- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सुरू केलेले ‘सावली’ बेघर निवारा केंद्र शहरातील गरजू, बेघर व असहाय्य नागरिकांसाठी एक मोठा आधार बनले आहे. राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीने नुकत्याच केलेल्या निरीक्षणामध्ये हे केंद्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरले आहे. नागरी बेघरांना निवारा या घटकाच्या प्रगतीचे सनियंत्रण करण्यासाठी शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समिती गठीत करण्यात आलेली आले. या समितीने त्रयस्थ संस्थेद्वारे राज्याच्या विविध शहरात असणाऱ्या निवाऱ्यांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्रिशरण एनलायनमेंट फाऊंडेशन या संस्थेने निवारा निरीक्षण करून अहवाल सादर केला. या अहवालामध्ये सर्वोत्कृष्ट ५ निवाऱ्यांची निवड करण्यात आली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड ओबीसी विभागाच्या वतीने जय संविधान, जय बापू, जय भिम हा ओबीसी मेळावा रविवारी (दि.25) सायंकाळी पाचला छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुदळवाडी पुल, भोसले पेट्रोलपंपाजवळ आयोजित केला आहे. मेळाव्यात निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, संविधान सन्मान, संविधान बचावसाठी काँग्रेसची अग्रेसर भूमिका, राहुल गांधींमुळे देशात जातीनिहाय जनगणना होणार आदी मुद्दयांवर चर्चा करण्यात येणार आहे. ओबीसी मेळाव्याचे उद्घाटन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधीमंडळाचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिलकुमार जयहिंद, विधानपरिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने भाजप पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेता यावी, यासाठी दिनांक २१ ते ३१ मे २०२५ या कालावधीत अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी दिली. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त मोरवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे आज, बुधवार रोजी कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (शनिवार दिनांक १७ मे) कै. अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप उपस्थित होते. शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या अध्येक्षतेखाली संस्थेचे संचालक मंडळ व सल्लागार मंडळ यांच्या उपस्थित पार पडली. या सभेला मोठ्या प्रमाणावर सभासद उपस्थित होते. मा. अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे सर्व विषय सचिव योगेश रानवडे यांनी वाचून दाखविले व सदर सर्व विषयांस सभेस उपस्थित…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला असताना नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आमदार शंकर जगताप यांनी चिंचवड मतदारसंघातील विविध ठिकाणी थेट पाहणी दौरा करत प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले. विविध भागांतील नाल्यांची सफाई, रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमण, पाण्याच्या निचऱ्याची अडचण आणि वाहतूक व्यवस्थेतील समस्या पाहता, त्यांनी संबंधित विभागांना कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. *पुनावळे परिसरात तातडीचे उपाय* पुनावळे अंडरपास खाली रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांचे तत्काळ दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. तसेच जलवाहिन्यांची स्वच्छता करून नवीन स्ट्रॉम वॉटर लाईन टाकण्याची सूचना केली. भारत पेट्रोल पंपासमोरील पाण्याची साचलेली समस्या लक्षात घेऊन तिथेही स्ट्रॉम वॉटर लाईन टाकण्याचा निर्णय झाला. पुनावळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातासंदर्भात स्वतः अण्णा बनसोडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबतची माहिती दिली आहे. या अपघातात उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि त्यांचे सर्व सहकारी सुखरूप असल्याचे त्यांनी कळवले आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोशाल मिडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज पुण्याहून मुंबईकडे पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी जात असताना माझ्या गाडीचा किरकोळ अपघात झाला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि ईश्वराच्या कृपेने मी आणि माझे सर्व सहकारी सुखरूप आहोत. माझ्या काळजीपोटी कॉल आणि मेसेज करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो. मी पूर्णपणे सुखरूप असून, नेहमीप्रमाणे तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चिखली या ठिकाणी इंद्रायणी नदीपात्रात बांधलेले ३६ अनधिकृत बंगले (36 unauthorized bungalows built in the Indrayani riverbed ) सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पाडले. या प्रकरणाच्या तपासाचे आदेश देऊन संबंधितांवरती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी ॲड. अतिष लांडगे यांनी ना. अण्णा बनसोडे यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंद्रायणी नदीपात्रात पिंपरी चिंचवडमहापालिकेच्या हद्दीतील चिखली या ठिकाणी बांधलेले ३६ अनधिकृत बंगले सुप्रीम कोर्टाच्याआदेशाप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जमीनदोस्त केले. अनधिकृत बांधकाम असल्यामुळे अशा प्रकारची कारवाई होणे हे कायदेशीर दृष्ट्या स्वाभाविकच होते. परंतु सदरची जमीन मनोज जरे यांच्या मालकीची…
औद्योगिक परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या बाबत उद्योजकांची महावितरण कार्यालयात बैठक
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरण कार्यालय भोसरी या ठिकाणी पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या बाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे( Small Industries Association ) अध्यक्ष- संदीप बेलसरे, संचालक – संजय सातव, प्रमोद राणे, स्वीकृत संचालक – सुरेश गवस, सचिन पाटील तसेच उद्योजक कौस्तुभ मुरूदवार, संदीप सावंत, मनोज गजभिये तसेच महावितरण भोसरी कार्यालया तर्फे कार्यकारी अभियंता – अतुल देवकर, उपविभागीय अधिकारी – माने, सहाय्यक अभियंता – झोपे, राहुल पालके आदी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील भोसरी विभागात मे महिन्यापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. याचा मोठा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री – १०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमातंर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवत तिसरे स्थान मिळवले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंगळवारी (दि.२०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा गौरव केला. मुंबई येथील मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खरगे, अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग असीमकुमार गुप्ता यांच्यासह प्रशासकीय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री – १०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा अंतिम निकाल १६ मे २०२५…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या 300 व्या अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव साजरा करण्याबाबतची अत्यंत महत्वाची बैठक सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीसाठी महापालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक , जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा विणा सोनवलकर, माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांच्यासह जयंती महोत्सव समितीचे प्रमुख सदस्य अशोक खरात, धनंजय ताणले, महावीर काळे , गणेश खरात, सचिन सरक, रेखा दूधभाते, पल्लवी मारकड, पोपट हजारे, विठ्ठल देवकाते आदी सर्वजण उपस्थित होते.…
