Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरी सुविधा आणि लोककल्याणात्मक विकासासाठी सी.एस.आर अंतर्गत दीर्घकालीन भागीदारी सशक्त करण्याच्या उद्देशाने चिंचवड येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत ५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण या मूलभूत क्षेत्रांतील नागरिकाभिमुख पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली. ते यावेळी म्हणाले, “शहराचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता सर्वसमावेशक विकास अत्यावश्यक आहे. यासाठी केवळ निधी नव्हे तर सीएसआर क्षेत्रातील कंपन्यांचा अनुभव, कौशल्य आणि मानव संसाधनाचाही सहभाग आवश्यक आहे.’’ तसेच त्यांनी मोरवाडीतील दिव्यांग…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुरणवाडी येथे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्यावतीने देशी 75 झाडाचे वृक्षारोपण पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जेष्ट महिला श्रीमती सगुणाबाई नाणेकर यांच्या  हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, आपण फक्त पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केली पाहिजे असे नाही तर वर्षभर वृक्षारोपण केले पाहिजे. संगोपन केले पाहिजे आणि मुलाप्रमाणे त्याला जपले पाहिजे. आपल्या कुटुंबातील काही वेळ राखून ठेवावा तो पर्यावरणासाठी द्यावा त्यामुळे पर्यावरण वाढीसही चालना मिळेल . गुणवंत कामगार संगिता जोगदंड म्हणाल्या कि,आपल्या एकमेकांना काही भेट वस्तू द्यायचे असेल तर इतर वस्तू ऐवजी झाडे द्यावीत यामुळे प्रेमाचे नाते म्हणून दिलेले झाड लावले जाईल आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ) पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये आपत्कालीन औषध दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आपत्कालीन औषध विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अतिशय तणावपूर्ण परिस्थितीतही रुग्णांचा जीव वाचवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आपत्कालीन वैद्यकीय तज्ज्ञांची दखल घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शैक्षणिक चर्चा, सिम्युलेशन उपक्रम आणि सांस्कृतिक सादरीकरणाचा समावेश असलेला हा परिपूर्ण कार्यक्रम सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. या कार्यक्रमात आपत्कालीन औषध क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञांनी आपले विविध अनुभव आणि दृष्टिकोन सर्वांना सांगितले. तज्ज्ञमंडळींमध्ये चॅपल हिल येथील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील प्राध्यापक आणि मानद अध्यक्ष आणि टिंटिनल्लीज इमर्जन्सी मेडिसिन: अ कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी गाइडच्या मुख्य…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातून 2024 मध्ये पदवी प्राप्त केलेल्या तुषारा थुम्मलापल्ली यांनी भारतीय नौसेनेत पायलट म्हणून गौरवशाली नियुक्ती मिळवली आहे. हा क्षण विद्यापीठासाठी अत्यंत अभिमानाचा असून, देशभरातील तरुण अभियंत्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. फक्त 23 वर्षांच्या वयात तुषारा यांनी नौदलाच्या विशेष पायलट गटात स्थान मिळवले आहे. अभियंता ते सैन्य अधिकारी असा त्यांचा प्रवास शैक्षणिक गुणवत्ता, निर्धार आणि राष्ट्रसेवेच्या प्रति कटिबद्धतेचे प्रतीक आहे. यांत्रिकी विभागातील प्राध्यापकांनुसार, तुषारा यांनी शिक्षण काळात नेहमीच उत्कृष्ट शैक्षणिक आणि नेतृत्वगुण दाखवले. तांत्रिक प्रकल्पांमध्ये आणि विभागीय उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. “पहिल्याच दिवशीपासून तुषारामध्ये अधिकारी म्हणून लागणारे…

