- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. डोंगराशी वारकरी संप्रदायाच्या भावना जोडल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग वळविण्यात येईल. डोंगराला बोगदा पाडून हा प्रस्तावित मार्ग करण्यात येणार नसल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले असल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सर्व्हे झाला होता. हा प्रस्तावित मार्ग डोंगराला बोगदा पाडून करण्यात येणार होता. याबाबत वारकरी संप्रदायाने चिंता व्यक्त केली होती. खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली होती. त्यानंतर खासदार बारणे यांनी भंडारा डोंगर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली. प्रस्तावित…
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र – मुंबई यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चा लोकार्पण सोहळा आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ वितरण समारंभ पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नव्या पिढीच्या करिअर आणि कल्याणासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा भव्य लोकार्पण सोहळा आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ वितरण समारंभ रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी सायंकाळी JW Marriott, पुणे येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, संसदीय कार्यमंत्री) यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी मा. अण्णा बनसोडे (उपाध्यक्ष – महाराष्ट्र विधानसभा) राहणार आहेत. विशेष उपस्थिती व शुभहस्ते पुरस्कार वितरणासाठी मा. जयकुमार गोरे (ग्रामविकास व…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील निळ्या पूररेषेतील बाधित क्षेत्रांच्या पुनर्विकासासाठी आणि अधिकृत इमारतींना पूर्ण क्षमतेने टीडीआर (TDR) देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक आज (बुधवारी) मंत्रालयात पार पडली. ही बैठक नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील निळ्या पूररेषेतील बाधित जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आमदार शंकरभाऊ जगताप यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानंतर या विषयावर तातडीने कृती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुक्या जनावराचा महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूबाबत पत्र देऊन ७ दिवस झाले तरी काहीही उत्तर महावितरण कडून आलेले नाही, अशी तक्रार पिंपरी गावातील युवा नेते सुहास कुदळे यांनी महाराष्ट्र विद्युत महावितरण कंपनी लि.पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महावितरण कंपनी लि.पिंपरी विभाग घडलेल्या घटनेला ७ दिवस उलटूनही महावितरण अधिकारी यांनी काहीच उत्तर दिले नाही. महावितरण अधिकारी व ठेकेदार हे मिली भगत असतील अशी खूप मोठी शक्यता नाकारता येत नाही. मुक्या जनावराचा महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू दिनांक १२ मे २०२५. वेळ रात्री ८.३० ते ९ वाजता (अंदाजे वेळ). वळवाच्या पावसामुळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी प्राधिकरणातील नागरिकांना येत्या शुक्रवार दि. 23 रोजी नाटक, नृत्य, गाणी,खेळ अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने मनोहर वाढो कर सभागृह,ज्ञान प्रबोधिनी विद्यालय,सेक्टर नंबर 25, प्राधिकरण निगडी येथे सायंकाळी पाच ते साडेसात या वेळात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भाजपचे शहर उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे आहेत तर निमंत्रक साहित्य संमेलन प्रमुख अर्चना वर्टीकर तसेच प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळूक आहेत. या कार्यक्रमात ‘फुलोरा’ निर्मित ‘एकमेका सहाय्य करू’ ही एकांकिका सादर केली जाणार आहे. लेखिका अर्चना वर्टीकर असून दिग्दर्शन मंगेश वर्टीकर यांचे आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पवना आणि इंद्रायणी नदी या पिंपरी-चिंचवड शहराच्या जीवनवाहिन्या आहेत. नदी हे स्वच्छ आणि आरोग्यदायी शहराचे प्रतीक असते. त्यामुळे