Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने (रविवार दिनांक 1) महास्वच्छता अभियान -25 हा उपक्रम चिंचवड दशक्रिया घाट आणि परिसर येथे संपन्न झाला.आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे ही संस्था सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. आपण ह्या समाजात राहतो त्या समाज्याचे आपल्यावर असलेले ऋण फेडण्यासाठी १०८ कुटुंब एकत्र येऊन ही संस्था स्थापन झाली आहे.प्रत्येक वर्षी मकरसंक्रांतला कौटुंबिक स्नेहमेळावा, प्लास्टिक मुक्त अभियान, ऊसतोडणी कामगारांना, वंचित घटकांना दिवाळी फराळाचे वाटप, गडकिल्ले स्वच्छता अभियान असे अनेक कार्यक्रम आयोजित करीत असुन ह्याचा एक भाग म्हणून आज चिंचवड येथील दशक्रिया घाट, पवना नदी पात्र येथे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे अष्टपैलू खेळाडू आशिष सुनिल दास यांची हरियाणा येथे होणाऱ्या ६ व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशन कप २०२५ स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली आहे. आशिष याला लहानपणापासून क्रिकेट खेळाची खूप आवड होती. त्यांनी १४ वर्षाचा असताना त्याने क्लब जॉइन केला त्याने क्रिकेट मध्ये स्पिनर म्हणून बॉलिंग करायला सुरवात केली पण त्याने १–२ वर्षा नंतर फास्ट बॉलिंग प्रॅक्टीस चालू केली मग २०१६ ला त्याचे वडील वारले मग त्याने क्लब सोडला कारण त्याची फायनान्शियल कंडिशन चांगली नव्हती क्लब मध्ये खेळायची त्याने हळू हळू टेनिस क्रिकेट चालू केलं मग पावसाळी रबर बॉल वर चालू…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “आजच्या पिढीतील महिलांसाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक दीपस्तंभ आहेत. त्यांनी केवळ न्यायप्रिय शासिका म्हणूनच नव्हे, तर एक कुशल प्रशासक आणि समाजसुधारक म्हणूनही आपले कार्य सिद्ध केले. त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही आपल्याला विविध क्षेत्रांत दिसतो, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा वाघ यांनी केले. सखी सोबती फाउंडेशनने अहिल्यादेवींच्या नावाने हा पुरस्कार देऊन, समाजात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला आहे, हे अतिशय कौतुकास्पद आहे. अहिल्यादेवींनी महिला सबलीकरणाचा पाया रचला आणि आजच्या महिलांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करावे, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. राजमाता पुण्यश्लोक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘निर्जली’ या आशयसंपन्न चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावत महोत्सवाच्या केंद्रस्थानी स्थान मिळवले, तमिळ भाषेतील ‘थुनाई’ या लघुपटाने साऱ्यांची मने जिंकून सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार आपल्या नावे केला. तर सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्ममध्ये ‘लेस’ ने बाजी मारली. या महोत्सवात भारतासह ४० देशांमधून आलेले ९० पेक्षा अधिक चित्रपट, लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन आणि ६० सेकंद फिल्म्स प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रियंका भेरिया आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार तुषार शिंगाडे यांना प्रदान करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज महत्वाच्या सामाजिक विषयांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नुकतीच आपल्या शहरातील कन्या वैष्णवी हगवणे – कस्पटे हिच्या बाबतीत जी दुर्घटना घडली त्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभर पडले आहेत. या घटनेमुळे मराठा समाजाबद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे पुणे शहरातील सकल मराठा समाजाने लग्नव्यवस्थेसंदर्भात एकत्र बैठक घेऊन काही अटी व नियम लागू केलेले आहेत. याच धर्तीवर आपल्या पिंपरी चिंचवड शहर सकल मराठा समाजाच्या धोरणात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कै. वैष्णवीस श्रद्धांजली अर्पण करून सदर बैठकीस सुरुवात करण्यात आली. या बैठकीत समाजाची भविष्यातील वाटचाल…

