Author: maharashtrabreakingnews.com

खडकी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खडकीतील जुन्या पिढीतील डॉ. पी. एस. आगरवाल यांचे वयाचे ८७ व्या वर्षी निधन झाले. ते गरीबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. आलेगावकर हायस्कूल खडकी येथील संस्थेत ते संचालक होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर त्यांनी वैचारिक लेखन करून ग्रंथ प्रकाशित केले . अनेक चळवळीतून त्यांनी भाग घेतला होता. तसेच ते अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य होते. महात्मा गांधी यांचे रूप घेऊन त्यांनी या शहरात सामाजिक जनजागृती केली होती. आणि इंटिग्रेटेड अभ्यासाचे पुरस्कृत्य होते. तसेच ते लेखक पण होते. त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके – १. मंथन चिंतन २. आपले हे असे आहे बुवा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निलेश चव्हाण याला अटक होण्याआधीच तो काही दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली अधिक गतीमान केल्या असून, त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दरम्यान, आता पोलिसांना मोठं यश आलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाण याला नेपाळच्या बॉर्डरवरुन अटक केली आहे. निलेश चव्हाण याला आता पुण्यात आणले जात आहे, मागील काही दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. वैष्णवी हगवणे यांचे बाळ निलेश याच्याकडे दोन दिवस होते. हे बाळ घेण्यासाठी वैष्णवीचे नातेवाईक गेले होते. पण यावेळी निलेशने नातेवाईकांना बंदुक दाखवून धमकावले…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंडोनेशिया येथे योगा स्पर्धा आयोजित केली होती.यामध्ये ट्रेडिशनल योगा व आर्टिस्टिक योगा याचे चिंचवड मधील श्रीहरी योगाच्या संचालिका वैशाली देशमाने यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे या स्पर्धेत देशमाने यांनी प्रथक क्रमांक मिळवून इडोनेशियात भारताचे नाव गाजविले व पिंपरी चिंचवड मधील जनतेलाही खूप अभिमान झाला. या स्पर्धेत पाच देश सहभागी झाले होते.या दोन्ही स्पर्धेत अतिशय जिद्दीने व भारताचे नावलौकिक हे डोळ्यासमोर ठेऊन वैशाली देशमाने यांनी सुवर्ण पदके मिळाली त्यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.मधुकर बच्चे युवा मंच वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मधुकर बच्चे,डॉ. ज्योती सलगरकर , रोहिणी बच्चे,मंगला डोळे – सपकाळे…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्रीमंगलमूर्तीची ज्येष्ठी यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात प्रारंभ झाली. यंदाही मोठ्या भक्तसमुदायाच्या उपस्थितीत तिचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा ३१ मे रोजी चिंचवड येथे परतणार आहे. यावर्षीही, चिंचवड येथील श्री मंगलमूर्ती वाडा येथून ज्येष्ठी यात्रेस भव्य सुरुवात झाली. यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, तसेच विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप उपस्थित होते. या सोहळ्यात हजारो भक्तांनी सहभागी होत श्री मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तीचे दर्शन घेतले. श्री मंगलमूर्तींचे रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारंगी येथे श्री मोरया गोसावी महाराज यांनी प्रतिष्ठापित केलेले श्री गणेश व हनुमान…

Read More

अहिल्यादेवींच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात योगदान देणाऱ्या महिलांचा १ जून रोजी सन्मान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विशाल जनसेवेच्या स्मरणार्थ, सखी सोबती फाउंडेशनच्यावतीने “अहिल्या पुरस्कार २०२५” गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १ जून २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे पुणे जिल्ह्यातील समाजसेवा, प्रशासन, क्रीडा, संस्कृती आणि स्त्री सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती सखी सोबती फाउंडेशनच्या अध्यक्षा गिरिजा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अहिल्यादेवींच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित करणे हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश असल्याचेही…

Read More

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; गणरायाच्या पाताळातील (शेषात्मज) गणेश जयंतीनिमित्त गाभा-यात शेषनागाच्या प्रतिकृतीत बाप्पाची चांदीची मूर्ती विराजमान पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रुप पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारुन ही सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात शुक्रवारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  करियर कोणत्या क्षेत्रात करायचे याविषयी विद्यार्थ्यांबरोबर पालकांमध्ये देखील जागरूकता होणे आवश्यक आहे. यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट विद्यार्थी व पालकांमध्ये सुसंवाद साधून त्यांच्यामध्ये करिअर विषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम करते. त्याचाच एक भाग म्हणून म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक विवेक वेलणकर यांचे ‘दहावी नंतरची शाखा निवड’ हे पुस्तक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधून दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत देण्यात येते. याचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एस. बी. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संदीप पाटील यांनी केले.       दहावी पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी कोणती शाखा निवडावी याबाबत पालक व विद्यार्थ्यांना यावर मार्गदर्शन करणारे विवेक…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर एक सांस्कृतिक शहर म्हणून उदयास येण्यासाठी ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ सारखे सांस्कृतिक कार्यक्रम नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत. या शहराची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून झालेली सुरुवात भविष्यकाळात भव्य स्वरुप धारण करेल. या सांस्कृतिक चळवळीला पुढे नेण्यासाठी या क्षेत्रातील जाणकरांनी सहकार्य करावे. नागरिकांच्या सहभागामध्ये याचे यश अवलंबून आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.   पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी, रयत शिक्षण संस्थेचे पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालय आणि मुंबा फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९ मे ते ३१ मे याकाळात ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय…

Read More

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन हे शौर्य, देशभक्ती आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. सावरकरांच्या त्यागाने आणि विचारांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली . आजही त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला स्फूर्ती देतात.” असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जितेंद्र होले यांनी केले आहे. चिंचवडच्या राजे संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात सावरकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी स्वा. सावरकर प्रतिष्ठान, स्वा. सावरकर मित्र मंडळ, सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघ यांचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील सावरकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. होले पुढे म्हणाले की ,” वीर विनायक दामोदर सावरकर हे भारताचे थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारी, विचारवंत,…

Read More

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे शहर आणि सोमाटणे ग्रामपंचायत यांच्या मध्ये वसलेली ठाकर वस्ती ही प्रशासकीय दृष्ट्या त्रिशंकू स्थितीत असल्यामुळे आजपर्यंत दुर्लक्षित राहिली होती. मात्र, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सूचनेनुसार आज या वस्तीला तालुका प्रशासनाने पहिल्यांदाच भेट दिली. या दौऱ्यात तहसीलदार विक्रम देशमुख आणि गटविकास अधिकारी (बीडीओ) कुलदीप प्रधान यांनी ठाकर वस्तीतील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या. घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वस्तीतील नागरिकांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिले होते. प्रशासनाचा हा दौरा…

Read More