Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो युवा, महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. थेरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना महिला नेत्या सुलभा उबाळे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव  विश्वजीत बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख राजेश वाबळे,  दिलीप पांढरकर, शहरप्रमुख निलेश तरस, पिंपरी-चिंचवड युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाचरणे, पिंपरी-चिंचवड महिला संघटिका सरिता साने, युवतीसेना जिल्हा प्रमुख सायली साळवी, माजी नगरसेवक  बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसेविका विमल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळा येत्या सोमवार दिनांक १६ जून पासून सुरु होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांचे शहरातील सन्माननीय लोकप्रतिनिधी तसेच महानगरपालिकेच्या अधिकारीवर्गाकडून स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय व्हावा व विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असून यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप हे सन्माननीय लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्यासमवेत महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारीवर्गाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी डॉक्टरांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महापालिकेतर्फे सर्व डॉक्टरांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि साधनसामग्री वेळेवर उपलब्ध करून दिली जाईल. शहरातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हे आपले सामूहिक उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. पावसाळ्यात होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांबाबत खासगी वैद्यकीय क्षेत्र अधिक सजग राहावे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखा (आयएमए-पीसीबी), पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन (पीसीडीए) आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (एनआयएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘मान्सूनपूर्व काळजी’ या विशेष वेबिनारचे आयोजन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी भक्ती-शक्ती चौकात १९ जून रोजी तर संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी २० जून रोजी शहरात दाखल होणार आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज असून त्याचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यावेळी विठ्ठल मंदीराचे विश्वस्त तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम,पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे,…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्हा परिषदेतर्फे साकारलेल्या “पुणे मॉडेल स्कूल” आणि “स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)” या अभिनव उपक्रमांच्या उद्घाटन समारंभात मावळ तालुक्याचा अभिमान वाढवणारी घटना घडली. पिंपळखुटे (ता. मावळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय यश मिळवले. या सन्मानाने मावळातील शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांचे दर्शन घडले असून, ग्रामीण भागातील शाळाही गुणवत्ता, उपक्रमशीलता आणि स्पर्धात्मकतेच्या बाबतीत पुढे आहेत, हे अधोरेखित झाले. या भव्य कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रणरागिणी महिला मंडळाच्या संस्थापिका आणि आनंद घन वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा  निशा मधुकर रसाळ यांना त्यांच्या समाजकार्याबद्दल “समाजभूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यामुळे त्यांच्या कार्याला राज्यस्तरीय मान्यता लाभली आहे. निशा रसाळ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, वृद्धांच्या सेवेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रणरागिणी महिला मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून, महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याचा त्यांचा ध्यास लक्षणीय ठरला आहे. तसेच, “आनंद घन वृद्धाश्रम” या उपक्रमातून त्यांनी वयोवृद्ध नागरिकांसाठी स्नेहपूर्ण आणि सन्माननीय आयुष्य निर्माण करण्याचा प्रयत्न…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने पारदर्शकता, प्रामाणिकता, गतीशीलता आणि निर्णयक्षमतेसह कार्य केले आहे. पूर्वीच्या भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला पूर्णविराम देऊन विकासाला प्राधान्य देण्यात आले. ‘शासन म्हणजे सेवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवले गेले. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीमुळे योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने मध्यस्थांचा वाटा पूर्णपणे संपला आहे. वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीमुळे करप्रणालीत सुसूत्रता येऊन भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. याच काळात कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरचा भारताशी असलेला संबंध अधिक दृढ करण्यात आला, जो ऐतिहासिक निर्णय ठरला, असे गौरवोद्वार भाजपा…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील एस. वाय. व टी. वाय. वर्गातील विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास, समूह चर्चा ,नोकरीसाठी अर्ज कसा करावा, मुलाखत कशी द्यावी, बौद्धिक चाचणीला कशाप्रकारे सामोरे जावे, व्यक्तिमत्व विकास, भाषेवर प्रभुत्व कसे मिळवावे आधी विषयावर एक सप्ताहाची पूर्ण वेळ कार्यशाळा प्रतिभा महाविद्यालय व स्मार्ट टँक एज्युकेशन (इन्फोसिस )जी टी टी बार्क्लेज यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. त्यात विविध क्षेत्रातील 15 तज्ञ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. त्यांच्या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे यावेळी तज्ञ…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी बुधवारी केले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्ये ठेवलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच वीजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत. त्यांना वीजबिल भरण्यासाठी तसेच गरजेनुसार हे बिल कोणाला पाठविण्यासाठी किंवा त्याचा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल. डिजिलॉकर हा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याचा वापर करून नागरिकांना आपले पॅन कार्ड, वाहन नोंदणी कागदपत्रे, रेशन कार्ड, दहावी मार्कशीट, बारावी मार्कशीट,…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आदेशाने मोशी येथे सुरू असलेल्या न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत  बुधवारी बैठक पार पडली. सदरच्या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उज्ज्वला घावटे यांनी बांधकाम ४० टक्के होत आलेले असून येत्या डिसेंबर २०२५पर्यंत बांधकाम पूर्ण होऊन पुढील एप्रिलपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कळविण्यात आले. सदर बांधकामाची सध्याची परिस्थिती फोटोद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बैठकीमध्ये दाखवण्यात आली. सदर बांधकामासाठी यावर्षी अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे; तसेच उर्वरित बांधकामासाठी अजून पन्नास कोटींचा निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे,…

Read More