Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढी वारीनिमित्त पोलीस मित्र नागरिक दक्षता संघ यांच्या वतीने हनुमान मंदिर परिसर, निगडी गावठाण येथे गुरुवार,दिनांक १९ जून २०२५ रोजी वारकऱ्यांची मोफत आरोग्यतपासणी आणि औषध वाटप करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सुमन पवळे, पोलीस मित्र नागरिक दक्षता संघाचे अध्यक्ष ॲड. रमेश उंबरगे, संस्थापक – अध्यक्ष मनोहर दिवाण, महालिंग शेट्टी, शिवाजी शिर्के, राम सपाटे, रोहिदास वालगुडे, गौरी उत्तुरे, महेश स्वामी, ओंकार पवळे, नंदाराम भागवत, नंदकिशोर जगदाळे, मधुराज पवळे, ज्येष्ठ कवी प्रकाश चव्हाण, राजेंद्र घावटे, अण्णा जोगदंड, तानाजी एकोंडे, सुरेश कंक आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी माउली गाडे, डॉ.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मुंबई टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसची महानगरपालिका निवडणूक आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस मधील तिन्ही विधानसभानिहाय प्रत्येक प्रभागाची माहिती अध्यक्षांना देण्यात आली. शहर काँग्रेसच्या वतीने गेल्या तीन वर्षांमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रदेशाध्यक्ष यांना देण्यात आली. सन २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार ३२ प्रभाग व १२८ नगरसदस्य आहेत. या सर्व प्रभागांमध्ये बूथ स्तरावर मतदार नोंदणी करून काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेसच्या वतीने दिलेले उपक्रम राबवावे व तसेच महापालिकेच्या भ्रष्ट कारभारा विरोधात आंदोलने उभी करावीत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये…

Read More

– आयुक्त शेखर सिंह यांच्यासाथीने हाकला पालखी रथ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले. भाजपा आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सोबतीने पालखी रथाचे सारथ्य केले. राजकीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रमुख यांनी वारकरी सांप्रदायाची पताका अभिमानाने खांद्यावर घ्यावी, असा सुरेख संगम यानिमित्ताने पहायला मिळाला. भारतीय जनता पार्टी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने संत तुकोबांच्या पालखीचे भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे दिमाखात स्वागत करण्यात आले. अवघी उद्योगनगरी तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमून गेली असून, टाळ -मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका…

Read More

आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९४ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत प्रत्यक्ष स्वत:च्या नयनांनी हा उभा सोहळा अनुभवला. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास माउलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. ‘ज्ञानोबा – माउली – तुकारामांचा’ देहभान विसरून जयघोष करीत पंढरीकडे जाण्यासाठी लाखो वारकरी ज्ञानियांच्या अलंकापुरीत दाखल झाल्याने प्रस्थान सोहळ्यासाठी जणू भक्तिसागरच लोटला आहे. प्रस्थान सोहळ्यास गुरुवारी (दि. १९) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर ‘श्रीं’ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती करण्यात आली. त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे भाविकांच्या पूजा व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. दुपारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मधील वारकऱ्यांना दहा हजार पाणी बॉटल व दहा हजार बिस्किट पुडे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख संजोग वाघेरे पाटील, महिला संघटिका रूपाली आल्हाट, वैभवी घोडके ज्योती भालके, सुषमा शेलार, तसलीम शेख,  कलावती नाटेकर, हाजी दस्तगीर मणियार, विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते, सचिन सानप, युवराज कोकाटे, राजाराम कुदळे गणेश आहेर,पार्थ गुरव,शिवाजी कुडाळकर, मनोहर कानडे, सचिन चिंचवडे,दीपक भगत, गोरख नवघणे, भरत शिंदे,बाबासाहेब भोंडवे,राजाराम कुदळे,विठ्ठल खळसे,मनोहर कानडे,मल्हार देशमुख,विजय चव्हाण, आरुण पात्रे, घनशाम कुदळे,भरत शिंदे,संजय कदम आदी उपस्थित होते.

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स च्या पंचम झोन -प्रांतीय शाखेच्या वतीने पुणे येथील महावीर प्रतिष्ठानच्या पारख सभागृहामध्ये इयत्ता दहावी बारावी आणि पदवी ,पदवीव्युत्तर यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच पार पडला .या समारंभामध्ये सुमारे 265 विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .तसेच जाणता राजा श्री विजयकांत जी कोठारी यांना *श्रमण संघरत्न* ह्या उपाधिने प्रांतीय अध्यक्ष व पदाधिकारी आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पंचम झोनचे अध्यक्ष श्री नितीनजी बेदमुथा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमांमध्ये जैन कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष अविनाशजी चोरडिया, पारसजी मोदी तसेच हर प्रांत जैन भवन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्ताने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर आणि डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्यवारी चे आयोजन प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या वेळी या वेळी वारकऱ्यांना औषधे वाटप करून त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला या वेळी वारकऱ्यांची सेवा करत असताना साक्षात पांडुरंगाची आपण सेवा करत आहोत असा भास आम्हाला होत होता असे प्रतिपादन विद्यार्थी शहराध्यक्ष राहुल आहेर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी भूषण कुदळे,रिषभ भडाळे,चैतन्य बनकर,वैष्णवी पवार,ज्ञानेश्वर पुदाले,अदित्य सोनवणे,अभिषेक कांबळे,ऋषिकेश सत्रे,आर्यन धोत्रे,स्वप्निल खंडागळे,अरबाझ शेख,संकेत वाघमारे,अनिल भोसले, संतोष माळी आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये चांगलीच जुंपली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्या वस्तादाने तुम्हाला लंगोट बांधायला शिकवले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवा. महेश लांडगे यांची भाषा तमाशातील फडासारखी असल्याचा उल्लेख करत उमेश पाटील यांनी सडकून टीका केली आहे. उमेश पाटील पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चिखली येथे झालेल्या संत पिठाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना इशारा दिला, “मी पैलवान आहे, अंगावर घ्यायची सवय आहे.” असे अप्रत्यक्षपणे अजित पवारांना सूचित केले होते. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- ज्ञानोबा-तुकाराम या जयघोषात, रिमझीम पावसात पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा गजर करत मार्गस्थ झालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे शहरात आगमन झाले आणि पिंपरी चिंचवड नगरी भक्तीभावात मग्न झाली. अखंड हरिनामाच्या गजरात निघालेल्या या दिंडीचे निगडी येथील भक्ती शक्ती चौकात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांनी स्वागत केले. त्यानंतर आमदार महेश लांडगे व आयुक्त सिंह यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी रथाचे सारथ्य केले. यावेळी आमदार उमा खापरे, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता बापूसाहेब…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, यांच्या वतीने १७ ते १९ जून २०२५ या कालावधीत पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक आरोग्याप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांनी देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांना वेळेवर आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी यासाठी त्यांच्या वैद्यकीय पथके आणि पायाभूत सुविधांची उभारणी केली. वैद्यकीय तपासणी शिबिरामध्ये सुमारे २५०० हून अधिक वारकऱ्यांनी मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला. वैद्यकीय तपासणीमध्ये रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, संपूर्ण रक्त गणना, लघवीची तपासणी…

Read More