Author: maharashtrabreakingnews.com

रहाटणी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. शाळेतील योगा शिक्षिका स्वाती वक्टे  यांनी अष्टांग योग (नियम, यम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी) वर्णन करून मुलांना शिकवले. यानिमित्ताने शाळेचे संस्थापक  अरुण चाबुकस्वार यांनी योग ही एक प्राचीन मन-शरीर विश्रांती थेरपी आहे जी भारतात उगम पावली. विविध अभ्यासांनी योगाचे नैराश्य, थकवा आणि आरोग्याशी संबंधित जीवनमान यासारख्या मानसिक-सामाजिक घटकांवर होणारे परिणाम तपासले आहेत. योग प्रशिक्षण शरीराच्या आसनांवर देखील लक्ष केंद्रित करत असल्याने असे मानले जाते, की त्याचा विविध शारीरिक घटकांवर देखील सकारात्मक परिणाम होतो; पुराव्यांवरून असे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, पवना ग्रुप आणि सोहम योगसाधना संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित योग कार्यक्रमात ६०० जणांनी सहभाग घेतला. एकाचवेळी ६०० साधकांनी योगाचे धडे घेतले. योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चिंचवड, पवनानगर येथील काशीधाम मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाले. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, स्मारक समितीचे कोषाध्यक्ष रवी नामदे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे ,भाजप कार्यकारिणी सदस महेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होत्या. योग शिक्षक दिगंबर उचगांवकर व अनुजा उचगांवकर यांनी सर्वांना योगाचे धडे दिले. सुरुवातीला योगासाठीच्या पूरक हालचाली झाल्या. त्यानंतर सूर्यनमस्कार झाले. शय…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक योग दिन अत्यंत उत्साह, श्रद्धा आणि शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे केवळ बौ‌द्धिकच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक विकास साधावा, या हेतूने शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड यांच्या पुढाकारातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आमदार  अमित गोरखे, कार्यकारी संचालक  विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख  समीर जेऊरकर, पालक संघ, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग दिनाचे औचित्य साधून शाळेत तीन स्वतंत्र सत्रांमध्ये योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते १) विद्यार्थ्यांसाठी (इ. १ ली ते…

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी देहूतून प्रस्थान करून १९ जून रोजी पिंपरीतील भक्ती-शक्ती चौकात आगमन करणार आहे. विठोबा माऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी भक्तिभावाने या पवित्र वारीत सहभागी होतात. मात्र, या भक्तिमय उत्सवाच्या समाप्तीनंतर मागे राहातो तो कचरा आणि अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न. वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संस्था, नागरिक आणि हॉटेल्स अन्न-पाण्याची सेवा करत असले तरी वारी संपल्यावर उरतो तो कचर्‍याचा डोंगर, जो शहराच्या सौंदर्यावर आणि नागरिकांच्या मनावर वाईट परिणाम करतो. “स्वच्छता हा खरा धर्म आहे, गलिच्छपणा हा पाप आहे,” असे सांगणाऱ्या संत गाडगे महाराजांचे तत्त्व वारीनंतरही जपणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघ…

