Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा दरवर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात येतो. परंतु यावर्षीचा सन्मान फक्त वारकऱ्यांपूरता मर्यादित राहीला नाही, तर तो संघर्षातून उभ्या राहिलेल्या महिलांच्या निःस्वार्थ भक्तीचा देखील सन्मान ठरला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये १९ जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या तर २० जून रोजी संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी महापालिकेच्या वतीने या दोन्ही पालख्यांचे स्वागत करताना वारकऱ्यांचा सन्मान कोविड योद्धा महिला बचत गटातर्फे बनवलेल्या शबनम बॅग (कापडी पिशवी मांजरपाट) देऊन करण्यात आला. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम…’ असा…

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील केरळ समाजाचे आणि देहूरोड येथील अय्यप्पा मंदिराचे जेष्ठ माजी विश्वस्त बालन नायर यांचे काल निगडी येथे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी त्याचे वय 85 वर्षें होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी उर्वरित आयुष्य अय्यप्पा मंदिरासाठी सेवाभावी वृत्तीने खर्च केले. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली होती, त्यांच्या निधनाने केरळ समाजात आणि निगडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कस्टम विभागाचे अधीक्षक मुरलीधर नायर यांचे ते वडील होते.

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात नियमांचा भंग करून ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळेच पूर परिस्थिती निर्माण होत आहे. पीएमआरडीएसह एमआयडीसी हद्दीतील १३ ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह परस्पर बदल तसेच रोखणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नुकतीच लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेत संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह एमआयडीसी हद्दीतील ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह काही कंपन्या, बिल्डर आणि नागरिकांनी परस्पर रोखला तसेच स्थलांतरित केला आहे. काही ठिकाणी मनमर्जीप्रमाणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर दिसून आला. भारतीय जनता पार्टीने या दिनानिमित्त शहरात १४ मंडलनिहाय एकूण ३१ ठिकाणी भव्य योग कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांना हजारो योग साधक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत, निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वात हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. पिंपळे सौदागर येथील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपळे सौदागर येथील गोविंद यशदा…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे पुण्यात आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयाेजित शिबिरात ११,७६४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिर उद्घाटनप्रसंगी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आमदार व सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमाेल केदारी तसेच मंडळाचे राहुल चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, तुषार रायकर, सनी सिद्धा, इंद्रजीत रायकर, राजाभाऊ पायमोडे, सुनील जाधव यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते. बुधवार पेठेतील उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे हे शिबिर घेण्यात आले. रुग्णसेवा…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे येथील संत देवजी बाबा मंदिरासमोर “समतेचा वारकरी, सेवा हिच माझी पंढरी” या उपक्रमांतर्गत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या साधू, संत, वारकरी, भाविक आणि भक्तांसाठी मोफत आरोग्य सेवा आणि इतर सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अन्नछत्राच्या अन्नवाटप उपक्रमाचे उद्घाटन महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष विठ्ठल दादा गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक आणि गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे (माऊली) होते. डॉ. बाबा कांबळे यांनी पुणे ते पंढरपूर या मार्गावर या सेवा राबवल्या जाणार…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर चिंचवड स्टेशन येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमास योग गुरु  कुमार कटके  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिशुविहार व इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेतला.जगाला आनंदी आणि सुदृढ करूया, चला सर्व योगाकडे वळूया. सर्वांनी एकात्मतेने व मनःशांतीचा अनुभव घेतला. प्रशालेतील सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांबरोबर सहभागी झाले होते. योग साधनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला. सर्वांच्या आरोग्य व समृद्धीसाठी ओमकार जप करण्यात आला. योग जीवनशैली आहे व्यायाम नाही ही विचारधारा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात आली. या उपक्रमासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव  ॲड  राजेंद्रकुमार…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘सेवाभाव हा भक्तिभावाइतकाच महत्त्वाचा असतो म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आषाढी वारीनिमित्त आरोग्यवारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ करण्यात आला आहे!’ अशी माहिती विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री आणि सेवा आयाम पालक ॲड. सतिश गोरडे यांनी  चिंचवडगाव येथे (शनिवार, दिनांक २१) दिली. रावेत येथील इस्कॉन श्री गोविंद धामचे अध्यक्ष जगदीश गौरांग प्रभू, ज्येष्ठ उद्योजक नितीन अग्रवाल, ज्येष्ठ कीर्तनकार आणि वीणेकरी ह. भ. प. मधुकरमहाराज मोरे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे, ॲड. ललित झुनझुनवाला, माजी प्रांतमंत्री विजय देशपांडे आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गेली ३८…

Read More

कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनेश लालचंद यादव यांच्या वतीने कुदळवाडी येथे विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेत योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करून योग साधनेचा अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगाचे महत्त्व सांगण्यात आले आणि नियमित योगाभ्यासामुळे होणारे मानसिक व शारीरिक फायदे समजावून सांगण्यात आले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने करून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला. या प्रसंगी दिनेश यादव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “योग हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनायला हवा. नियमित योगाभ्यास केल्याने शरीर निरोगी राहते आणि मन शांत राहते.” कार्यक्रमाचे आयोजन उत्साही वातावरणात पार पडले असून, स्थानिक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महापालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेला मोशी व तीर्थक्षेत्र आळंदीच्या परिसरातील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्यात येईल. वारकरी, भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या श्रद्धेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पायी पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालखीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी, पिंपरी-चिंचवडमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मोशी येथील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याबाबत ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होतो. तसेच, भाजपा…

Read More