Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या पटांगणात माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. वसुंधरेच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि त्याचे संगोपन हाच एकमेव उपाय असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. ‘प्लास्टिकच्या प्रदूषणाचा अंत’ ही या वर्षाची  संकल्पना होती. यामध्ये “पृथ्वी आमच्या वर्गात आहे” ही स्वरचित कविता विद्यार्थ्यांनी सादर केली. पॉवरपॉईंट द्वारे वातावरणातील संभाव्य धोके आणि उपाययोजना याचे सादरीकरण केले.      ‘एक पेड माँ के नाम’ या सीबीएससीच्या मोहिमेअंतर्गत भारत सरकारच्या उपक्रमाची माहिती देण्यात आली आणि याविषयावर मनोरंजक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. अशा उपक्रमामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देहू- आळंदी रस्त्यावर चिखली-पाटील नगर येथील अत्यंत रहदारीच्या ठिकाणी महावितरण प्रशासनाचा जुना ट्रान्सफॉर्मर होता. त्यामुळे रस्त्यात अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडीची समस्या नियमित भेडसावत होती. याची दखल घेत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महावितरणकडे ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार, प्रशासनाने आज ट्रान्सफॉर्मर स्थलांतरीत करण्याची कार्यवाही केली. भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली- पाटीलनगर येथे देहू- आळंदी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारा महावितरण प्रशासनाचा ट्रान्सफॉर्मर हटवण्याबाबत स्थानिक नागरिक, ग्रामस्थ यांनी मागणी केली होती. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी महावितरण प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर पाटील नगर येथील ट्रांसफार्मर स्थलांतरीत केला आहे. यावेळी माजी नगरसेवक कुंदन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टपरी पथारी हातगाडी पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी परिसरात स्वच्छता मोहीम आणि प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरण संरक्षणाला चालना देणे आणि स्थानिक स्तरावर स्वच्छता राखणे हे होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त  शेखर सिंह, उपायुक्त  राजेश आगळे, आणि आरोग्य अधिकारी  अतुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. टपरी पथारी हातगाडी पंचायत यांच्या सहकार्याने भोसरी परिसरातील रस्ते, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली, जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण…

Read More

नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- नवी सांगवी येथे कृष्णा चौक व काटेपुरम चौक हे दोन प्रमुख वाहतूकीचे मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असून त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना व त्या मार्गावरून ये जा करण्याकरता लोकांना सहन करावा लागतो.शरदचंद्र पवार चिंचवड विधानसभा,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेघराज लोखंडे यांनी वाहतूक शाखाचे पोलीस उपायुक्त यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवी सांगवी येथे कृष्णा चौक व काटेपुरम चौक या दोन प्रमुख चौकात सिग्नल असूनही काही लोक सिग्नलचे पालन करत नाही तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्या उभ्या राहतात समोरून सिग्नल सुटल्यास येणाऱ्या गाड्यांना जाण्यासाठी जागा नसते. त्यामुळे रस्ता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत होर्डिंग आणि बांधकामांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून धडक कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी (दि.५) मारुंजी भागातील सर्वे नंबर ४५/१/२ मधील मोठ्या अनाधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या इमारतीवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. पीएमआरडीए हद्दीत अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याची दखल घेत अशा बांधकामावर थेट कारवाई सुरू आहे. त्यानुसार गुरुवारी मारुंजी परिसरातील अनधिकृत असलेल्या सर्वे नंबर ४५/१/२ या भागातील ६ मजली इमारतीवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. पीएमआयडीएने केलेला सर्वेक्षणात ९६७ अनाधिकृत होर्डिंग आढळून आल्या आहेत. गत काही दिवसात १२२ होर्डिंग अनाधिकृत बांधकाम व निर्मूलन…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील असंघटित कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने आज मुंबई मंत्रालयात राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली. या भेटीत असंघटित क्षेत्रातील कामगारांचे विमा संरक्षण, सामाजिक सुरक्षा, वेतनवाढ, अपघातानंतरची भरपाई तसेच नोंदणी व पोर्टल व्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रमुख कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी ही भेट घेतली असून त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक भास्कर राठोड, मनोज पाटील आणि महादेव गायकवाड यांची उपस्थिती होती. या बैठकीत विविध महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. त्यात घरेलू कामगार मंडळासाठी निधी उपलब्ध करणे, रिक्षाचालकांसाठी अपघाती विमा संरक्षण योजना सुरू करणे, कंत्राटी…

Read More

मधुश्री व्याख्यानमाला – द्वितीय पुष्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कार्यक्षेत्र कोणतेही असले तरी अलौकिक कर्तृत्वामुळे व्यक्ती लाखात एक आदर्श व्यक्तिमत्त्व ठरते!’ असे प्रतिपादन प्रा. दिगंबर ढोकले यांनी   निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. मधुश्री कला आविष्कार आणि दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘लाखात एक आदर्श व्यक्तिमत्त्व’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना प्रा. दिगंबर ढोकले बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे अध्यक्षस्थानी होते; तसेच माजी नगरसेविका शर्मिला बाबर, मधुश्रीच्या अध्यक्षा माधुरी ओक,  कार्याध्यक्ष सलीम शिकलगार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सलीम शिकलगार यांनी प्रास्ताविकातून, ‘सातत्याने पंधरा वर्षे व्याख्यानमालेसारखा उपक्रम चालविणे हे कठीण व्रत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकरी, टपरी-पथारी, हातगाडी धारक आणि फळभाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई सुरू आहे. नुकतीच दिघी येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचा माल जप्त करण्यात आला.  (Action was taken against the hawkers in Dighi and their goods were seized  ) या कारवाईविरोधात टपरी पथारी हातगाडी पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा   (  Otherwise, they will take to the streets and fight a fierce protest and legal battle )त्यांनी दिला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांच्या नेतृत्वाखाली ‘शहर उपजीविका कृती आराखडा (City Livelihood Action Plan – C-LAP)’ तयार करण्यात आल आहे. या अंतर्गत समाज विकास विभागाच्या वतीने प्रतिनिधींच्या माध्यामतून मंगळवार (३ जून)) पासून प्रातिनिधिक सर्वेला सुरुवात करण्यात आली आहे. या सर्वेला स्थानिक नागरिकांच्या प्रतिसादामुळे पहिल्याच दिवशी ३५० हून अधिक नागरिकांचा सर्वे पूर्ण करण्यात आला आहे. शहराच्या विविध भागात पुढील सहा दिवस हा सर्वे सुरु राहणार आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वसमावेशक व शाश्वत विकासासाठी हे चर्चासत्र महत्त्वपूर्ण असून, त्यात मिळणारे अनुभव व सूचना शहर उपजीविका कृती आराखडा (C-LAP) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख, गतिमान प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना विविध सूचनाही केल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, प्रशासन अधिकारी गोरखनाथ निमण, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, किशोर ननवरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता वैशाली ननवरे,…

Read More