Read More

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड येथील आघाडीची सामाजिक संस्था असलेल्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी करण्यात आली. विविध प्रजातीच्या ३०० रोपांचे नागरिकांना वाटप करत , पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना उन्नती सोशल फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य म्हणजे केवळ राजकीय किंवा सामाजिक नाही, तर पर्यावरणस्नेही शासक म्हणूनही त्यांचा ठसा इतिहासावर आहे. १७व्या-१८व्या शतकात शासन करत असताना त्यांनी नदी व जलस्रोतांचे संवर्धन, वृक्ष लागवड, आणि संधारण आधारित विकास या गोष्टींवर विशेष भर दिला.नद्यांची…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्रिशताब्दी समारोहाची सांगता शनिवार, दि. ३१ रोजी सायंकाळी मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात महिलांच्या हस्ते भव्य ‘शिव महाआरती’ चे आयोजन करून या आठ दिवसीय सोहळयाची सांगता झाली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीचे संयोजक विजय (शीतल) शिंदे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, माजी उपमहापौर केशव घोळवे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, माजी नगरसेविका निर्मलाताई कुटे, जयनाथ काटे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे,…

Read More

पीसीसीओईच्या मराठी भाषेतील संगणक अभियांत्रिकीच्या पहिल्या तुकडीचा ‘अश्वमेध २०२५’  पदवी प्रदान समारंभ उत्साहात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अभियांत्रिकीचे तांत्रिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा क्रांतिकारी निर्णय एआयसीटीने २०२० मध्ये घेतला. सध्या देशातील दहा राज्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. मराठी भाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देणारे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पीसीसीओई हे देशातील एकमेव महाविद्यालय आहे. या पदवी अभ्यासक्रमादरम्यान एकही विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून बाहेर गेला नाही, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. पदवी प्राप्त ७५ टक्के विद्यार्थ्यांना रोजगार संधी प्राप्त झाल्या आहेत. हे कौतुकास्पद असून ‘एआयसीटी’ने २०२० मध्ये प्रादेशिक भाषेतून उच्च शिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरला आहे. हे अधोरेखित होत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी (जयंती) निमित्त मंदिर स्वच्छता अभियानाचे आयोजन केले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवन पट माहिती पत्रक वाटप केले. मोहन नगर येथील बालाजी मंदिरात स्वच्छता करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन गणेश लंगोटे (उपाध्यक्ष भा.ज.पा पिंपरी चिंचवड़) व मंडल अध्यक्ष धरम वाघमारे यांनी केले.कार्यक्रमास अनुराधा गोरखे (माजी नगरसेविका)जयश्री वाघमारे (माजी नगरसेविका),सतीश सिलम (बालाजी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष )चेतन बेदरे,अविनाश गावड़े ,जनार्दन तलारे,चंद्रकांत शिंदे, मेहुल दोशी,संदीप कोकरे,रोहिनि रासकर. गिरीश गिधे,संभाजी नाईकनवरे. सत्यपाल थोरात. दीपक भंडारी. राम बसवणे.नितीन शिंदे,अमोल सोंटकके.राहुल बोरकर आदी उपस्थित होते.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने यंदाच्या वर्षी दिला जाणारा तिसरा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार बारामती येथील लता भगवान करे या ६४ वर्षीय महिलेला देण्यात आला आपल्या आजारी नवऱ्याच्या उपचारासाठी पैशाची कमतरता आहे म्हणून पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक असणारी पाच किलोमीटरची शर्यत अनवाणी धावून वयाच्या 64 व्या वर्षी जिंकणारी आधुनिक युगातील सावित्री म्हणावं अशा आज रोजी 70 वय असणाऱ्या लता भगवान करे यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सन्मान चिन्ह आणि एक लाख रुपये देऊन महाराष्ट्रातील प्रख्यात व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात…

Read More