Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष   राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या नियोजना संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनसेचे नेते गणेश आप्पा सातपुते व महेश बैसाने यांनी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या पर्यावरणविषयक जाणीवेचे अनुकरण करत, त्यांच्या वाढदिवस दिनी म्हणजेच दि.१४ जून २०२५ रोजी, पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी १००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमात मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शहराचे पर्यावरण सुधारण्यासाठी हे महत्त्वपूर्ण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र राज्यातील कामगार, कष्टकरी वर्गाची परिस्थिती बेताची, नाजूक असल्यामुळे इच्छा असतानाही कामगार स्वतः शिक्षण घेऊ शकलेले नाहीत. मात्र यापुढे पाल्यांना, बालकामगार, कामगार म्हणून राबविले जाऊ नये आणि बालकांना सर्वांगीण विकासाचा हक्क हा मिळालाच पाहिजे. म्हणून हालाखीची परिस्थिती असो किंवा नाजूक असो आता इथून पुढे मुलांना कसल्याही परिस्थितीत शिकवण्याचा संकल्प आज सर्व असंघटित कामगारांनी केला. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, घरेलू कामगार समन्वय समिती, बांधकाम कामगार समिती तर्फे बालकामगार विरोधी दिनी बाल कामगार रोखण्याचे आवाहन केले “डोक्यावर पाटी नको हातात वही पेन देऊ”, “त्यांच्या हस्ती पुस्तके द्या काम नाही”, “बालमजुरीला आळा; बालमजुरी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई येथील महाराष्ट्र विधान भवनात विधानसभा उपाध्यक्ष  अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मोशी, पिंपरी चिंचवड येथे सुरू असलेल्या नवीन न्यायालय इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) वरिष्ठ अधिकारी श्रीमती घावटे यांनी सदर बांधकामाची सद्यस्थिती मांडली. त्यांनी सांगितले की, न्यायालयाच्या नवीन इमारतीचे सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. एप्रिल 2026 पर्यंत संपूर्ण व्यवस्थात्मक काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सद्यस्थितीचे फोटो सादर करत PWD कडून प्रत्यक्ष प्रगती दाखवण्यात आली. या वर्षी अठरा कोटी रुपये निधी मंजूर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘मित्रत्व हे ‘माझ्या स्मृती माझी जीवनगंगा’ या ग्रंथाचे बलस्थान आहे!’ असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी निगडी येथे काढले. .ज्येष्ठ लेखक प्रकाश राऊळकर लिखित ‘माझ्या स्मृती माझी जीवनगंगा’ या आत्मकथनपर ग्रंथाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बसंत बंग, प्रकाशक दिलीप मराठे आणि लेखक प्रकाश राऊळकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. राजन लाखे पुढे म्हणाले की, ‘जीवनात येणाऱ्या असंख्य व्यक्ती आपल्याला कळत नकळत अनेक गोष्टी शिकवत असतात; तसेच आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर ओलांडलेल्या पायर्‍या आयुष्याच्या उत्तरार्धात एखाद्या चित्रपटाप्रमाणे स्मरत राहतात. हीच अनुभूती देणारा ‘माझ्या स्मृती माझी जीवनगंगा’…

Read More

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ‘विकसित भारत संकल्प कार्यशाळा ‘ संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  -+आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध विकास योजना आणि गेल्या ११ वर्षांतील ४ कोटी लोकांना पक्की घरे, ‘हर घर जल’ योजना, आयुष्मान भारत योजना यांसारख्या जनहिताच्या योजनांच्या कामगिरीची आणि सरकारच्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोविणे आवश्यक असून, २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा, असे आवाहन भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांनी केले. पिंपरी-चिंचवड शहरात गोविंद गार्डन बॅंक्वेट हॉल, पिंपळे सौदागर येथे “विकसित भारत संकल्प सभा आणि जिल्हा कार्यशाळा” पार पडली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करतांना ते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरुवार (दि.१२ जून) रोजी बंद राहणार आहे. तसेच दुस-या दिवशी शुक्रवार (दि.१३ जून) रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिले आहे. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता-१ प्रमोद ओंभासे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये याकरिता वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील से.क्र.२३ येथील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहेत.तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक देखभाल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘‘ग्रीन म्युनिसीपल बाँन्ड’’च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार होण्यास मदत होणार आहे. 7.57 टक्के व्याजदाराने सदर बाँड मिळले आहेत. देशातील पहिली महापालिका ठरल्यामुळे केंद्र सरकारचा 20 कोटी रुपयांचा प्रोत्साहन निधी मिळणार आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅपिटल आणि बाँड मार्केटमधून महानगरपालिकांना ॲक्सिस मिळावा, यासाठी आग्रही आहेत. त्यासाठीचा पहिला प्रयत्न पिंपरी-चिंचवड महापालिकेने यशस्वी केला आहे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महानरपालिकेच्या वतीने शहरात हरित सेतू व पर्यावरणपूरक विकास प्रकल्प राबवण्यासाठी आर्थिक स्त्रोत निर्माण करुन हरित कर्ज रोख्यांतून (ग्रीन बाँड) सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारण्यात आला आहे.…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शहरात पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकास प्रकल्प राबविण्यासाठी हरित कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. ही केवळ पिंपरी चिंचवड शहरासाठीच नव्हे तर राज्य सरकारसाठी देखील अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. पिंपरी चिंचवड महापालिकेने पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, हरित कर्ज रोख्यांच्या (ग्रीन बाँड्स) माध्यमातून २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला आहे. या ऐतिहासिक यशानंतर आज मुंबई शेअर बाजारात (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) हरित कर्ज रोख्यांच्या लिस्टिंग निमित्ताने बेल रिंगिंग समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे पिंपरी चिंचवड विशेष प्रतिनिधी सुनील लांडगे यांना यावर्षीचा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर झाला आहे. पंढरपूर आणि जळगांव येथील श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर या संस्थेच्या वतीने दरवर्षी पालखी सोहळ्यातील कार्य व भागवत धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना संस्थेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी कै. भाऊसाहेब उर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार देऊन पंढरपूर येथे गौरव करण्यात येतो. श्री विठ्ठलाची मूर्ती, मानाचा वारकरी फेटा, शाल, श्रीफळ व संत मुक्ताबाई चरित्र ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप असते. यावर्षीचा पुरस्कार पिंपरी…

Read More

पिंपळे गुरव,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथे गेल्या दहा वर्षापासून पुरुष वटपौर्णिमा मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या  वतीने होत असते पण हे वर्ष आपवाद ठरले आहे कारण शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी पुरुष वटपौर्णिमा यावर्षी होणार नाही म्हणून कार्यकर्ते व नागरिकांना संदेश दिला पण घेतलेला वसा कोणत्या परिस्थितीत बंद करायचा नाही असा निर्णय घेतला. स्त्री पुरुष समानतेसाठी वटपौर्णिमा साजरी करण्याचा पायंडा बंद पण झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही दोघा पती-पत्नी वटपौर्णिमा साजरी केली असे आण्णा जोगदंड म्हणाले पुढे ते म्हणाले की,कोणताही कार्यक्रम घ्यावयाचा म्हटले की नियोजन आणि ताणतणाव येतोच यावर पर्याय म्हणून शहरातील पहिले…

Read More