Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या नियोजनाची बैठक  नवी सांगवी येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांवर जयंतीची ठरलेली जबाबदारी देण्यात आली.आणि जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्याचे प्रयोजन करण्यात आले. जयंती महोत्सवासाठी महापालिकेच्या आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्याशी अत्यंत चांगल्या पद्धतीने चर्चा करून महोत्सव कार्यक्रमास भरघोस सहकार्य केल्याबद्दल जयंती महोत्सव समितीच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न  काटे यांचा बैठकी दरम्यान  विशेष सन्मान  करण्यात आला. बैठकीचे प्रास्ताविक माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केले. सूत्रसंचलन मनोज मारकड यांनी केले आणि आभार आशा काळे…

Read More

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजप महिला मोर्चाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथील त्यांच्या ऐतिहासिक जन्मस्थळाला नुकताच एक विशेष भेट दौरा आयोजित करण्यात आला होता. महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या नेतृत्वात आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विजय शिंदे यांच्या संयोजनाने हा दौरा यशस्वीरित्या पार पडला. या दौऱ्यात एकूण ४२ महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.   या ऐतिहासिक स्थळी प्रसिद्ध कीर्तनकार शारदाताई मुंढे यांचे प्रेरणादायी कीर्तन आयोजित करण्यात आले होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती सांगतानाच, महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून योजनांचा लाभ उपलब्ध करून देत शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राज्यस्तरावर राबविण्यात आली. या मोहिमेतील दूसऱ्या टप्प्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांनी कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे अंतर्गत राज्यातील २४ कार्यालयांमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे. राज्य शासनामार्फत प्रशासकीय कामकाजात गतीशिलता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख सेवांचे वितरण यासाठी ‘100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम’ राबविण्यात आला होता. यामध्ये कार्यालयीन कामकाजात नवकल्पना व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विहित वेळेत सेवा वितरण, ई-ऑफिसची अंमलबजावणी, डिजिटलायझेशन व कागद विरहित कार्यालयीन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड येथील कस्पटे वस्तीमध्ये नुकत्याच घडलेल्या वैष्णवी हगवणेच्या दुर्दैवी घटनेनंतर मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी दिवंगत वैष्णवी हगवणे हिच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होत त्यांनी कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला. परिसरात वैष्णवीच्या अकाली मृत्यूमुळे शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. रिटा गुप्ता यांनी या हृदयद्रावक घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आणि मनसे या कठीण काळात पीडित कुटुंबाच्या सोबत खंबीरपणे उभी असल्याचे सांगितले. तसेच, कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेतेमंडळी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी पुढे सरसावले आहेत. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी वैष्णवीच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यांनी आश्वासन दिले की, ज्यांनी वैष्णवीचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला, त्या सर्व दोषींवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. राज्य सरकार या प्रकरणात गांभीर्याने कार्यरत असून दोषींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘आपल्या मुलीला आई वडील एवढ्या लाडाने वाढवतात, त्यांना फार ऐश्वर्य मिळावं यासाठी त्यांचं पालनपोषण करतात. त्यांचा विवाह करताना आपलं सर्वस्व पणाला लावतात, त्यांच्या संसाराला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनाला भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या महापालिकेतील विविध विभागांतील उपक्रम तसेच कार्यपद्धती समजून घेतली  व सुरु असलेल्या विकासकामांची माहिती घेतली. या शिष्टमंडळामधील मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डाॅ.संभाजी पानपट्टे, अतिरिक्त शहर अभियंता दीपक खांबीत, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर,  अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोरडे, सहाय्यक आयुक्त योगेश गुणिजन, सहाय्यक आयुक्त स्वप्निल सावंत, प्रक्प प्रमुख कैलास गिते, घन कचरा व्यवस्थापन तज्ञ अक्षय ढबाले, आय ईसी तज्ञ विनीत चौहान, एसबीएम एमआयएस तज्ञ रोहन घुले,उप आयुक्त कल्पिता पिंपळे,…

Read More

या प्रकरणात ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत केली, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे- डॉ. नीलम गोऱ्हे मयूरी जगताप यांची देखील भेट घेऊन डॉ.गोर्हे यांचे केले समुपदेशन पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आज तिच्या माहेरी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली आणि या घटनेबाबत चिंता व शोक व्यक्त केला.त्यांनी सांगितले की, या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना तत्काळ अटक न केल्याने कुणा उच्च पदस्थ व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे, त्यामुळे वैष्णवीला नक्की न्याय मिळेल असा विश्वास डॉ…

Read More

हाडे आणि चयापचय प्रक्रियेबाबत योग्य निदानासाठी उपयुक्त तंत्र पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ड्युअल-एनर्जी एक्स-रे अ‍ॅब्सॉर्प्टिओमेट्री (डेक्सा) स्कॅनर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.  निदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा क्षमतांना बळकटी देणारा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हाडांची खनिज घनता (बीएमडी), शरीरातील चरबी आणि स्नायूंच्या रचनेचे मूल्यांकन करण्यासाठी डेक्सा स्कॅनर जागतिक स्तरावर सुवर्ण मानक म्हणून ओळखला जातो. या अत्याधुनिक डेक्सा स्कॅनरचा उपयोग प्रौढांसह लहान आणि किशोरवयीन मुलांमध्येही हाडांच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी होतो, विशेषतः संधिवात, व्हिटॅमिन डी कमतरता, थॅलेसेमिया आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या स्थितींमध्ये. जलद स्कॅन वेळ, अत्यल्प रेडिएशन आणि उच्च अचूकतेमुळे ही चाचणी नियमित तपासणी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीतील मिलिंदनगर परिसरात सुरु असलेल्या SRA प्रकल्पामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल, साचलेले पाणी आणि कचऱ्याचा विळखा पडला आहे. या परिस्थितीतून स्थानिकांना दिलासा मिळावा यासाठी युवा नेते सुहास कुदळे यांनी पालिकेकडे तातडीने सुरक्षेची मागणी केली आहे. कुदळे यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रकल्प स्थळी पावसामुळे खड्डे भरले गेले असून, या ठिकाणी लहान मुले खेळतात. अशा ठिकाणी जर एखादा अपघात झाला, तर जबाबदारी कोणाची असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात सुरक्षेसाठी पत्र्यांचे कंपाउंड लावणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाच्या सध्या सुरू…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कुदळवाडी, चिखली या औद्योगिक परिसरातील उद्योजकासाठी आहे त्याच ठिकाणी औद्योगिक झोन जाहीर करावा किंवा औद्योगिक महामंडळाच्या जागेत पुनर्वसन करावे असे निवेदन  उद्योगमंत्री उदय सामंत यांना पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने देण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष – संदीप बेलसरे, सचिव – जयंत कड, संचालक – नवनाथ वायाळ, संजय सातव उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याप्रसंगी उद्योगमंत्र्यानी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे बरोबर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्र राज्यातील उद्योग मंत्रालय या परिसरातील उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही सांगितले.    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडी, पवारवस्ती, जाधववाडी, चिखली या औद्योगिक परिसरातील…

Read More