Read More

लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने रहाटणीत ११व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजातील वंचीत, पीडित, दुबळ्या, सर्वसामान्य घटकांचा आवाज बनण्याची प्रेरणा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संस्कारातून आणि विचारातून मिळाली. त्यांच्या याच तालमीत महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते तयार झाले. असे कार्यकर्ते भविष्यातही तयार व्हावेत यासाठी त्यांचे हे संस्कार येणाऱ्या नवीन पिढ्यांमध्येही रुजविण्याची गरज आहे, अशा शब्दांत माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. लोकनेते स्व. गोपींनाथ मुंडे प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त    ( On behalf of the public leader Late Gopinath Munde Pratishthan,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्ज रोखे (ग्रीन बॉण्ड) इश्यू करून २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला असून, अशी कामगिरी करणारी महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली आहे. महापालिकेने हे रोखे बीएसईच्या इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीवर खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून इश्यू केले. या इश्यूला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गुंतवणूकदारांचा पीसीएमसीवर असलेला विश्वास अधोरेखित करत, इश्यू सुरू होताच केवळ एका मिनिटात १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला, तर एकूण ५१३ कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच रोख्याला ५.१३ पट अधिक मागणी मिळाली. ‘एए प्लस’ पतमानांकन या हरित कर्ज रोखा इश्यूला क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त पतमापन संस्थांकडून ‘एए+’…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या 39 व्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार ह.भ.प. दत्तात्रय कुदळे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा तसेच, रक्तदान शिबिर शुक्रवार (दि.6) पिंपरी वाघेरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे सकाळी 9.30 वाजता आयोजित केले आहे, अशी माहिती दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोरवाडी, पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे विश्वस्त संजोग वाघेरे पाटील, सल्लागार अण्णा कापसे, सचिव बाळासाहेब वाघेरे, खजिनदार किसन वाघेरे, रमेश गोलांडे, बिपीन नाणेकर, अंकुश वाघेरे, जयवंत शिंदे, संतोष वाघेरे, तुषार वाघेरे, रोहण वाघेरे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी,…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘उत्तम जीवनशैली उत्तम आरोग्याची पहिली पायरी आहे!’ असे प्रतिपादन डाॅ. मानसी हराळे यांनी  निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. मधुश्री कला आविष्कार आणि दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘आरोग्यम् धनसंपदा’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना डाॅ. मानसी हराळे बोलत होत्या. पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समिती मुख्य समन्वयक सुहास पोफळे अध्यक्षस्थानी होते; तसेच माजी उपमहापौर शैलजा मोरे, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, मधुश्रीच्या अध्यक्षा माधुरी ओक यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. माधुरी ओक यांनी प्रास्ताविकातून पंधराव्या वर्षात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ”रेशीमबंध’ म्हणजे आत्मकथनात्मक आनंदाचा पेटारा होय!’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी  निगडी प्राधिकरणातील दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेतील ग्रंथदालनात व्यक्त केले. ज्येष्ठ लेखिका प्रज्ञा घोडके लिखित ‘रेशीमबंध’ या लघुकथासंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. तुकाराम पाटील बोलत होते. माजी उपमहापौर शैलजा मोरे, ज्येष्ठ लेखिका रजनी अहेरराव, डॉ. मानसी हराळे, सामाजिक कार्यकर्त्या राधिका बोर्लीकर, सुहास पोफळे, चंद्रकांत शेडगे, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. तुकाराम पाटील पुढे म्हणाले की, ‘प्रज्ञा घोडके यांचे अनुभवविश्व विशाल आहे. गणगोत, आप्तेष्ट यांनी ते भरलेले आहे. त्यांच्याशी असलेल्या सुखदुःख,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वूई टुगेदर फाउंडेशन नेहमीच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन जवेगवेगळे उपक्रम घेत असते. अत्यन्त कठीण परिस्थितून 10 वी 12 वी मध्ये चांगले मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव समारंभ यशस्वी क्लासेस हॉल चिंचवड येथे पार पडला. यात पिंपरी चिंचवड मधील रात्रशाळा, श्रीराम विद्यालय,घरकाम करणाऱ्यांची मुले, काही सहारा नसलेली मुले,वॉचमेन,रिक्षा चालक,आदी घटकामधील गुणवंत विद्यार्थी निवडून त्यांचा आवश्यक वस्तू,देऊन सत्कार तर केलाच परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून जेष्ठ शास्रज्ञ .डॉ अशोक गोविंद नगरकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. डॉ.नगरकर यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन तर केलेच पण विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यामुळे विद्यार्थी अतिशय खुष झाले. फाउंडेशनचे अध्यक्ष…

Read More