Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना धक्कादायक आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे तसेच सुमारे २० ते २५ जण वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींवर तातडीने उपचाराचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत बचावकार्याला वेग देण्याचे, एनडीआरएफच्या तुकड्या, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा…

Read More

“पीएसबी एचआर एक्सलन्स ॲवॉर्ड” सोहळा उत्साहात संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्योग व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजात ‘एचआर’ची भूमिका आव्हानात्मक असते. कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच येणाऱ्या प्रत्येक समस्या, प्रश्न यांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे उद्योग व्यवसायाचे परिचालन नियमित गतीने सुरू ठेवणे शक्य होते, असे मत पुनावाला फाउंडेशनच्या अध्यक्षा पद्मश्री डॉ. लीला पुनावाला यांनी व्यक्त केले.     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित, पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि पुणे बिझनेस स्कूलच्या (पीबीएस) वतीने “एचआर एक्सलन्स ॲवॉर्ड – २५” सोहळा शनिवारी (दि. १४) बालेवाडी येथे पार पडला. यावेळी पीसीसीओईचे विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पुनावाला फाउंडेशनचे फिरोज पुनावाला,…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल कोसळून  झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेत तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, ३२ हुन अधिक पर्यटक जखमी आहेत. सहा गंभीर जखमी आहेत. पाण्यात वाहून गेलेल्या पर्यटकांचे शोधकार्य सुरू आहे. हा पूल जीर्ण झाला होता. असे जीर्ण पूल तातडीने दुरुस्त करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. खासदार बारणे म्हणाले, कुंडमळ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. कुंडमळा नदी ओलांडण्यासाठी,…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला. या दुर्घटनेत पुलावरून अनेक पर्यटक नदीत पडले आणि वाहून गेले. चार जणांचे मृतदेह सापडले असून ५२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ५१ जण जखमी असून, सहाजणांची प्रकृती गंभीर आहे. युद्धपातळीवर सुरू झालेले मदत व शोधकार्य अंधार झाल्यावर थांबवण्यात आले. रविवारी सुटीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी १००-१५० पर्यटक लोखंडी पुलावर उभे राहून नदीतून वाहणारे पाणी बघत होते. त्यांच्या वजनाने अचानक पूल मधोमध तुटून कोसळला. पुलावरील अनेकजण पाण्यात पडले आणि वाहून जाऊ लागले. आरडाओरडा सुरू झाला. काही तरुणांनी वाहून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रहाटणी प्रभागातील गाळयुक्त नाले तुडुंब भरल्याने रस्त्यांवर तळे साचून पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले. मात्र मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन आणि मा. स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर यांनी तातडीने तत्परता दाखवून महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने नाल्याची सफाई करून गाळ काढल्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली. रहाटणी येथील नाल्यांची अनेक दिवसांपासून सफाई करण्यात न आल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा आणि गाळ साचला आहे. परिणामी शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रहाटणीतील श्रीनगर येथील नाल्यातील पाणी थेट रस्त्यावर आणि सज्जनगड कॉलनी व सिंहगड कॉलनीतील नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल आणि गैरसोय झाली. याबाबत…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी (दि.१५) अचानक कोसळला. या घटनेत पूलावरून प्रवास करत असलेले अंदाजे २० ते २५ जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचे समजते. तसेच ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूल कोसळल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य जोरात सुरू असून, अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची अधिक माहिती लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निगडीतील अंकुश चौक येथे भव्य वृक्षारोपणाचा एक प्रेरणादायी उपक्रम पार पाडण्यात आला. पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निगडीतील अंकुश चौक येथे वृक्षारोपणाचा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत पिंपळ, वड, चिंच यांसारख्या देशी व पर्यावरणपूरक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या झाडांचे औषधी व पर्यावरणीय दृष्टीने खूप महत्त्व आहे. या झाडांनी फक्त पर्यावरणच नाही, तर आपल्या पुढील पिढ्यांचे आरोग्य सुद्धा सुरक्षित राहील. वृक्षारोपण कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक तसेच युवा वर्गाच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. सचिन…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  इलेक्ट्रीकल वाहने भारतासह जगाचे भविष्य आहेत. परंतू, अद्यापही काही गैरसमज असल्याने लोक अपेक्षितरित्या इलेक्ट्रीकल वाहनांची खरेदी करत नाहीत. इलेक्ट्रीक चारचाकी वाहनांना चालविण्यासाठीचा खर्च इतर इंधनांपेक्षा अतिशय अल्प आहे. केवळ या वाहनांबद्दल आणि त्यांच्या बॅटरी आयुष्याबद्दलचे गैरसमज दूर करण्याची गरज असून ते केल्यास भारतात इलेक्ट्रीक वाहनांची विक्रमी विक्री होईल, असे मत टाटा मोटर्सचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सिताराम कंदी यांनी व्यक्त केले.  एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे येथे यांत्रिक विभाग व इम्पीरियल सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह इंजिनिअर्स (आयएसआयई) प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इ-मोबिलिटी’मधील उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड, अवजड उद्योग मंत्रालयाचे उत्पादन क्षेत्राचे उपसचिव गौरव…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘कायद्यावरील विश्वास आणि आपल्या अभ्यासातून प्राप्त झालेला आत्मविश्वास हा यशस्वी वकिली व्यवसायाचा मूलमंत्र आहे!’ असे विचार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव  जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथे व्यक्त केले. दर्द से हमदर्द तक ट्रस्ट आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पाठ्यपुस्तकापलीकडील गुन्हेगारी कायद्याचे अनुभव आणि कायदेविषयक साहाय्य’ या विषयावरील मासिक प्रशिक्षण उपक्रमाच्या समारोप सोहळ्यात मिलिंद जाधव बोलत होते. पुणे जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ॲड. सोनल पाटील, दर्द से हमदर्द तक ट्रस्टचे सचिव ॲड. प्रकाश साळशिंगीकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती…

Read More

मावळ, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. ग्रुप ग्रामपंचायत आहिरवडे येथील जोड रस्त्यांसाठी पाठपुरावा करून  ५० लाखांचा निधी मंजूर करून आणला. त्यातून राष्ट्रीय राजमार्ग ४ ते आहिरवडे जोडरस्त्याच्या सुधारणा कामांचे भूमिपूजन  खासदार  बारणे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय नवघने, शिवसेना देहूगाव शहर प्रमुख सुनिल हगवणे, सरपंच सविता काजळे व उपसरपंच स्वाती पाराटे उपस्थित होते. तसेच नवनाथ हरपुडे, संभाजी शिंदे, भाऊ बराटे, दिपक चव्हाण, सचिन चव्हाण, सतीश इंगवले, मदन शेडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.  खासदार…

Read More