Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२५ या पावन पार्श्वभूमीवर, “जागर कायद्याचा, सन्मान वारकऱ्यांचा” या सामाजिक उपक्रमाअंतर्गत एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय, पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशन, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) व एस.एन.बी.पी. माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत महाविद्यालय प्रांगणात मोफत कायदेविषयक सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वयोवृद्ध वारकरी, महिला आणि गरजू नागरिकांना विविध कायदेविषयक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.त्यामध्ये महिलांचे कायदेहक्क व सक्षमीकरण,बालकांचे हक्क व संरक्षण कायदे,सायबर गुन्हे व उपाय,संपत्ती व जमिनीवरील हक्क व वाद,ऑनलाइन तक्रार निवारण प्रक्रिया कार्यक्रमाची सुरुवात धाराशिव दिंडीतील ज्येष्ठ वारकऱ्याच्या सत्काराने झाली,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – विकास शिक्षण मंडळ संचालीत श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयामध्ये २१ जून योगा डे च्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी विविध योगा आसनांसोबत सूर्यनमस्कार साजरे केले. याप्रसंगी उपस्थित संस्थेचे संचालक विजय जाधव, मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव,उप मुख्याध्यापिका सुषमा संधान मनीषा जाधव,  छाया ओव्हाळ क्रीडा शिक्षक  शब्बीर मोमीन, श्रीमती मुबारक मोमीन आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीत आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्वाची चर्चा झाली. यावेळी पक्षासाठी दीर्घकाळ कार्यरत असलेले युवक पदाधिकारी, महिला, विद्यार्थी तसेच इतर सेलमधील एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीत संधी द्यावी अशी मागणी   शरद पवार  यांच्याकडे करण्यात आली. या भेटीप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश आप्पा मस्के, वृक्षमित्र अरुण पवार, युवक पदाधिकारी रजनीकांत गायकवाड, प्रशांत जाधव आणि उद्योजक तांबे उपस्थित होते. या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “पक्षाच्या वतीने शहरातील सर्व जागा लढविण्यात येणार असून यावेळी नवीन चेहरे उमेदवार म्हणून दिसतील. संघटनेतील एकनिष्ठ पदाधिकारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाला समर्पित ‘मोदी@11’ अभियानांतर्गत ‘विकसित भारताचा अमृत काळ: सेवा, सुशासन, गरीब कल्याण’ या विषयावरील तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते पार पडले. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपा सरचिटणीस अजय पाताडे यांच्यावतीने ग. दि. माडगूळकर प्रेक्षागृह, प्राधिकरण, निगडी येथे हे तीन दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांत केलेल्या विकासकामांचे, लोककल्याणकारी योजनांचे आणि सुशासनाचे पैलू मांडण्यात आले आहेत. यामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण यावर विशेष भर देण्यात आला आहे. यावेळी…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील असंघटित, बांधकाम, कंत्राटी, सफाई आणि घरेलू कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करणाऱ्या कष्टकरी संघर्ष महासंघाच्यावतीने आज एक शिष्टमंडळ संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची पुण्यात भेट घेतली. कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत विविध मागण्यांचे निवेदन सुप्रिया सुळे यांना देण्यात आले आणि सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेच्या केंद्रस्थानी घरेलू कामगारांसाठी स्वतंत्र कायदा करण्याचा मुद्दा होता. याबाबत जानेवारी २०२४ मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सहा महिन्यांच्या आत समिती स्थापन करून कायदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून ठोस हालचाल झालेली नसल्याने देशातील कोट्यवधी घरेलू कामगारांवर अन्याय सुरूच आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड शहरातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) बस प्रवासासाठी सवलतीच्या दरात बस पास योजना राबविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष  शत्रुघ्न  काटे यांनी  महानगरपालिकेचे आयुक्त याच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिले आहे.  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी PMPML बस प्रवासाकरिता २५% ते ७५% सवलतीच्या दरातील बस पास योजना सुरू केली होती. विविध अटी आणि नियमांसह ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. शहरातील अनेक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी विविध सवलती जाहीर केल्या असून त्या मिळविण्यासाठी आता केवळ १० दिवस बाकी आहेत. ३० जून २०२५ पूर्वी ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरल्यास १० टक्के सवलत असून महिलांच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेसाठी ३० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. मालमत्ताधारकांनी सदर सवलतींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. महानगरपालिकेने ‘सिद्धी उपक्रम’ अंतर्गत महिला बचत गटांमार्फत ६ लाख ३५ हजार मालमत्ता धारकांना घरोघरी जाऊन बिलांचे वाटप केले आहे. त्याचसोबत अनेक मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटीसा देखील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका व योग विद्या धाम, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे सकाळी सामूहिक योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन महापालिकेचे उप आयुक्त पंकज पाटील आणि सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योग विद्या धाम संस्थेचे प्रमुख प्रमोद निफाडकर, संस्था पदाधिकारी, योगप्रशिक्षक आणि शिक्षक वर्ग यांची देखील उपस्थिती होती. योग सत्रात क्रीडा प्रबोधिनी उद्यमनगर, राजीव गांधी विद्यालय नेहरूनगर, तसेच इतर शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक योग दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मनुश्री योग यांच्या संयुक्त विद्यमाने रहाटणी येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे योग साधना करण्यात आली. यंदाच्या केंद्र सरकारच्या ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित योग साधना करतांना उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून योग सत्राला सुरवात करण्यात आली. यावेळी माजी नगर सदस्य गोपाल मळेकर, उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, मनुश्री योगच्या योगाचार्य नूतन जोंधळे, मच्छिंद्र रोडे, कृष्णा आंधळे, मंगेश जोंधळे, डॉ. अशोक ठाकरे, मिया बाय तनिष्क च्या व्यवस्थापक रचना वर्मा, उद्यान सहाय्यक हनुमंत चाकणकर तसेच मनुश्री योग परिवार, धर्मवीर गार्डन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहरातील सर्वच १३४ शाळांमध्ये योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळांमध्ये योगासने व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्यसाधून महापालिकेच्या शाळांमध्ये ‘एक माता एक झाड’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक,योग प्रशिक्षक, शिक्षकेतर वर्ग, सुरक्षारक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. ‘योग संगम’ कार्यक्रमामध्ये सर्वच शाळांनी घेतला सहभाग ! आयुष मंत्रालयाच्या ‘योग संगम’ कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या सर्व शाळांनी सहभाग नोंदवला. सहभागी शाळांना ऑनलाइन स्वरुपामध्ये आयुष मंत्रालयाकडून ‘योग संगम प्रमाणपत्र’ प्राप्त झाले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या सर्वच १३४ शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी योगासने करुन…

Read More