- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी लघुपट ‘सुलतान’ ने फ्रान्समधील प्रतिष्ठित Toulouse Indian Film Festival 2025 मध्ये प्रेक्षकांचा पसंतीचा पुरस्कार जिंकत मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा जागतिक पटलावर फडकवला आहे. लेखक-दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांच्या या लघुपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि त्याने Audience Choice Award सन्मानित होऊन आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपला ठसा उमठवला. ‘सुलतान’च्या यशाची गोष्ट त्याच्या साध्या, पण प्रभावी मांडणीवर आधारित आहे. अविनाश कांबीकर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित या लघुपटाच्या माध्यमातून ग्रामीण वास्तव, माणसांची झुंज आणि सामाजिक विषमतेविरुद्धचा संघर्ष प्रभावीपणे सादर केला आहे. टूलूज फिल्म फेस्टिव्हल २०२५ च्या दहाव्या आवृत्तीत भारतातील विविध भाषांतील दर्जेदार चित्रपटांचा समावेश होता. मात्र, ‘सुलतान’ ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान मिळवले. या महोत्सवात प्रमुख…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पारंपरिक शिक्षणाला आधुनिकतेची जोड देत पिंपरी चिंचवड महापालिका गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महापालिका अत्यंत सकारात्मक पाऊले टाकत असून शहराच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करत आहे ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १८, चिंचवड येथील केशवनगर शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसदस्य सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नामदेव ढाके, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, माजी नगरसदस्या आश्विनी चिंचवडे, मोना…
– वैद्यकीय सेवा, संशोधन क्षेत्रात शहराची नवी ओळख – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली मागणी – भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचा आग्रही पाठपुरावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्योगनगरी, मेट्रो सिटी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आता मेडीसिटी प्रकल्प विकसित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवा आणि संशोधन क्षेत्रातही शहराची लौकीक वाढणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. मेडीसिटी प्रकल्प विकासासाठी आमदार लांडगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी केली आहे. त्यासाठी दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 30 लाखांच्या घरात आहे. शहराचे नागरीकरण आणि विस्तार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथील एका लेबर कॅम्पमध्ये देशी दारूचा अनधिकृत अड्डा चालवला जात होता. या ‘लेबर कॅम्प’ मध्ये तीन हजाराहून अधिक लेबर वास्तव्याला आहेत. धक्कादायक प्रकार म्हणजे या लेबर कॅम्पला लागूनच मोठी गृहनिर्माण वसाहत असून, या देशी दारूच्या अड्ड्यामुळे वारंवार वादाचे प्रसंग उद्भवले जात होते. त्यामुळे सदर दारुचा अड्डा उध्वस्त करण्यात आला. बेकायदेशीर दारुच्या अड्ड्यामुळे स्थानिक सोसायटीधारकांनी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुशंगाने आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना उचित कारवाई करण्याबाबत सूचना केली होती. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन हा दारूचा अड्डा उखडून टाकला. या कारवाईमुळे येथील सोसायटी धारकांनी अक्षरशः…
तळेगाव दाभाडे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कंपन्यांना आवश्यक त्या कौशल्याधारित मनुष्यबळाची माहिती घेऊन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याप्रकारे अभ्यासक्रम राबविले जातील. औद्योगिक क्षेत्रातील वाहतूकव्यवस्था, आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी या कॉलेजमध्ये सर्व कंपन्यांच्या एचआरसोबत बैठक घेऊन नियोजन करणार आहोत. कारण शिक्षण आणि उद्योग हातात हात पुढे जाणे, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक रामदास काकडे यांनी केले. