Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘सकल विश्वासाठी पसायदान मागणार्‍या ज्ञानेश्वरमाउलींची ओवी सात्त्विक दानाचे रूप आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डाॅ. संजय उपाध्ये यांनी चिंचवडगाव येथे (रविवार, दिनांक ०८ जून २०२५) व्यक्त केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न’ या मासिक प्रवचनमालिकेंतर्गत ‘दान सात्त्विकाचे’ या विषयावरील ६८वे मासिक प्रवचनपुष्प गुंफताना डाॅ. संजय उपाध्ये बोलत होते. प्रा. बाळकृष्ण माडगूळकर, सुदाम मोरे, प्रभाकर नाळे, अभय कुलकर्णी, सागर देशपांडे, अजय लोखंडे आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रवचनापूर्वी, सलग ६८ महिने काशीधाम मंगल कार्यालय प्रवचनसेवेसाठी विनाशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने अवधूत कुलकर्णी आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू तुकोबांचे अभंग तारणार्‍या इंद्रायणीच्या साक्षीने ज्येष्ठ कवी सुरेश कंक लिखित ‘कृष्णार्पण’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आनंद डोह, गाथामंदिराजवळ, देहू येथे  संपन्न झाले. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे अशा पारंपरिक प्रकाशन पद्धतीला छेद देऊन सर्व उपस्थित साहित्यिक हेच अध्यक्ष आणि हेच प्रमुख पाहुणे समजून सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीत साहित्यविश्वातील हा आगळावेगळा प्रकाशन समारंभ अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, राजेंद्र घावटे, प्रदीप गांधलीकर, नारायण कुंभार यांनी मनोगतातून ‘कृष्णार्पण’ या संग्रहातील कवितांची तसेच सुरेश कंक यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाची आस्वादक समीक्षा केली. सुहास घुमरे, राधाबाई वाघमारे, हेमंत जोशी, मेहमुदा शेख, आनंद मुळूक, कल्पना बंब, पीतांबर लोहार यांनी…

Read More

‘सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध!’ – आयुक्त शेखर सिंह पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘पिंपरी – चिंचवड शहराच्या सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे!’ अशी ग्वाही पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी  पिंपरी येथे दिली. दर्द से हम दर्द तक ट्रस्ट आणि विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या तरतुदी आणि अंमलबजावणी’ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याखानातून शेखर सिंह यांनी संपूर्ण महाराष्टातील प्रमुख विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि नवोदित वकील यांच्याशी सुसंवाद साधला. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्मिक आणि बेधडक प्रश्न विचारून आयुक्त शेखर सिंह यांची शाळा घेतली; परंतु शेखर सिंह यांनी प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तर दिले. विधी सेवा…

Read More

कासारवाडी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी जैन स्थानकामध्ये आचार्य श्री पू महाबोधी सुरीश्वरजी म सा आदि ठाणा ४ यांचे आज दि ८ जुन रोजी आगमन झाले ,आचार्य श्री आपल्या प्रवचनामध्ये म्हणाले “या स्पर्धेच्या युगामध्ये दिवसेंदिवस मनुष्य दुःखी होत चालला आहे त्याचे प्रमुख कारण स्पर्धा आणि दुसऱ्यांबरोबर केलेली तुलना!! कम्पॅरिझन आणि कॉम्पिटिशन यामुळे दिवसेंदिवस मनुष्य सुखी होण्याच्या ऐवजी दुःखी होत चाललेला आहे .याचं कारण स्वतः कडे जे आहे त्यामध्ये समाधान मानण्यापेक्षा दुसऱ्याकडे माझ्यापेक्षा जास्त आहे याचंच दुःख जास्त मनुष्याला भेडसावत आहे. असं म्हणतात की मनुष्य प्राणी हा स्वतःच्या दुःखाने एवढा दुःखी नाही की जो दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. आपल्याकडे मारुती…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकासकामांचा वेग वाढवावा. विकास कामे करताना समन्वय ठेवावा.  नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य सेवा यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.  कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय कामांची आढावा बैठक शुक्रवार ( ६ जून) खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीस प्रांताधिकारी  प्रकाश सकपाळ, तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, वन परीक्षेत्र अधिकारी  समीर खेडेकर, सहाय्यक निबंधक…

Read More

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बदल केले आहेत. युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्षपदी (पिंपरी, चिंचवड विधानसभा)  राजेंद्र तरस यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघातील विविध नियुक्त्या केल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवा सेनेच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, सचिव राहुल लोंढे, किरण साळी, युवासेना सचिव पच्शिम महाराष्ट्र विश्वजीत बारणे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये युवासेना मावळ लोकसभा अध्यक्षपदी (पिंपरी-चिंचवड) राजेंद्र तरस, युवासेना मावळ लोकसभा (मावळ विधानसभा)…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने १३३ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळ मधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्या सजावटीच्या तयारी प्रारंभी वासापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वासा पूजनाने सजावटीचा श्री गणेशा झाला. बुधवार पेठेतील उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे वासापूजन झाले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, राजाभाऊ सूर्यवंशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित…

Read More

देहू गाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरीत आज (शनिवारी) मोठ्या प्रमाणावर आढावा बैठक आणि पाहणी दौरा पार पडला. या दौऱ्याला आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत विविध प्रशासनिक व सामाजिक संस्थांचे अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले. या बैठकीत देहू शहर प्रवेशद्वार, स्वागत योजना, इनामदार वाडा आणि संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान मंदिर यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. तसेच पालखी मार्गातील मुख्य मंदिर व घाट परिसराची पाहणी करून, या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षा आणि आपत्कालीन सेवा यांची दक्षता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. भक्त निवासस्थळे व सभागृह परिसरात आयोजित नियोजन आढावा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने वृक्षमित्र अरुण पवार यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध संस्थांना एक हजार वृक्ष रोपांचे वाटप करीत पर्यावरण वाचविण्यासाठी ‘वृक्षदान चळवळी’चा संकल्प केला. पुढील आठवडाभर वृक्षप्रेमींना पाच फूट उंचीच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. ‘झाडे लावून व पाणी वाचवून पर्यावरणाचा योग्य समतोल राखूया’ या उपक्रमांतर्गत देशी रोपे पिंपळ, वड, कडुलिंब, चिंच, आवळा, आबा, जांभूळ, पेरू, करंज अशा चार ते पाच फूट उंचीच्या रोपांचे विविध संस्थांना वाटप करण्यात आले. औंध जिल्हा रुग्णालय येथे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षरोपण करण्यात आले. टाटा मोटर्स टाटा ऑटोकॉम्प हेंड्रिक्सन प्लांट, डॉ. डी. वाय. पाटील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कॉर्फबॉल असोसिएशन आणि पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय, पुणे यांच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी व पिंपरी चिंचवड कॉर्फबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राज्यस्तरीय कॉर्फबॉल पंच मार्गदर्शन शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले. पीसीसीओई, निगडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार अमित गोरखे आणि उद्योजक नरेंद्र लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पंच डॉ. इ. बी. श्रीकांत, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. अमेय काळे, माजी सचिव डॉ. उमेशराज पनेरू, डॉ. ज्ञानेश्वर चिमटे, सचिन ववले, ज्ञानेश पाटील आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. डॉ. श्रीकांत यांनी मार्गदर्शन केले. उद्योजक नरेंद्र लांडगे…

Read More