- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी रविराज काळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. एक सामान्य घरात वाढलेला, संघर्षमय जीवनातून पुढे आलेला आणि आजच्या तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेला चेहरा म्हणून रविराज काळे यांच्यावर आदमी पार्टीने शहराची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयाचे शहरभर स्वागत होत आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे प्रभारी प्रकाश जरवाल, प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष अजित फाटके पाटील, प्रदेश सचिव डॉ. अभिजित मोरे, प्रदेश सह-सचिव अॅड. सागर पाटील यांनी काळे यांची नियुक्ती जाहीर केली. रविराज काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात आणि तरुणांच्या आंदोलनांमध्ये सक्रीय आहेत. शिक्षणासाठी गावातून पुण्यात आलेल्या या…
प्रतिबंध, संरक्षण आणि त्वरित उपचाराचे त्रिसूत्री धोरण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे ‘ब्रेक द चेन’ ही विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश केवळ उपचारांपुरता मर्यादित नसून प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती, स्वच्छता आणि नागरिकांच्या सहभागातून शहरात डास निर्मूलन करणे हा आहे. राज्य शासनाच्या डेंग्यू प्रतिबंधात्मक धोरणानुसार ‘तपासा, स्वच्छ ठेवा आणि झाका’ (Check, Clean, Cover) ही त्रिसूत्री प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूच्या परिसरात साचलेले पाणी तपासणे, दर आठवड्याला टाक्या व पाणी साठवणाऱ्या भांड्यांची स्वच्छता करणे आणि पाणी साठवणारी भांडी झाकून ठेवणे आवश्यक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, पुणे शहर यांच्या वतीने दिनांक २५ जून २०२५ रोजी “अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, पिंपरी चिंचवड” येथे “भव्य रोजगार व रोजगाराभिमुख प्रशिक्षण मेळाव्याचे” आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र राज्य महेंद्र बैसाणे यांनी दिली. रागा हॉटेल पिंपरी येथे (दि.२३) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस सिद्धी आंगणे, महेश महाले, मनसे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन चिखले व इतर मनसेचे विविध नेते, पदाधिकारी व आयोजक आदी उपस्थित होते. यावेळी बैसाणे म्हणाले की, मेळावा सकाळी ९:३० ते…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२५’ करीता प्रमुख संयोजक म्हणून माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांच्या नावाची एकमताने घोषणा करण्यातआली. रविवारी सायंकाळी खान्देश मराठा मंडळाच्या सभागृहात ‘खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२५’ ची बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीला खान्देशातील विविध समाज प्रतिनिधी आणि खान्देश मराठा मंडळाचे संचालक उपस्थित होते. उत्सवाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा होऊन काही महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले. खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष ॲड. हेमंत चव्हाण यांनी सभेचे प्रयोजन स्पष्ट केले. तसेच, उपस्थित सर्व सदस्यांना चर्चेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. यावेळी, नामदेवराव ढाके, ॲड. हेमंत चव्हाण, शंकर पाटील, दिनेश निकम, अविनाश अहिरे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. मुखर्जींनी देशाच्या एकात्मतेसाठी केलेला संघर्ष आणि दिलेले बलिदान हे राष्ट्रनिष्ठेचे सर्वोच्च प्रतीक आहे. ‘एक देश, एक विधान, एक निशान व एक प्रधान’ या त्यांच्या घोषणेने तत्कालीन परिस्थितीत देशाची एकता टिकवण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले, जे आजही राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश श्रीरसागर यांनी केले. जनसंघाचे संस्थापक, महान देशभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त भाजपतर्फे डॉ. मुखर्जींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या अतुलनीय योगदानाला आदराने स्मरण करण्यात आले. मोरवाडी, पिंपरी येथील भाजपा कार्यालयात उपस्थित मान्यवरांनी डॉ. मुखर्जींच्या विचारांना आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीला नमन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, डॉ. मुखर्जी…
वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “मी आमदार आहे, कारण तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात. आज निर्णय घ्यायचे असतील, तर तोही तुमच्या सल्ल्यानेच घ्यायचा,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आमदार सुनील शेळके यांनी पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका मांडली. वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी नवे संकेत दिले गेले. आमदार सुनील शेळके यांच्या सडेतोड भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. पक्षातील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, २० सदस्यीय समितीचा निर्णायक हस्तक्षेप, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन यामुळे हा मेळावा यशस्वी ठरला. मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ५६ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहेत. नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद नेमून दिलेल्या समन्वय अधिकारी यांनी भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ५, ७, ६, ६,२, १०, ४…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या पंढरपूर पालखी प्रस्थान सोहळ्यात “कामगार प्रबोधन दिंडी”चे आयोजन करण्यात आले.श्री क्षेत्र देहूपासून आकुर्डी तुळजा भवानी मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या दिंडीत शेकडो कामगार, व महिला त्यांच्या कुटुंबियांसह सहभागी झाले. या दिंडीत कामगारांमध्ये पाणी बचतीचा संदेश,व्यसनमुक्तीचे महत्त्व,आरोग्य,स्वच्छतेबाबत तसेच कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांना मिळणाऱ्या योजना याची जनजागृती करण्यात आली. विशेष आकर्षण ठरले ते संतांची वेषभूषा करून सहभागी झालेले गुणवंत कामगार. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात श्रीकांत व संगीता जोगदंड दांपत्य,तुकाराम महाराजांच्या रूपात प्रकाश घोरपडे,नामदेव महाराजाच्या वेशात शामराव गायकवाड आदीं गुणवंत कामगारांनी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी जाधववाडी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आयटीनगरी हिंजवडीतील अनेक नैसर्गिक नाले बांधकाम व्यावसायिक, कंपनी मालकांनी बुजविले आहेत. काही नाले वळविले आहेत. नियमांचा भंग करुन बांधकामे केली आहेत. मैला मिश्रित पाणी ओढ्यात सोडले जाते. त्यामुळे हिंजवडीतील रस्ते जलमय होत आहेत. त्यासाठी नैसर्गिक नाले बंद करणाऱ्या, वळविणाऱ्या बांधकाम व्यावसायिक, कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या. हिंजवडी वाहतूककोंडी व नाल्यांच्या समस्यांसाठी खासदार बारणे यांनी गुरुवारी पीएमआरडीए, एमआयसीडी, प्रदूषण महामंडळा च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. आमदार शंकर मांडेकर, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, सहाय्यक…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात मदतीचा हात देण्यासाठी वुई टुगेदर फाउंडेशनने आर्थिक सहाय्यता निधी उपक्रम सुरू केला आहे. चिंचवड येथील आनंदी बाई डोके सांस्कृतिक सभागृहात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांना, जे आई-वडील गमावलेले आहेत अथवा अत्यंत बिकट परिस्थितीत आहेत, अशा गरजू विद्यार्थ्यांना निवडून त्यांना मदत करण्यात आली. या उपक्रमासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य आणि दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. चिंचवड येथील आनंदी बाई डोके सांस्कृतिक सभागृहात वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्यता निधी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रतिभा कॉलेजचे मुख्य प्रशासक अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया प्रमुख पाहुणे म्हणून…