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, इंद्रायणी महाविद्यालय येथे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव, चाकण, कान्हे, उर्से औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. या नोकरी महोत्सवात ६५०…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. हवेली तालुक्यात लोणी काळभोरमध्ये नुकतीच तीन ठिकाणी अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले. लोणी काळभोरमधील या कारवाईमुळे होर्डींगधारक, ॲडव्हरटायझिंग कंपनी यांनी धसका घेतला असून प्राधिकरणाच्या विकास परवानगीकडे अंतिम चलणे भरत आहे. यासह काही होर्डींग संबंधितांनी स्वत:हून काढून घेतले. अवकाळी पाऊस, वादळी वारे आदीमुळे अशा होर्डींगपासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी वर्दळीच्या व रहदारीच्या ठिकाणाचे धोकादायक, मर्यादेपेक्षा उंचीचे, दुबार संरचना होर्डिंग काढून घ्यावेत. तसेच होर्डींगधारकांनी अनधिकृत होर्डींगला परवानगी घेण्यात यावी, अन्यथा पीएमआरडीएच्या माध्यमातून एकतर्फी निष्कासन कारवाई करण्यात येईल. याची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एक मे हा जागतिक कामगार दिन म्हणजेच श्रमिक दिन म्हणून जगातील 80 देशांमध्ये कामगार दिन म्हणून पाळला जातो . जेष्ट ज्येष्ठ साहित्यिक कामगार नेते अरुण बोराडे म्हणाले की आजही कामगाच्या बऱ्याचशा संघटना मालक शाहीच्या दावणीला बांधलेल्या आहेत तर फारच थोड्या कामगार संघटना प्रामाणिक पणे काम करतांना दिसतात, कामगार देशोधडीला लागला आहे सर्व कायदे उद्योग धार्जिने झाल्याची खंत बोराडे यांनी व्यक्त केली. नारायण लोखंडे यांनी साप्ताहिक सुट्टी दिली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 105 जणांनी अहुती दिली याचे स्मरण केले पाहिजे आणि कोयना धरणासाठी मंजुरी आणण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले यांचे योगदान विसरून चालता येणार नाही…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘देशात संविधान सर्वोच्च असून संविधानाच्या अधीन राहून संसदेने संमत केलेले कायदे ज्याप्रमाणे सर्व धर्म, जाती, पंथ यांना बंधनकारक असतात, त्याचप्रमाणे ते वक्फ बोर्डाला लागू असतील!’ असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक ०१ मे २०२५ रोजी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित चार दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेत ‘वक्फ कायदा समजून घेताना…’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना डाॅ. मेधा कुलकर्णी बोलत होत्या. ॲड. संग्राम कोल्हटकर, जनसेवा बँकेचे संचालक राजन वडके, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख…
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी संभाजीनगर शाहूनगर मंडलाच्या वतीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे जाहीर अभिनंदन करुन नागरिकांना लाडू भरवून या निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करण्याचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 14 मधील मोहननगर कमानी शेजारील चौकात महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार माननीय श्री अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले. यावेळी या निर्णयाचे भविष्यात नागरिकांना होणारे फायदे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले. देशाच्या पंतप्रधानांचा अभिमान वाटत असून असे धाडसी निर्णय केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रात कार्यरत असणारे NDA सरकारच घेऊ शकते असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले. यावेळी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डीतील विठ्ठलवाडी येथील श्रीकृष्णनगरवरुन क्रांतीनगरकडे जाणारा मुख्य रस्ता दातीर कुटुंबाने अचानक १ मे पासून रस्ता बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांची अडचण झाली असून स्थानिक माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी तत्काळ तिथे धाव घेतली. महापालिका अधिका-यांना बोलावून घेऊन रस्ता रहदारीस खुला करण्याची मागणी केली. लवकरात लवकर रस्ता खुला न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा कुटे यांनी दिला आहे. याबाबतची माहिती अशी की, आकुर्डीत दाट लोकवस्ती आहे. विठ्ठलवाडी येथील श्रीकृष्णनगरवरुन क्रांतीनगरकडे जाणारा एक मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर सन १९९८ मध्ये डांबरीकरण झाले आहे. महापालिकेकडून रस्त्याची देखभाल दुरुस्ती केली जाते. हजारो लोक या रस्त्यावरुन ये-जा…
