- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगर सचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत आस्थापनेवरील विशेष तज्ञ व वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर वेतानवाढ देणे, पिंपरी गाव येथील मंदिराजवळील नुतनीकरणाचे विद्युत विषयक कामे, क्रांतिवीर चाफेकर राष्ट्रीय स्मारक, नवीन तालेरा रुग्णालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था कासारवाडी व मोरवाडी, अभिलेख कक्ष नेहरूनगर येथे मेस्को मार्फत सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देणे, जिजामाता…
पिंपरी चिंचवड महापालिकेने केली उभारणी, विविध विकास प्रकल्पांचे आज होणार भूमिपूजन आणि उदघाटन पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालन लोकार्पण यासह विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. याप्रसंगी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नांदेड येथील माऊली भक्त भारत रामिनवार, मिरा रामिनवार यांनी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी १ किलो सोन्याचा सुमारे १ कोटी रुपये किंमतीचा लक्षवेधी आकर्षक, अलंकारिक मुकुट अर्पण केला. यासाठी पुण्यातील प. ना. गाडगीळ आणि सन्स मर्या. यांचे कारागिरांनी चार महिन्यांच्या अथक परिश्रमाने लोकार्पण करण्यात आलेला हा मुकुट तयार केला आहे. पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक 3D तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वारकरी परंपरेशी नातं असलेल्या कुशल कारागिरांनी हा मुकुट भक्तिभाव जपत मुकुट विकसित केला. मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण आदी मंगल प्रतीके आहेत. हा मुकुट पालखी सोहळ्याचे प्रस्थान पूर्व संध्येला…
विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन ; गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. अश्वांनी मंदिराच्या थेट सभामंडपात प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकाराम… माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला. मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी,…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत ‘मूल्यवर्धन ३.०’ हा कार्यक्रम राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला असून महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांच्यात अंमलबजावणी संदर्भात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एमएससीईआरटी) आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षकांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्यास भारतीय जैन संघटनेचे वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प येथे उत्साहात प्रारंभ झाला. याचे उद्घाटन एमएससीईआरटीच्या समता विभागाचे उपसंचालक डॉ. इब्राहिम नदाफ, समता विभागाच्या प्रमुख वर्षाराणी भोपळे, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, बीजेएस शाळा प्रबंधन समितीचे अध्यक्ष…
चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडीतील बालघरे वस्ती येथे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी प्रितम बाविस्कर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी दिनेश यादव यांच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित व अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नागरिक, विशेषतः महिलावर्ग, त्रस्त झाला होता. त्यामुळे समस्या समजून घेण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होत्या. त्यांनी थेट अधिकाऱ्यांपुढे आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या स्पष्टपणे मांडल्या. यामध्ये वेळेवर पाणी न मिळणे, कमी दाबाने येणारे पाणी, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, तसेच टँकर सेवा असमाधानकारक असणे यासारख्या गंभीर मुद्द्यांचा समावेश…
चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथील मोरे वस्ती महादेव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्या सह लक्ष्मण गोफणे , अजय दूधभाते, महावीर काळे सर, संजय नायकवडी, विठ्ठल देवकते, नामदेव मासाळ, हिराकांत गाडेकर, प्रदीप लोखंडे, सचिन शिंदे, अजित चौगुले, किरण सूर्यवंशी, विलास महानवर, आदी सर्वजण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन अशोक ठोंबरे, बिरुदेव मोटे, सुनील शिंदे, आप्पा देवकते, मनोज मिसाळ, रोहन कांबळे, सुरज धायगुडे आदी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी केले होते.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ८ महिन्यांचा युसुफ अझहर नदाफ हा Spinal Muscular Atrophy (SMA Type 1) या अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने ग्रस्त आहे.हा आजार स्नायूंवर परिणाम करून मुलांच्या हालचाली, श्वास घेणे, आणि शेवटी आयुष्य जगणे अशक्य करतो. वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यू अटळ आहे. *उपचाराचा एकमेव पर्याय – Zolgensma Gene Therapy* Zolgensma ही जीन थेरपी जगातील सर्वात महाग पण अत्यंत प्रभावी औषध उपचारपद्धती आहे. ही थेरपी वेळेत दिल्यास युसुफचं आयुष्य वाचू शकतं. *उपचार खर्च:* Zolgensma औषध किंमत – ₹१६ कोटी सहायक औषध (Risdiplam) – ₹८४ लाख एकूण गरज – ₹१६.८४ कोटी रुपये *सध्या युसुफचा उपचार सुरू आहे*…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारलेले विविध प्रकल्प आणि विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते बुधवार, दि. 18 जून रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी संपूर्ण शहरात ‘‘विकासाचे देवेंद्र पर्व’’ असे जोरदार ‘ब्रँडिंग’ केले आहे. श्रीक्षेत्र देहू – आळंदी पालखी मार्गावरील चऱ्होली येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित संत समुह शिल्पाचे बहुप्रतिक्षीत लोकार्पण मुख्यमंत्री फडवीस यांच्याहस्ते होत आहे. यासोबत, सर्वांत उंच 200 फुटांचा भगवा ध्वज आणि संतसृष्टी प्रकल्पाचे लोकार्पणसुद्धा होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपली स्पष्ट आणि तडफदार भूमिका मांडत, भाजपसोबत गेलेल्या नेत्यांविषयी कठोर भूमिका घेतली. आगामी महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज मेळावा संपन्न झाला यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी खासदार अमोल कोल्हे, राहुल कलाटे, सुलक्षणा शीलवंत, शहराध्यक्ष तुषार कामठे, सुनील गव्हाणे, रविकांत वर्पे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. “संधीसाधू आणि सत्तेसाठी भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला.त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये -शरद पवार गट आणि अजित पवार गट – पुन्हा फूट अधिक गडद झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.गेल्या…
