Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘अमेरिकेने सुरू केलेले टॅरिफ युद्ध ही भारतासाठी सुसंधी आहे!’ असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर  निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित चार दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेत ‘अमेरिकन टॅरिफच्या भयकंपाचे वास्तव’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफताना शैलेंद्र देवळाणकर बोलत होते. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद रायचूर, इंद्रायणी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष महेश चांडक, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. आनंद रायचूर यांनी, ‘अर्थविषयक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे!’ असे मत व्यक्त केले. महेश…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बारावी परीक्षेचा निकाल  आज (सोमवार) 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर विषयनिहाय मिळालेले गुण पाहता येतीत. तसेच सदर माहितीची प्रिंट काढता येईल. त्याचप्रमाणे डिजिलॉकर अ‍ॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवता येणार आहे. यंदा या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळांतून राज्यभरात 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 8 लाख 21 हजार 450 मुले,तर 6 लाख 92 हजार 424 मुली होत्या. मुंबई विभागात 3 लाख 51 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या…

Read More

– हिंदू देवतांबद्दल अपशब्द व अपमानास्पद भाष्य करणाऱ्यांना चाप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरूर टाकळीहाजी (ता. शिरूर) येथील परिसरातील उचाळेवस्ती येथे हिंदू देवतांबद्दल अपशब्द व अपमानास्पद भाष्य करणे आणि ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी दबाव टाकण्यात आला. यानंतर भेदरलेल्या संबंधित कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी हात वर केल्यानंतर हा प्रकार भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या कानावर घालण्यात आला. अखेर या धर्मांतराच्या कारस्थानाचा बंदोबस्त करण्यात आला. आमदार लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी मतपरिवर्तन केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिरूर परिसरामध्ये अशाप्रकारे ठराविक धर्मात येण्यासाठी नागरिकांवर आमिष आणि दबाव आणला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेस च्यावतीने “संविधान बचाव अभियानाला” सुरुवात देहूरोड, विकासनगर येथून काल (दि. ०३ मे) करण्यात आली. दि. ०३ ते ३० मे, २०२५ पर्यंत शहरात राबविण्यात येणाऱ्या अभियानाची माहिती कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पुढीलप्रमाणे दिली. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. शहरातील विविध भागातील मुख्य चौकातुन दि. ३ ते ११ मे २०२५ या कालावधीत संविधान बचाव अभियाना अंतर्गत सभाचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाचे अपयश जनतेच्या निदर्शनास आणुन तसेच वाढती बेरोजगारी, महागाई, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शासनाने दिलेल्या आश्वासनांची न झालेली…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या ‘नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल’ मध्ये ‘ट्रॅश’ या लघुपटाला मानांकन मिळालं. ट्रॅश’ हा लघुपट सामाजिक विषयावर प्रबोधन करणारा लघुपट असून शासकीय योजनावर कचरा व्यवस्थापन करून समाज स्वच्छ राहावा हे भाष्य करणारा आहे, तसेच आपल्या सभोवतालच्या गावात – शहरात इतरत्र पडलेला कचरा – अस्वच्छता पाहून कचरा निर्मूलन करण्याचे या लघुपटातील शिक्षक ठरवतो व त्याबददलची तळमळीचा प्रवास कथेतून दिसून येतो ‘निर्मिती फिल्म कल्ब” तर्फे सदरील फेस्टीवल भरविण्यात आले होते. लघुपटाची निर्मिती अरुण काळे, नितिन कांबळे यांची दोघांची असून दिग्दर्शक अरुण काळे यांचे आहे. सह-दिग्दर्शक संभाजी खांडेकर यांचे आहे. अरुण काळे, सतिश पवार, सयाजी…

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड साहित्य मंच चे निमंत्रित कवींचे “शब्संदवैभव काव्य संमेलन” नुकतेच संपन्न झाले. भक्ती शक्ती चौकातील महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या प्रांगणात अनेक कवींनी आपल्या वैविध्यपूर्ण रचना सादर केल्या. जेष्ठ साहित्यीक प्रा. तुकाराम पाटील हे अध्यक्षस्थानी होते . तर जेष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, साहित्य मंच चे अध्यक्ष राजेंद्र घावटे यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध रंगाच्या, ढंगाच्या कवितांनी संमेलनास रंगत आणली. विविध विषयांवर कविंनी कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. “माहेरचा सूर्य लाडिक वागतो कोवळ्या किरणांनी हलकेच जागवतो सासरच्या सूर्य भल्या पहाटे येई, दिस उगवायच्या आधी होते कामाची…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात सोसायट्यांना कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेशा पाण्याचा तुटवडा भासत असल्याने आमदार शंकर जगताप यांनी बैठक घेत प्रशासनाला चांगलेच सुनावले. पाण्याची गळती आणि अपव्यय रोखून नागरिकांना त्वरित समाधानकारक पाणीपुरवठा करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक सोसायट्यांना सध्या निर्धारित कोट्यापेक्षा कमी पाणी मिळत असून, नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. कडक उन्हाळ्यात पाण्याच्या या संकटामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी चिंचवडगावात पाण्याच्या टाकी खाली महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत जगताप यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले. पाण्याची गळती, गैरवापर व अपव्ययाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत तातडीने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘संभाजीमहाराज म्हणजे सतराव्या शतकातील प्रभू रामचंद्र होत!’ असे प्रतिपादन शिवव्याख्याते नीलेश भिसे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित चार दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेत ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजीमहाराज’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफताना नीलेश भिसे बोलत होते. पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, टीजेएसबी बँकेचे भूषण वझे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजीमहाराज प्रतिमापूजन आणि सामुदायिक शिववंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राजाभाऊ गोलांडे यांनी मनोगतातून, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या पुढाकारातून पिंपरी – चिंचवडमध्ये…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – शाहू – फुले – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेचा प्रारंभ बुधवार, दिनांक ०७ मे २०२५ पासून होत असून दररोज सायंकाळी सात वाजता व्याख्यानाची सुरुवात होईल. व्याख्यानमाला वीसपेक्षा जास्त वर्षे जुनी असून नेहमीप्रमाणे राज्यातील विचारवंतांच्या विविध विषयांच्या वरील विचार मंथनातून वैचारिक मेजवानी मिळणार आहे. श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे होणाऱ्या या व्याख्यानमालेत बुधवार, दिनांक ०७ मे रोजी ज्येष्ठ विचारवंत डाॅ. विश्वंभर चौधरी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी : सत्य – अहिंसेचे पुजारी!’ या विषयावर विचार मांडून पहिल्या पुष्पाची गुंफण करतील. गुरुवार, दिनांक ०८ मे रोजी सुप्रसिद्ध अभिनेते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून नियोजित चिखली- चऱ्होलीतील शहर विकास (TP) आराखड्याला आमदार महेश लांडगे यांनी तीव्र विरोध केला आहे. सदर ‘टीपी स्कीम’ची कार्यवाही तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, प्रशासनाच्या माध्यमातून चिखली आणि चऱ्होलीसाठी ‘टाऊन प्लॅनिंग स्कीम’ घोषित करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझा या ‘टीपी स्कीम’ला पूर्ण विरोध आहे. भूमिपुत्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता प्रशासन मनमानीपणे ‘टीपी स्कीम’ राबवू शकत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चिखली-चऱ्होली परिसरात ‘टीपी स्कीम’ राबवणे…

Read More