंचितांची सेवा घडो…असा अशिर्वाद देते..बाळा खूप मोठा हो…’’ हे हृदयस्पर्शी शब्द आहेत, एका वृद्धाश्रमातील आजीचे..! निमित्त होते आंबा महोत्सव. समाजातील दुर्लक्षित आणि निराधार व्यक्तींसोबत सण-उत्सव साजरा झाला पाहिजे. या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘‘आंबा महोत्सव’’ साजरा करण्यात आला. ‘‘गोडवा आपुलकीचा, अक्षय समाजसेवेचा’’ या संकल्पनेतून शहर आणि परिसरातील वृद्धाश्रम, अनाथाश्रम, दिव्यांग भवन, अंध शाळा असे एकाच…

Read More

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   तळेगाव दाभाडे आज बुधवार दिनांक ३० एप्रिल रोजी नगरपरिषद कार्यालयात शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते. या बैठकीत शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उर्वरित प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या. प्रस्तावित रस्ते कामांबाबतही चर्चा झाली. शहरातील कचरा व्यवस्थापन, नाले सफाई व अग्निशमन यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना नियमशीर व शिस्तबद्ध काम करण्याच्या कठोर सूचना देण्यात आल्या. शहरात एकूण ६ ठिकाणी नव्याने बस थांबे उभारण्यात येणार असून जिजामाता चौक, स्टेशन चौक व…

Read More

पिंपरी,, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला २०३२ साली ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. यासाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या भविष्यातील सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी “पीसीएमसी@५०” शहर नियोजन धोरण राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील विविध घटकातील २०,००० नागरिकांचा सर्वेक्षण उपक्रम राबविणार आहे. या सर्वेक्षणामध्ये शहरातील विविध स्वयं सहायता गटातील (SHG) २५० हून अधिक महिला सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी महिला बचत गटांच्या महिलांना सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. पीसीएमसी@५०” शहर नियोजन उपक्रमाअंतर्गत शहरातील सर्व स्तरातील नागरिकांचे प्रातिनिधिक स्वरुपात प्रतिनिधित्व सुनिश्चित करत सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणामध्ये महिला बचत गटांमार्फत शहरातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाच्यावतीने सोमवारी (२८ एप्रिल) सेवा हक्क दिन तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्तीचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत समाज विकास विभागाच्या वतीने शहरातील झोपडपट्टी व बचत गटांमध्ये समूह संघटकांच्या माध्यमातून विशेष मेळावे व बैठका घेण्यात आल्याची माहिती समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली. सदर उपक्रमात समाज विकास विभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सेवा हक्काबाबत जागरूकता निर्माण होण्यास…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह. भ. प. बाळासाहेब काशीद पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास बालवडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे होत असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भव्य मंदिराच्या निर्माण कामासाठी एक्कावन लाख रुपयांचा निधी दिला. या कार्याबद्दल पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्यावतीने बालवडकर यांचा सत्कार करण्यात आला. वारकरी सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, बोपखेल, फुगेवाडी, पिंपळे निलख ग्रामस्थ यांच्या वतीने जुनी सांगवीतील मारुती मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. हि आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटे पासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती’. पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि कुटूंबियांच्या वतीनं हा महानैवैद्य देण्यात आला तत्पूर्वी पहाटे तीन वाजता ब्रह्माणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर वेदश्री खाडिलकर ओक यांनी बाप्पाच्या चरणी आपली गायन सेवा सादर केली सकाळी आठ ते बारा…

Read More