- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने देशभरात ‘संकल्प ते सिद्धी’ हे अभियान सुरू केले आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, या अभियानाचाच एक भाग म्हणून, पिंपरी-चिंचवड शहरात बुधवार, ११ जून २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गोविंद गार्डन बॅंक्वेट हॉल, पिंपळे सौदागर, येथे जिल्हा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की, ‘संकल्प ते सिद्धी’ अभियान हे केंद्र सरकारच्या विविध विकास योजना आणि कामगिरीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ४ कोटी लोकांना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी कॅम्पमधील तलाठी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरील झाड व्यावसायिकांनी १५-२० दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात मुळासकट तोडले. नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यावर परिसरात तीव्र संताप पसरला आहे. झाडाचे उरलेले खोड कापडी पोत्याने झाकण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. युवा नेते सुहास कुदळे यांनी दोषींवर “महाराष्ट्र (नगरपालिका क्षेत्रांतील) वृक्षतोड प्रतिबंधक कायदा, १९६४” नुसार कठोर कारवाईची मागणी केली आहे. पिंपरी कॅम्पमधील तलाठी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरील एक जुने व मोठे झाड काही व्यावसायिकांनी सुमारे १५-२० दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात मुळासकट तोडले. ही घटना सुरुवातीला गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, काही नागरिकांच्या लक्षात आल्यावर परिसरात तीव्र संताप पसरला आहे. विशेष म्हणजे, झाडाच्या…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्यावतीने मराठा तरुणांचे व्यवसायाकडे मन वळविण्याच्या उद्देशाने येत्या ११ जून रोजी एक दिवसीय विशेष व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या प्रशिक्षण शिबिराचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर यांनी केले आहे. या प्रशिक्षण शिबिरात मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तनपुरे, मराठा सेवा संघाचे राज्याचे अध्यक्ष विजय घोगरे, मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सिंग पाटील, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संजय वायाळ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या काही वर्षांत मराठीजनांचे, विशेषतः पुणेकरांचे दुबईतील चैतन्यशील मित्र, साहित्य, संस्कृती, नाट्य, संगीत, चित्रपट कलावंत आणि राजकीय व्यक्तींचे स्नेही, दुबईसह बेळगाव आणि परिसरातील सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सोमनाथ पाटील यांचा हृद्य सत्कार रविवारी (दि. ८) पुण्यात करण्यात आला. यावेळी दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीमधील त्यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. दुबई सरकारमध्ये ३७ वर्षे उच्चपदावर असलेल्या सोमनाथ पाटील यांच्या पुण्यातील मित्र परिवाराच्या वतीने हा अनौपचारिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते प्रवीण तरडे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. सहकार बँकींगतज्ज्ञ आणि राज्य सरकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतातील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रा अग्रणी काम करणारी आय ए एस ( इन्डो अथलेटिक्स सोसायटी ) तर्फे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या पुणे पंढरपूर पुणे सायकल वारीचे शनिवारी 7 जून रोजी पहाटे दोन वाजता देहू येथील गाथा मंदिर येथून प्रस्थान करण्यात आले. यंदाचे वर्ष सदर सायकल वारीचे नववे वर्ष असून यावर्षी तब्बल 1850 हून अधिक सायकलपटूंचा सहभाग यामध्ये नोंदवण्यात आला आहे. एमआयडीसी चे सीईओ श्री नितीन वानखेडे, प्रकाश शेटबाळे, पीसीएमसी चे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या अधिकारी सुधाकर गुडीपट्टी, ग्रीष्मा बिस्वल, गरवारे टेक्निकल फायबरचे संदीप निकम, उद्योजक अण्णारे बिरादर, माणिक डावरे, वसंत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सध्या गो-धनातील गायी-म्हशींमध्ये वाढत असलेल्या लंपी रोगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. चिखली कुदळवाडी व बालघरे वस्ती येथे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक दिनेश यादव यांच्या पुढाकाराने लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत पशुवैद्यकीय अधिकारी श्री. संदीप खोत आणि अरुण दगडे यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत लंपीपासून जनावरांचे संरक्षण कसे करावे याची माहिती देण्यात आली. जनावरांना संसर्ग होण्याआधीच लसीकरण करून प्रतिबंधात्मक उपाय योजण्यावर भर देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या या पुढाकारामुळे जनावरांच्या आरोग्याचे रक्षण होणार असून शेतकऱ्यांमध्ये रोगाबाबत जागरूकता वाढत आहे.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी रुग्णालय व जीवनशेठ तापकीर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार महेश लांडगे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रक्त पेढी मध्ये गरजू रुग्णांसाठी रक्त संकलित केले जाते. यासाठी महापालिका व जीवनशेठ तापकीर मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण २३ रक्तदात्यांनी सहभाग घेतला असून ६९ युनिट रक्त संकलित करण्यात आले. हे रक्त समाजातील गोरगरीब…
विधी विद्यार्थ्यांनी घेतली आयुक्तांची शाळा! पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘पिंपरी – चिंचवड शहराच्या सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे!’ अशी ग्वाही पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी येथे दिली. दर्द से हम दर्द तक ट्रस्ट आणि विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या तरतुदी आणि अंमलबजावणी’ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याखानातून शेखर सिंह यांनी संपूर्ण महाराष्टातील प्रमुख विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि नवोदित वकील यांच्याशी सुसंवाद साधला. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्मिक आणि बेधडक प्रश्न विचारून आयुक्त शेखर सिंह यांची शाळा घेतली; परंतु शेखर सिंह यांनी प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तर दिले. विधी सेवा प्राधिकरण पुणे अध्यक्ष…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सकल विश्वासाठी पसायदान मागणार्या ज्ञानेश्वरमाउलींची ओवी सात्त्विक दानाचे रूप आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डाॅ. संजय उपाध्ये यांनी चिंचवडगाव येथे (रविवार, दिनांक ०८ जून २०२५) व्यक्त केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न’ या मासिक प्रवचनमालिकेंतर्गत ‘दान सात्त्विकाचे’ या विषयावरील ६८वे मासिक प्रवचनपुष्प गुंफताना डाॅ. संजय उपाध्ये बोलत होते. प्रा. बाळकृष्ण माडगूळकर, सुदाम मोरे, प्रभाकर नाळे, अभय कुलकर्णी, सागर देशपांडे, अजय लोखंडे आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रवचनापूर्वी, सलग ६८ महिने काशीधाम मंगल कार्यालय प्रवचनसेवेसाठी विनाशुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने अवधूत कुलकर्णी आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू तुकोबांचे अभंग तारणार्या इंद्रायणीच्या साक्षीने ज्येष्ठ कवी सुरेश कंक लिखित ‘कृष्णार्पण’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आनंद डोह, गाथामंदिराजवळ, देहू येथे संपन्न झाले. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे अशा पारंपरिक प्रकाशन पद्धतीला छेद देऊन सर्व उपस्थित साहित्यिक हेच अध्यक्ष आणि हेच प्रमुख पाहुणे समजून सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीत साहित्यविश्वातील हा आगळावेगळा प्रकाशन समारंभ अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, राजेंद्र घावटे, प्रदीप गांधलीकर, नारायण कुंभार यांनी मनोगतातून ‘कृष्णार्पण’ या संग्रहातील कवितांची तसेच सुरेश कंक यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाची आस्वादक समीक्षा केली. सुहास घुमरे, राधाबाई वाघमारे, हेमंत जोशी, मेहमुदा शेख, आनंद मुळूक, कल्पना बंब, पीतांबर लोहार यांनी…
