Author: maharashtrabreakingnews.com

हिंजवडी भागातील नागरी समस्यांवर निर्णायक बैठक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमआयडीसीसह इतर हद्दीत नियमांचा भंग करून बांधकामे करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवण्याचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले. नैसर्गिक ओढे – नाल्यांचा प्रवाह खंडित केल्यामुळे हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना अडचणी येत असल्याने खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी विविध प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेत प्रलंबित कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले. हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात…

Read More

आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढीपायवारी पालखी आज (दि. १९) रात्री आठनंतर देऊळवाड्यातून पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचा मेळा अलंकापुरीत दाखल झाला आहे. अलंकापुरी दाखल झालेला प्रत्येक वारकरी पवित्र इंद्रायणीनदीत स्नान करून माऊलींचे दर्शन घेत आहे. मात्र मागील २४ तासांपासून आळंदीसहइंद्रायणीनदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी पवित्र इंद्रायणी नदीचे दोन्ही पात्र पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे अलंकापुरीत आलेल्या अनेक भाविकांना पालखी प्रस्थानाच्या शुभसकाळी इंद्रायणी नदीच्या स्नानापासून वंचित राहावे लागले आहे. इंद्रायणी नदी केव्हाही धोक्याची पातळी ओलांडू शकते ही शक्यता लक्षात घेऊन वारकऱ्यांनी इंद्रायणीत उतरू नये…

Read More

आपत्कालीन परिस्थितीत ७७५७९६६०४ वर संपर्क साधण्याचे आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला आणि लाखो वारकऱ्यांची श्रद्धास्थान असलेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर या मार्गावर सुरु होणार आहे. “सुरक्षित वारी, अखंड सेवा!” या भावनेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका व अग्निशमन विभाग पूर्णपणे सज्ज झाले आहेत. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख मनोज लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वारीदरम्यान अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग अहोरात्र सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर, वारी मार्गावर उच्चतम दक्षतेसह नियोजन करण्यात आले असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी आपत्कालीन…

Read More

– चऱ्होलीची टीपी स्कीम रद्दच्या प्रस्तावाला मान्यता पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बुधवारी पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाने मौजे चऱ्होली येथील TP scheme बाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली. महानगरपालिका प्रशासनाने लादलेली TP Schem अखेर रद्द झाली असून, ग्रामस्थ तसेच भूमिपुत्रांना यामुळे एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने चिखली आणि मौजे चऱ्होली येथे नवीन नगर योजना प्रस्तावित ठेवली. या TP scheme संदर्भात मोठा रोष पाहायला मिळाला. ग्रामस्थ भूमिपुत्र यांनी “करो या मरो” असा पवित्र घेत टीपी स्कीम बाबत विरोध दर्शवला होता. भूमिपुत्रांचा विरोध लक्षात घेत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी या संदर्भात आयुक्त…

Read More

अन्यथा सरकारला आंदोलनाचा इशारा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने नुकताच घेतला असून, यामुळे राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवित त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देत त्यांनी राज्य सरकार मराठी विरोधी असल्याची टीका केली आहे. शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, त्रिभाषा धोरणांतर्गत इयत्ता पहिल्यापासूनच तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदी शिकवली जाणार आहे. “हिंदीची सक्ती केली जाणार नाही” असे सरकारने यापूर्वी जाहीर केले असले तरी, प्रत्यक्षात शिक्षण धोरणात हिंदीला थेट स्थान देऊन जनतेची फसवणूक केल्याचा आरोप…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – माऊलींचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून सुमारे ११ दिवसांचा प्रवास करीत अलंकापुरीत हरिनाम गजरात बुधवारी ( दि.१८ ) दाखल झाले. पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरा प्रमाणे अश्वांचे आळंदी देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी सरदार बिडकर वाड्यातील श्री गोपालकृष्ण मंदिरात आळंदी देवस्थानचे पदाधिकारी आणि अश्वसेवेचे मालक उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार यांचा सन्मान करण्यात आला. श्रीकरून मंदिरात दर्शनास भाविकांनी गर्दी केली. श्रींचे अश्वाचें अंकली ( ता. चिकोडी, बेळगावी,कर्नाटक ) येथील राजवाड्यातून श्रींचे अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान झाले होते. अलंकापुरीतील अश्वाचें प्रथम येथील श्रीगोपाळकृष्ण मंदिर बिडकर वाड्यात आगमन झाले.…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – माऊलींचे पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रीचे अश्व अंकली बेळगाव येथून सुमारे ११ दिवसांचा प्रवास करीत अलंकापुरीत हरिनाम गजरात बुधवारी ( दि.१८ ) दाखल झाले. पालखी सोहळ्यातील प्रथा परंपरा प्रमाणे अश्वांचे आळंदी देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी सरदार बिडकर वाड्यातील श्री गोपालकृष्ण मंदिरात आळंदी देवस्थानचे पदाधिकारी आणि अश्वसेवेचे मालक उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार यांचा सन्मान करण्यात आला. श्रीकरून मंदिरात दर्शनास भाविकांनी गर्दी केली. श्रींचे अश्वाचें अंकली ( ता. चिकोडी, बेळगावी,कर्नाटक ) येथील राजवाड्यातून श्रींचे अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान झाले होते. अलंकापुरीतील अश्वाचें प्रथम येथील श्रीगोपाळकृष्ण मंदिर बिडकर वाड्यात आगमन…

Read More

टाळ- मृदुंगांच्या निनादात मुख्यमंत्र्यांचे करण्यात आले स्वागत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने टाळगाव चिखली येथे उभारलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथील आलाजीबहाद्दर ह.भ.प. महादजी शिंदे सभागृह व कलादालनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज उत्साहात पार पडले,तसेच त्यांनी संतपीठ येथील विविध विभागांना भेट देत प्रकल्पांचे कौतुक केले. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारती, अमित गोरखे, महेश लांडगे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठचे अध्यक्ष शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, संतपीठ संचालक मंडळातील डॉ.सदानंद मोरे, संदीप खोत, तानाजी नरळे, संगिता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात ‘विकसित भारता’चा पाया रचला गेला असून, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात ‘कमळ’ रुजले पाहिजे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. आज काळेवाडी, पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार रवींद्र चव्हाण यांनी बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रदेश महासचिव आमदार विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पश्चिम महाराष्ट्र विभाग…

Read More

देहू,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला बुधवारी देहूगावात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. रिमझिम पाऊस पडत असतानाही वारकऱ्यांचा उत्साह कायम होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मुख्यमंत्र्यांनी अनुभवला फुगडीचा आनंद मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसरात फुगडी खेळण्याचा अनपेक्षित आनंद घेतला. पारंपरिक वेशभूषेत मुख्यमंत्र्यांनी फुगडी खेळायला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये चैतन्याची लाट…

Read More