Author: maharashtrabreakingnews.com

       पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, (drenej line) नाले सफाई  त्वरित करण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे (nana kate) यांनी  आयुक्तांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई केली जाते परंतु यावर्षी तसे केल्याचे दिसत नाही कारण  सध्या अवकाळी  पाऊस पडत आहे, व या अवकाळी पावसामुळे संपूर्ण  शहरातील सर्व स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले यातील कचरा साफ न केल्याने स्ट्रॉम वॉटर, (strom water) ड्रेनेज लाइन तुडुंब भरून जागो जागी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असून नगरिकाना वाहने चालवताना, रस्त्याने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड परिसरात शून्य सावली  दि. १३ व १४ मे २०२५    या खगोलीय घटनेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड सायन्स पार्कमध्ये भेटीस आलेल्या प्रेक्षकांसाठी सायन्स पार्क तर्फे विशेष कार्यक्रम व शून्य सावली अवलोकनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वसाधारणतः या खगोलीय घटनेचा अनुभव आपल्याला वर्षातून दोन वेळा घेता येतो. अर्थात या घटनेच्या वेळेस पृथ्वीचा परिभ्रमण अक्ष सूर्याभोवती फिरण्याच्या प्रतलाकडे जास्तीत जास्त २३.५ अंश या सर्वोच्च बिंदूवर येत असताना वर्षातून दोन वेळा म्हणजे उत्तरायन आणि दक्षिणायन दरम्यान सूर्य मध्यान्हाला बरोबर आपल्या डोक्यावर येत असतो. गमतीची गोष्ट अशी की या घटनेच्या वेळेस आपली स्वतःची सावली सुद्धा दिसत नाही. या घटनेचा…

Read More

– भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चिखली- कुदळवाडीतील प्रस्तावित TP स्किम कार्यवाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रशासनाने महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. त्यामुळे भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश मिळाले असून, ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांना दिलासा मिळाला आहे. चिखली, चऱ्होली येथील प्रस्तावित ‘टीपी स्कीम’ बाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक केली होती. त्यावेळी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आज दि. 15 मे 2025 रोजी प्रशासनाने सर्वसाधारण सभेत सभेला मान्यता दिली आहे. आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील सीबीएससी बोर्डाचा इयत्ता दहावी आणि बारावी या वर्गांचा निकाल नुकताच जाहीर झाला.    यामध्ये २०२४-२५ या वर्षातील एकूण २७५ विद्यार्थ्यांपैकी १०६ विद्यार्थ्यांनी ९१ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. पहिले पाच क्रमांक मुलींनी मिळवले आहेत. दहावी मध्ये प्रथम क्रमांक आकांक्षा फाकटकर ९९ टक्के, द्वितीय क्रमांक अमिता नेरलीकर ९८.४ टक्के, तृतीय क्रमांक तनिष्का झा ९८.२ टक्के, चौथा क्रमांक आरोही निकम ९८ टक्के आणि पाचवा क्रमांक पर्णिका अभंग ९७.८० टक्के यांचा समावेश आहे.   आकांक्षा फाकटकर हिने मराठी, अमिता नेरलीकर हिने संस्कृत, तनिष्का झा हिने गणित विषयात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने पठारे मळा, चऱ्होली येथील अजिंक्य डी. वाय पाटील रोड या ठिकाणी असलेल्या अनधिकृत लोखंडी कमानीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित बिल्डरकडून सुमारे ७० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. उप आयुक्त राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत परवाना निरीक्षक धनंजय पाटील, राजू वेताळ, किशोर गावडे, राजू चौधरी, धनसिंग धायगुडे, परवाना लिपीक कालिदास शेळके सहभागी झाले होते तसेच धडक कारवाई पथकातील जवान आणि मजूर उपस्थित होते. हायड्रॉलिक मशिनरीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. उप आयुक्त राजेश आगळे यांनी नुकताच आकाशचिन्ह व परवाना विभागाचा पदभार स्विकारला…

Read More

दिव्यांग विभागाने आपला १०० टक्के निकाल ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमातील विद्यार्थी ठरले गुणवंत आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  महाराष्ट्र राज्य परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या एस. एस. सी. ( दहावी ) परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. यात श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा ४१४ पैकी ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा ९९ .५२ टक्के निकाल लागून घवघवीत यश प्रशालेस मिळाले. या वर्षीही दिव्यांग विभागाने आपला १०० टक्के निकाल लावून यशाची परंपरा कायम ठेवली. इयत्ता १० वी तील प्रथम तीन विद्यार्थी यात भक्ती राऊत या विद्यार्थिनीने ९७.०० टक्के गुण मिळवून प्रथम, सुजित जोरी, प्रणव शिंदे या विद्यार्थ्यानी ९६.२० टक्के गुण मिळवून…

Read More

पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यास यंत्रणा सज्ज ठेवा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता सर्व विभागांनी पूरपरिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी विभागस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम…

Read More

महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदायाची एकमुखाने मुख्यमंत्र्यांकडे मागणी… कटकारस्थान करून रात्री-अपरात्री केली जाणारी आळंदी घाटांची तोडफोड व विद्रूपीकरण थांबवून, कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची तातडीने सखोल चौकशी करावी आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या उत्तर तीरावर सुरू असलेले अत्यंत सुंदर व देखण्या घाटांचे शासनातर्फे रात्री-अपरात्री केले जाणारे विद्रूपीकरण ताबडतोब थांबवून, या मागील तथाकथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदायातर्फे महाराष्ट्राचे जाणकार व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील नामवंत संत, कीर्तनकार, प्रवचनकार इ. मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करणार आहेत. अशी माहिती विश्व शांती केंद्र…

Read More

जागतिक परिचारिका दिनानिमित्त सांगवीत परिचारिकांचा सन्मान; अधिसेविका मंगला जाधव यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभेचे कार्यक्षम आमदार मा. शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी परिसरात जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून परिचारिका सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. औध येथील जिल्हा रुग्णालय आणि सांगवी महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिसेविका मंगला जाधव यांना प्रतिष्ठित फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट आणि समर्पित सेवेचा गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवडच्या महापौर ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चॅलेंजर पब्लिक स्कूल शाळेने दहावीच्या बोर्ड परीक्षेत १००% निकाल लागला.  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन शाळेचे  चेअरमन संदीप काटे यांनी केले. शाळेचे  चेअरमन संदीप काटे  आणि  प्राचार्य सुविधा महाले मॅडम यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि सर्व शिक्षक वृंदाच्या सतत मार्गदर्शनाखाली हे यश मिळाले. हा उल्लेखनीय टप्पा आमच्या विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि चिकाटीचे,  पालकांच्या अटळ पाठिंब्याचे आणि आमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे प्रतीक आहे. आमच्या शाळेने ज्या उत्कृष्टतेचे आणि सचोटीचे मानक राखले आहेत ते कायम ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने आम्हाला अभिमानित केले आहे. सर्व प्रिय पालकांचे आणि शिक्षकांचे सतत प्रोत्साहन, विश्वास आणि सहकार्याबद्दल चेअरमनने आभार मानले.चॅलेंजर पब्लिक…

Read More