Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रशासकीय काळात अनेक अनावश्यक व भविष्यात शहरातील लोकांना त्रासदायक ठरतील असे प्रकल्प राबविण्याचा व लोकांचा विरोध डावलून ते रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २४, २५, २६, २७ आणि २८ या भागात महापालिका हरित सेतू प्रकल्प राबवणार आहे. पर्यावरणपूरक वातावरण तयार करण्याची स्वप्ने दाखवली जात आहेत. मात्र हा प्रकल्प भविष्यात त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे लोककल्याण लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण योग्य ती भूमिका घ्यावी, अशी विनंती पिंपरी – चिंचवड भाजपचे शहर उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेचा जल्लोष आणि भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात एका भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मावळ लोकसभा खासदार श्रीरंगअप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी  जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना शहरप्रमुख (शिंदे गट) बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयचे कुणाल वाव्हळकर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, सीमा सावळे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब…

Read More

तळेगाव दाभाडे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील नागरिकांना अधिक वेळेवर, सुरक्षित आणि सुटसुटीत सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने तळेगाव दाभाडे बस आगारात नव्याने दाखल झालेल्या पाच एसटी बसगाड्यांचे लोकार्पण आमदार सुनील शेळके (mla sunil shelke) यांच्या हस्ते आज (रविवारी) संपन्न झाले. या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, आगारातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडे एसटी डेपोचे व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे, हरीश कोकरे, प्रकाश हगवणे, विशाल काळोखे, शैलेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी लोकार्पणानंतर आगारातील विविध विभागांची पाहणी करत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन…

Read More

श्री स्वामी समर्थ व्याख्यानमाला – प्रथम पुष्प पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची काळजी घ्या!’ असा सल्ला ज्येष्ठ समुपदेशक डाॅ. दत्ता कोहिनकर यांनी  चिंचवड येथे   दिला. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय श्री स्वामी समर्थ व्याख्यानमालेत ‘मनाची अमर्याद शक्ती व समाजस्वास्थ’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना डाॅ. दत्ता कोहिनकर बोलत होते. शिवलिंग ढवळेश्वर अध्यक्षस्थानी होते. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. माजी उपमहापौर तुषार हिंगे, पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, समन्वयक राजेंद्र घावटे, उद्योजक भगवान पठारे, प्रा. दिगंबर ढोकले, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांची व्यासपीठावर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत १००% निकालाची उज्ज्वल कामगिरी करत शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. यावर्षी शाळेचे एकूण १५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वांनी यशस्वी कामगिरी करत शाळेच्या यशाची पताका उंचावली. शाळेतील टॉपर्समध्ये कु. पायल नरकेडे व कु.साकेत पाटणकर यांनी ९६.८% गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. त्यांच्यानंतर कु. गौरी येळपळे – ९५.४%, कु. सुरभी चलाख – ९५%, कु. देवांशी कर्मकार – ९४.६% आणि कु. शर्वरी काकड – ९३.२% गुणांसह शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. निकालाचा एकूण आढावा खालीलप्रमाणे: ९०% पेक्षा अधिक गुण – १९ विद्यार्थी ८०% पेक्षा अधिक –…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – चिखली येथील गट क्रमांक ९० मधील इंद्रायणी नदीलगतच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या ७ हजार २४५ चौरस मीटर भूभागावरील सुमारे ६३,९७० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ३६ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. शहराच्या बाजूने जाणाऱ्या इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेमध्ये अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आलेल्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्याचा निर्णय हरित लवादने दिला होता. शिवाय हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यास अनुसरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चिखलीमधील या कारवाईमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर यांच्या अधिपत्याखाली सहशहर अभियंता संजय…

Read More

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव येथील नोबल एज्युकेशन सोसायटीच्या लक्ष्मीबाई बारणे विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला. विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविल्याबद्दल शाळेकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अथर्व फाळके याने ९५.६० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला. लक्ष्मीबाई बारणे विद्यालयात दहावीच्या वर्गात यावर्षी ३० विद्यार्थी होते. त्यातील सात विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तर १६ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील शिक्षकांनी परिश्रमपूर्वक विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतल्याने शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. संस्थेचे संस्थापक खासदार श्रीरंग बारणे, अध्यक्ष प्रताप श्रीरंग बारणे, सचिव धनाजी बाळाजी बारणे, कार्याध्यक्ष…

Read More

नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवीतील तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भगवान बुद्ध, भगवान महावीर, सम्राट अशोक, संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महामानवांच्या प्रतिमांचे पूजन सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, संजय मराठे, सतीश चोरमले, मोहन बारटक्के, पॅंथर रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गौतम डोळस, बाळासाहेब पिल्लेवार, उज्ज्वला जाधव, भामा ठोसर, प्रमिला भालेराव, उषा शिंदे, सुवर्णा गायकवाड आदी उपस्थित होते. मानव कांबळे म्हणाले, मैत्र भावाने जग…

Read More

सांगवी, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातल्या “नक्षत्राचं देणं काव्यमंच” या काव्यसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आठवे अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्य महासंमेलनाचे बिगुल आज येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात वाजले. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. जेष्ठ कवी साहित्यिक, आणि गझलकार म. भा. चव्हाण यांच्या अध्यक्षेते खाली आज आणि उद्या असे दोन दिवस हे महाकाव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरातून अनेक कवी या साठी आलेले आहेत म. भा .चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली या आठव्या नक्षत्र महाकाव्यसंमेलनाचे उदघाटन झाले. यावेळी मंचावर ग्रामगीताचार्य राज्य समन्यवयक, बंडोपंत बोढेकर , डॉ शांताराम कारंडे,डॉ अलका नाईक, संयोजक कवी प्रा.राजेंद्र सोनवणे व्यासपीठावर…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  राष्ट्रीय डेंग्यू दिन – तपासा,स्वच्छ करा आणि भांडी झाकून ठेवा या घोषवाक्याने जनजागृती करीत खेड तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी दिली. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पुणे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अपर्णा पाटील, खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मैदाड, वैद्यकीय अधिकारी डॉ इंदिरा पारखे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक रेवननाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्मान आरोग्य मंदिर राजगुरूनगर अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील लोकांमध्ये जनजागृती करीत राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. यात डास अळी साठी भांड्याची तपासणी तपासणी करण्यात आली. आठवड्यातून एक…

Read More