- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने मोरवाडी चौक, पिंपरी येथील अहिल्यादेवींच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तद्ननंतर मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे शहराध्यक्ष श्री.योगेश बहल तसेच शहरातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी योगेश बहल म्हणाले की, ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्यादेवी या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्त्या होत्या. आपल्याला त्यांच्या बुद्धीमत्तेचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव…
महापालिका सेवेतून एक सह आयुक्त, आठ मुख्याध्यापक, दोन सह शहर अभियंता, एक सहाय्यक आयुक्त,चार सिस्टर इनचार्ज, एक कार्यकारी अभियंता, एक प्रशासन अधिकारी, तीन कार्यालय अधिक्षक,पाच वाहन चालक, सोळा मजूर, दहा सफाई कामगार अशा वर्गाचा सेवानिवृत्तांत समावेश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, निरोगी आणि आनंदी जीवन जगावे तसेच आपल्या कुटुंबीयांना वेळ द्यावा. याशिवाय नोकरीदरम्यान राहून गेलेले पर्यटनासारखे आवडते छंद जोपासावेत असे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील आनंदी व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या युध्दनितीनिपुण,उत्कृष्ट प्रशासिका,मुत्सद्दी आणि जनहिताच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या आदर्श राज्यकर्त्या होत्या, त्यांनी आपल्या कारकीर्दीत जनकल्याण, न्यायव्यवस्था आणि विकासात्मक योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या याच लोककल्याणकारी धोरणांचा आदर्श घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची वाटचाल सुरु असल्याचे मत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार अमित गोरखे, उमा खापरे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी…
प्रशासकीय कारकिर्दीत सामान्य नागरिकांना मदत करता आल्याचे समाधान – चंद्रकांत इंदलकर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यातील टेकवडी (ता.पुरंदर) गावातील शेतकरी कुटुंबातून पुणे शहरात शिक्षणासाठी आलेला विद्यार्थी ते महापालिका अतिरिक्त आयुक्त असा प्रवास करून आज महापालिका सेवेतून निवृत्त झालेले सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा घेतलेला वेध- औंधच्या प्रशिक्षण संस्थेत वायरलेस ऑपरेटरचा कोर्स पूर्ण करून २० सप्टेंबर १९८८ ला पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेत इंदलकर दाखल झाले. २३ वर्ष या पदावर त्यांनी काम केले. २० जुलै २०१३ रोजी कामगार कल्याण अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली. या पदावर असताना कामगार कल्याणासाठी विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले. सेवानिवृत्तीच्या दिवशी निवृत्त होणाऱ्या अधिकारी,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली असून आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ती सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे नाविन्यपूर्ण अॅप विकसित करण्यात आले असून नागरिकांना या अॅपद्वारे खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मान्सूनपूर्व तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यामध्ये खड्ड्यांची समस्या सातत्याने उद्भवते. या समस्येवर उपाय म्हणून महानगरपालिकेने पॉटहोल अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे खड्डयांची तक्रार नोंदवणे आणि त्या तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ होणार आहे. नागरिक या अॅपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदवू शकतात,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता व मानसिक आरोग्यात सातत्याने सुधारणा घडवून आणण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबवित असते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सफाई सेवकांसाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायी मराठी चित्रपटाचे सोमवारी (२ जून) खास स्क्रीनिंगचे आयोजन (A special screening of the inspiring Marathi film ‘Aata Thampacha Nai’ will be organized on Monday (June 2) under the Swachh Bharat Abhiyan.) पिंपरी येथील विशाल सिनेमाज् येथे करण्यात आले आहे. सदर चित्रपट हा महानगरपालिकेतील कर्तबगार सफाई सेवकांच्या दैनंदिन जीवनावर आधारित असून, त्यांच्या कार्यात येणाऱ्या अडचणी, अनुभव व संघर्ष…
लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोणावळा शहरातील विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत आमदार सुनील शेळके यांनी आज लोणावळ्यात आढावा बैठक घेतली. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सुरक्षाविषयक गरजांशी संबंधित असलेल्या या प्रकल्पांची गती वाढवून नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हा या दौऱ्यामागचा उद्देश असल्याचे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले. दौऱ्यात त्यांनी खालील प्रमुख ठिकाणांना भेट देऊन कामाची सद्यस्थिती जाणून घेतली: 🔹 *ग्रामीण पोलीस स्टेशन, तुंगार्ली* – नवीन इमारतीचे काम लवकर पूर्ण होऊन ग्रामीण भागातील सुरक्षेसाठी सक्षम व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 🔹 *पांगळोली शासकीय इमारत* – गावपातळीवर शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी या इमारतीचे महत्त्व…
पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने १३३ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळ मधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली. सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अंगमेहनतीचे कामे आणि साधारण कामे , विविध प्रकारची कामे करत असताना विरंगुळा, तल्लफ म्हणून तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या कामगाराकडून इतर कामगारांना काही प्रमाणात सवय जडते . मात्र तंबाखू , जर्दा , गुटखा , खैनी,मिश्री, सिगारेट, बिडी अशा प्रकारचे व्यसनाचे पदार्थ सेवन केल्याने अनेक कामगारांचे शारीरिक आरोग्य बिघडत आहे त्याचे दुष्परिणाम अनेक होत आहेत,कॅन्सर सारख्या भयानक रोगाने कामगारांचे मृत्यू होत आहे आणि सामाजिक स्वास्थ देखील हरपत जात असल्याने कष्टकरी, कामगारांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडावे असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थांची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आळंदी परिसरातील फॉर्च्युन हिलटॉप आणि फॉर्च्युन वेदाज या दोन गृहप्रकल्पांत फ्लॅट घेतलेल्या नागरिकांनी, मकरंद सुधीर पांडे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून, त्यांच्या विरोधात त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.या प्रकरणी तक्रारदार नितीन शंकर धिमधिमे सह अनेक नागरिकांनी पोलीस आयुक्तालयात अर्ज सादर केला असून अर्जात नमूद केल्याप्रमाणे, मकरंद पांडे व नितीन धिमधिमे हे दोघे भागीदार असून त्यांनी एकत्रितपणे संबंधित गृहप्रकल्पांचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, पांडे यांनी बांधकाम अपूर्ण ठेवून जबाबदारी झटकत गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पातून पळून गेला असून, त्यांचे वर्तन संशयास्पद असल्याची माहिती बिल्डर नितीन धिमधिमे यांनी…
