Author: maharashtrabreakingnews.com

वडगाव मावळ ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -+ मावळ तालुक्यातील मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक सुविधा सुरू करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय वडगाव मावळ (कान्हे) येथे उद्या, गुरुवार, दि. १५ मे २०२५ पासून मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी घोषणा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली. ही उपयुक्त सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, आमदार सुनील शेळके, पॉस्को, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, आणि जी. के. फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू होत आहे. डायलिसीस सेवा सोमवार ते शुक्रवार दरम्यान, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी :शहरातल्या काव्य,साहित्यिक चळवळीतली एक नामांकित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “नक्षत्राचं देणं काव्यमंच”या संस्थेला यावर्षी २५वर्षें पूर्ण होत आहेत. प्रा. कवी वादळकार राजेंद्र सोनवणे यांनी या संस्थेचे रोपटे २५ वर्षांपूर्वी लावले, त्याला आता २५वर्षें पूर्ण होत आहेत. ही खरोखरचं अभिमानाने मिरवावे अशी बाब. या निमित्ताने येत्या दि.१७ आणि १८ मे २०२५ रोजी ‘आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यासंमेलन ‘पिंपळे गुरव, पुणे येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे आयोजित करण्यात येत आहे. सलग दोन दिवस हे महाकाव्यसंमेलन आयोजित होत आहे, ज्याच्या उदघाटनाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे उदघाटक म्हणून उपस्थित असणार आहेत. स्वागताध्यक्ष आमदार…

Read More

– महापालिका आयुक्त शेख सिंह यांच्या सोबत सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन – बाबा कांबळे, अजिज शेख, बाळासाहेब भागवत, राहुल डंबाळे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवीन धार्मिक स्‍थळांच्‍या परवानगीला कोणत्‍याही प्रकारची अडचण आणणार नाही. मात्र ज्‍या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत नोटिस देण्यात आली आहे. त्या धार्मिक स्थळांवर सर्वोच्‍च न्‍यायालयाचा व अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेप्रमाणे पुढील आदेश येईपर्यंत कारवाई होणार नाही, अशी ग्वाही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली, अशी माहितीक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वाहतूक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजिज शेख यांनी दिली. शहरातील धार्मिक स्‍थळांवरील कारवाईबाबत महापालिका प्रशासनाने नोटिस बजाविण्यात आली…

Read More

कमोडिटी मार्केटिंग कार्यशाळा संपन्न पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘मराठी माणसाने व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करावीत!’ असे विचार आमदार अमित गोरखे यांनी निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. विराज एक्सलन्स कमोडिटी सेंटर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कमोडिटी मार्केटिंग कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमित गोरखे बोलत होते. विराज एक्सलन्स कमोडिटी सेंटरचे संचालक विराज जमदाडे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. कमोडिटी एक्सलन्स कार्यशाळेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध भागांतून वेगवेगळ्या वयोगटातील सुमारे १५० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचा आणि महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. अमित गोरखे म्हणाले की, ‘मराठी माणूस फारसा व्यवसायाकडे वळत नाही; परंतु विराज जमदाडे यांच्यासारखा उच्चशिक्षित मराठी…

Read More

  रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  रहाटणी येथील न्यू सिटी प्राइड इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल 97.00 टक्के  लागला आहे. यात स्मित जडे याला 94.00 टक्के, रबजीत कौर रवींद्र सिंग राठौर हिला 91.00 टक्के, राहुल चौधरी याला 90.00 टक्के, प्राप्त केले आहेत. तर गुणवत्ता यादीमध्ये 54 मुलांनी विशेष प्राविण्य मिळवले. विद्यार्थ्यांना यश मिळावे, यासाठी उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत आणि इयत्ता दहावीचे सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापिका रूपाली सोंडे  यांनी केले. संस्थचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाचा सन 2024-25 चा इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 100% टक्के लागला असून  तब्बल एकूण 271 विद्यार्थ्यांपैकी 61 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले *प्रथम 3 क्रमांक* *प्रथम क्रमांक* *कु साळुंखे हर्षाली..* *98.80* *द्वितीय क्रमांक* *चि. प्रतिक सातपुते..* *97.40* कु.*स्वराली उंबरकर.* *97.40* *तृतीय क्रमांक* *चि.वेदांत वाघमोडे* *97%* कु *.अनुष्का थोरात* 97 %* सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश  जाधव, सचिव  संजय  जाधव,संचालक  विजय जाधव  यांनी  हार्दिक अभिनंदन केले. याप्रसंगी उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळाराम पाटील साहेबराव देवरे, पर्यवेक्षक  दत्तात्रय भालेराव…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मुक्या जनावराचा मृत्यू झाला. या  मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न पिंपरी गावातील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे(suhas kudale) यांनी पिंपरी विभाग महाराष्ट्र विद्युत महावितरण कंपनी लि.च्या कार्यकारी अभियंता यांना विचारला आहे. जे दोषी अधिकारी व ठेकेदार असतील यांच्यावर गो हत्याचा गुन्हा ( Crime of cow slaughter)  दाखल का करू नये.? असे ही निवेदनातून म्हंटले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्या जनावराचा महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू काल दिनांक १२ मे २०२५. वेळ रात्री ८.३० ते ९ वाजता (अंदाजे वेळ). वळवाच्या पावसामुळे मुके जनावर पावसातून बचाव होण्यासाठी निवारा शोधत होते. त्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळे यांनी आज त्यासंदर्भातील घोषणा केली. आगामी महापालिका निवडणुका विचारात घेता केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या सत्ताधारी भाजपचा शहराध्यक्ष कोण होणार याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. भाजप शहर समितीने त्यासाठी रितसर निवडणूक घेतली होती. निकाल प्रदेश भाजपमधून जाहीर होणार होता. काटे यांच्याशिवाय माजी सत्ताधारी नेते नामदेव ढाके, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सरचिटणीस राजू दुर्गे आदी प्रमुख उमेदवार स्पर्धेत होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सर्व परिस्थितीती आणि जेष्ठांचे मत जाणून मतदान पाहून…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ प्रकल्पाची सविस्तर आढावा बैठक विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. सद्यस्थितीचा व निधीच्या उपलब्धतेचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी मंजूर ९१ दवाखान्यांपैकी, सध्या पुणे महापालिकेअंतर्गत ८ आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत ७ दवाखाने कार्यान्वित आहेत. उर्वरित दवाखाने तातडीने सुरू करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिले. या बैठकीस आरोग्य विभागाचे डॉ. स्वनील लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, पुणे महानगरपालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक, सहायक संचालक डॉ. दिप्ती देशमुख…

Read More

*शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमाला – अंतिम पुष्प पिंपरी (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) –  ‘भारूड म्हणजे बहुरूढींचे दर्शन होय!’ असे प्रतिपादन भारुडसम्राट ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी  चिंचवड येथे केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेत ‘अरे अरे माणसा तू कधी होशील रे माणूस? जगण्याचे अंतिम सत्य!’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना बहुरंगी, बहूढंगी भारुडांचे सादरीकरण करीत त्यांनी श्रोत्यांना हसवत हसवत अंतर्मुख केले. यावेळी विधानपरिषद आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी नगरसेविका ॲड. वैशाली काळभोर, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, अजित गव्हाणे, शीतल शिंदे,…

Read More