इंद्रायणी, पवना संवर्धनासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत. नदी सुधार प्रकल्पाला निधी, पर्यावरण प्रेमी व स्वयंसेवी संस्थांनी नदी सुधार प्रकल्पामध्ये सुचवलेले बदल समाविष्ट करून नवीन डीपीआर करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी नदी संवर्धनासाठी एकत्रित आराखडा राबवणे यांसारख्या सूचना आणि नदी सुधार प्रकल्प राज्य सरकारच्या तांत्रिक समितीची प्रशासकीय मान्यता तात्काळ द्यावी, असे निर्देशही नगरविकास विभागाला दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराच्या जीवनवाहिनी नदी पवना व इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाच्या संदर्भामध्ये विविध मुद्द्यांवर राज्याच्या नगर विकास, परिवहन,…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागरमध्ये परिसरातील नागरिकांसाठी महापालिकेच्यावतीने दवाखाना बांधण्यात आला असून, तो सध्या खूप जुना झाला असून नगरिकासाठी या दवाखान्यातील जागा देखील अपुरी पडत आहे, याच दवाखान्यात नगरिकाना बसण्यासाठी येथे तात्पुरत्या स्वरूपात पत्रा शेडची उभारणी देखील केलेली आहे, तसेच लहान मुलांसाठी या दवाखान्यात लसीकरण देखील असते तेव्हा देखील नागरिकांची गैरसोय होते. पिंपळे सौदागरमध्ये अनेक कुस्ती,कबड्डी व विविध खेळातील खेळाडू आहेत, त्यांना व्ययाम सराव करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तालीम व जिम बांधण्यात आलेली आहे या तालमीची देखील वारंवार दुरुस्ती व डागडुजी करण्यात आलेली असून ती सुद्धा जुनी व जीर्ण झालेली आहे, तिचे देखील स्ट्रकचलर…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ऊर्जा सेवांचा कमी वापर करून किंवा ऊर्जा अधिक कार्यक्षमतेने वापरून ऊर्जा संरक्षणासाठी जागतिक स्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. अशा प्रयत्नांचा उद्देश म्हणजे एकूण ऊर्जा वापरात कपात करणे. उद्योगांनी या दिशेने अधिक प्रयत्न करावेत यासाठी, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया ( क्यू.सी.एफ.आय ) पुणे शाखेच्या वतीने “ऊर्जा संरक्षण स्पर्धा २०२५” या विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत केस स्टडीचे सादरीकरण, घोषवाक्य व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सहभागी स्पर्धकांनी पारंपारीक उर्जे ऐवजी सोलर , पवनचक्की आदी पर्यायी ऊर्जा स्तोत्राचा वापर कसा करता येवू शकतो याबाबतीत केस स्टडी सादरीकरणात आपली मनोगते मांडली. सदर स्पर्धा…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देण्याच्या उद्देशाने आज दि. २१ मे २०२५ रोजी विधानभवन, मुंबई येथे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची पहिली आढावा बैठक पार पडली. यामध्ये राज्यभरातील कामांचा सखोल आढावा घेऊन प्रलंबित निधी मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये अध्यक्ष आमदार सुनील शेळके यांच्यासह एकूण २५ आमदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. समितीच्या कार्यक्षेत्रात सध्या २६६ कामांचा समावेश असून त्यांचे अ, ब, क, ड अशा चार वर्गांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये सिंचन विहिरी, फळबाग लागवड, पानंद व शिवरस्त्यांची सुधारणा ही कामे प्राधान्याने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एप्रिल २०२५ पासून कागदविरहित प्रशासनाकडे यशस्वी वाटचाल सुरू केली असून देशातील आधुनिक व स्मार्ट महानगरपालिका होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महानगरपालिकेत दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली (Document Management System – DMS), कार्यप्रवाह प्रणाली (Workflow – WF) वापरत १ एप्रिल २०२५ पासून ३१ हजारांहून जास्त कागदपत्र व ३ हजार ७१६ फाईल्सचे कामकाज डिजिटल पद्धतीने पूर्ण केले आहे. याशिवाय, सॅप (SAP), भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि विविध नागरी व प्रशासकीय अॅप्लिकेशन्सच्या वापरामुळे महानगरपालिकेचे कामकाज अधिकच वेगवान झाले आहे. महानगरपालिकेच्या सर्व ५४ विभागांमध्ये आता एकही फाईल्स फिजिकल पद्धतीने तयार केली जात नाही. फाईल्स तयार करण्यासाठी…