Read More

पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एअर मार्शल प्रदीप बापट, PVSM VSM (निवृत्त) अध्यक्ष अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद,महाराष्ट्र आणि गोवा यांची महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड (मेस्को) च्या संचालकपदी १८ जून २०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे.मेस्को ही महाराष्ट्र शासनाची उपक्रम संस्था असून, १८ जानेवारी २००२ रोजी तिची स्थापना झालेली आहे.ह्या संस्थेचा मुख्य उद्देश माजी सैनिकांच्या पुनर्वसन व कल्याणासाठी तसेच विविध क्षेत्रांमध्ये त्यांना अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांच्या नियुक्तीमुळे मेस्को (MESCO) या संस्थेच्या दृष्टीकोनात नवचैतन्य निर्माण होईल,तसेच माजी सैनिकांचे सक्षमीकरण आणि मुख्य प्रवाहात त्यांचा समावेश करण्यावर अधिक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीक्षेत्र देवाची आळंदी येथून प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे मॅगझिन चौक, भोसरी येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्वागत सोहळ्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरीनामाचा जयघोष करीत पालखी सोहळा उद्योगनगरीमध्ये दाखल झाला. वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून छत्र्या, रेनकोटचे वाटप, तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, केळी, फराळ व लाडूंचे वितरण करण्यात आले. याशिवाय हेल्थ चेकअप कॅम्प व वैद्यकीय सेवा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या. दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांचे सुद्धा…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पुण्याकडे प्रस्थान झाले. आळंदी पुणे रस्त्यावर दिघी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि स्वर्गीय तानाजी सोपान वाळके प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना महाप्रसाद, शिधा, पाण्याची बाटली आणि चहाचे वाटप करण्यात आले. पाच हजार पेक्षा जास्त वारकऱ्यांनी व भाविकांनी याचा लाभ घेतला. तसेच यावेळी वारकऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी परभणीचे खासदार संजय बंडू जाधव, पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख केसरीनाथ पाटील, माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, उपशहर प्रमुख राहुल गवळी, शहर समन्वयक कैलास…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आपण यावर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातील संस्कृती संवर्धन विकास महामंडळ अंतर्गत मुठभर शेंगदाणे वारकऱ्यांसाठी उपक्रमात सहभाग घेतला. यासाठी महासंघातील पदाधिकाऱ्यांनी आपले योगदान दिले. दरवर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हा दरवर्षी पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी काही ना काहीतरी उपक्रम राबवत असतो. आत्तापर्यंत महासंघाने पर्यावरण पूरक कापडी पिशव्या पाण्याच्या बाटल्या त्याचप्रमाणे साबण अशा नित्य उपयोगी गोष्टींचे वाटप केले आहे. ह्यावर्षी देखील मुठभर शेंगदाणे वारकऱ्यांसाठी या उपक्रमांतर्गत महासंघाने सुमारे ६५ किलो शेंगदाणे वारकऱ्यांसाठी दिले. हे शेंगदाणे संस्कृती सेवा महामंडळाचे श डॉक्टर अजित जगताप यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी सुपूर्त केले. या प्रसंगी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे गट कार्यालयाकडून कामगार प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विठुनामाचा गजर, अभंग ओव्यांची संगत आणि पावसांच्या सरींसह श्री क्षेत्र देहु ते आकुर्डीतील तुळजा भवानी मंदिरापर्यंत या दिंडीने मार्गक्रमण केले. कामगार कल्याण आयुक्त  रविराज इळवे यांच्या संकल्पनेतून मागील वर्षापासून कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी या प्रबोधन दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. गुणवंत कामगार श्रीकांत (आण्णा) जोगदंड व त्यांच्या पत्नी संगीता यांनी दिंडीत विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करत सर्वांचे लक्ष वेधले. प्रकाश घोरपडे, सुभाष चव्हाण, सुरेश कंक यांनी देखील विविध संतांची वेशभूषा करत संतांच्या विचारांचा जागर केला. यावेळी जाधववाडी येथील कामगार भजनी मंडळाने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज पहाटे ४ वाजता आकुर्डी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन व आरती करण्यात आली. दर्शन व पूजेनंतर आयुक्त शेखर सिंह यांचा आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसदस्य प्रमोद कुटे,कुंडलीक महाराज मोरे,अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सह शहर अभियंता नितीन देशमुख, उप आयुक्त सचिन पवार, क्षेत्रिय अधिकारी निवेदिता घार्गे, अतुल पाटील, किशोर ननवरे, कार्यकारी अभियंता विजय भोजने, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संतोष कुटे,प्रविण कुटे,तुकाराम कुटे,गिरीश कुटे तसेच नागरिक उपस्थित होते. महापुजेनंतर…

Read More